राशीभविष्य मंगळवार १० सप्टेंबर २०१९

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : आई-वडिलांचा आशीर्वाद उपयोगी येईल. घरातील व्यक्तींची नाराजी दूर करता येतील. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ : धंद्यात वाढ होईल. नविन परिचय होईल. स्पर्धेत जिंकाल. मान-सन्मान मिळेल.

मिथुन ः क्षुल्लक कारणाने मतभेद घरात होतील. धंद्यात अडथळा येईल. वाहन जपून चालवा.

कर्क : तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल. वाटाघाटीत यश मिळेल. नविन प्रेरणा देणारी घटना घडेल.

सिंह : तुमच्या कार्यात अडचणी येतील. रागावर ताबा ठेवा. धंद्यात हिशोब नीट करा. जिद्द ठेवा.

कन्या ः  घरात मोठेपणा दाखवायचा नसतो. सहनशीलता ठेवल्यास यश मिळेल. वरिष्ठांना मदत करावी लागेल.

तुला : मन उदास होईल. जुन्या आठवणी येतील. धंद्यात हिशोबात चूक होऊ शकते.

वृश्चिक : तुमच्या कार्याला नवे वळण मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

धनु : धाडसी निर्णय घेतल्यामुळेच सर्व चकित होतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

मकर : जुने स्नेही भेटल्याचा आनंद मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठांच्यासाठी धावपळ होईल.

कुंभ : धंद्यात सावध रहा. मैत्रीत दूरावा होईल. प्रवासात घाई करू नका. सन्मानाचा विचार नको.

मीन : धंद्यात वाढ होईल. नविन ओळखीचा फायदा होईल. जीवनसाथी मुळे यांना खुष कराल.