राशीभविष्य : शुक्रवार, ३१ जुलै २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :तुम्ही ठरविल्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. प्रेमाने प्रश्न सोडवा. जबाबदारी स्विकारावी लागेल.

वृषभ :महत्त्वाच्या वस्तु सांभाळा. घरातील वाद चव्हाट्यावर येऊ शकतो. डोळ्यांची काळजी घ्या.

मिथुन :आजचे काम उद्यावर टाकू नका. मेहनतीचे फळ चांगलेच मिळेल. वरिष्ठांना दुखवू नका.

कर्क :रागावर नियंत्रण ठेवल्यास सर्व कामे नीट पूर्ण करू शकाल. धंद्यात गोड बोला. गिर्हाईक सांभाळता येईल.

सिंह :मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल. नोकरीतील तणाव कमी होईल. घरात आनंदीपणा राहिल.

कन्या :धावपळ, दगदग नातलगांच्यासाठी करावी लागेल. अधिकार प्राप्तीसाठी आश्वासन राहिल.

तूळ :घरातील कामे होतील. भेटीत यश मिळेल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल.

वृश्चिक :प्रवासात घाई करू नका. सौम्य धोरण ठेवा. मोठ्या लोकांची मदत घेता येईल.

धनु :आजचे काम उद्यावर टाकू नका. वरिष्ठांचा राग समजून त्याप्रमाणे वागता येईल. धंद्यात तेजी येईल.

मकर :आपले पणाची भावना निर्माण झालेल्या माणसांची मैत्री दृढ होईल. धंद्यात नवा पर्याय शोधता येईल.

कुंभ :जुने मित्र भेटतील. थकबाकी वसूल होईल. धंद्यात चांगला जम बसेल. खरेदी कराल.

मीन :कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. प्रतिष्ठा वाढेल. उद्योगात नवा मार्ग मिळेल. पैसा साठवून ठेवा.