राशीभविष्य : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष : राजकीय-सामाजिक कार्याला वेगळे वळण देता येईल. प्रयत्न करा. सर्वांना एकत्र करा. धंद्यात सुधारणा होईल.

वृषभ : धंद्यातील समस्या कमी होऊ शकेल. रागावर ताबा ठेवल्यास प्रश्न वाढणार नाही. मन स्थिर राहील.

मिथुन : मनाची एकाग्रता करा. स्पर्धेत जिंकाल. कोर्टकेस यशस्वी होईल. नोकरीत चांगला बदल करू शकाल.

कर्क : विरोधकांना संधी देऊ नका. स्वतः चूक करू नका. भडक माथ्याने कोणताही प्रश्न सुटत नाही. प्रसंग पाहून वागा.

सिंह : महत्त्वाची चर्चा करता येईल. थकबाकी वसूल करा. धंद्यात नवे काम मिळेल. परिचयात वाढ होईल.

कन्या : अपेक्षित व्यक्तीची भेट घेऊन तुम्ही प्रगती करू शकाल. मान-प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धा जिंकाल.

तूळ : विचारांना दिशा मिळेल. धंद्यात फायदा वाढेल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. नुकसान भरून काढू शकाल.

वृश्चिक : सहनशीलता ठेवा. स्वतःचे मत पुन्हा एकदा तपासून पहा. अडचणी वाढतील असे कृत्य टाळा. खर्च वाढेल.

धनु : आज ठरविलेले काम उद्यासाठी ठेऊ नका. खर्च वाढेल. मौल्यवान वस्तू नीट ठेवा. आप्तेष्ठ भेटतील.

मकर : तुमच्या कामात चुका दाखवल्या जातील. योग्य व्यक्तीची पारख करून ठेवा. म्हणजे सल्ला करू शकतील.

कुंभ : आज ठरविलेला कार्यक्रम मनाप्रमाणे पूर्ण करू शकाल. जुने वाद मिटवता येतील. पाहुणे येतील. धंदा वाढेल.

मीन : मान-प्रतिष्ठा मिळेल ना मिळेल, तुम्ही कार्यावर लक्ष घ्या. प्रेमाची माणसे एकत्र करा. धंद्यात गोड बोला.