राशीभविष्य गुरुवार १२ सप्टेंबर २०१९

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष : डावपेच टाकता येतील. राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आपसातील नाराजीकडे लक्ष द्या.

वृषभ : नोकरीत बदल करण्याची संधी शोधू शकता. विचारांना चालना मिळेल. धंद्यात प्रगती कराल.

मिथुन ः मुलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधू शकाल. धंद्यात नवेकाम मिळावा.

कर्क : कामाचा व्याप वाढेल. दगदग होईल. बंधु-भगिनींची भेट होईल. त्यांची व्यथा ऐकावी लागेल.

सिंह : कुटुंबातील व्यक्तीच्या हट्टीपणामुळे निर्णय बदलावा लागेल. धंद्यात फायदा होईल. स्पर्धा जिंकाल.

कन्या ः विरोधक तुमच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा प्रयत्न करतील. तणाव होईल. प्रवासात घाई नको.

तुला : पोटाची काळजी घ्या. दर्जेदार व्यक्तींचा परिचय होईल. स्पर्धेत जिंकाल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.

वृश्चिक : किरकोळ कारणामुळे तुमचा कल बदलेल. आवडते पदार्थ मिळतील. मौज-मजा कराल.

धनु : नातलगांचा सहवास मिळेल. मन स्थिर राहिल्याने योग्य दिशेने तुमच्या कामाचा विचार करता येईल.

मकर : धंद्यात चांगली संधी मिळेल. वरिष्ठांच्या बरोबर मैत्री होईल. मुलांच्या कडून चांगली बातमी ऐकाल.

कुंभ : धंद्यात कोणत्या प्रकारे पुढे जाता येईल त्याचा विचार कराल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.

मीन : कामाचा व्याप वाढेल. विरोधक दडपशाही करतील. तुमच्या प्रतिष्ठेला पणाला लावू नका.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here