राशीभविष्य शुक्रवार, ०९ ऑक्टोबर २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : विचारांची देवाण-घेवाण मनाप्रमाणे होईल. धंद्यात जम बसेल. योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. वाद मिटेल.

वृषभ : कोर्ट केस मिटवता येईल. प्रवासात घाई करू नका. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.

मिथुन : नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. मुलांची प्रगती उत्साहवर्धक ठरेल. प्रवासाचा बेत ठरवाल.

कर्क : संसारात क्षुल्लक मतभेद होतील. अचानक कार्यक्रमात बदल करण्याची वेळ येईल.

सिंह : जीवनसाथी, मुले यांना वेळ द्यावा लागेल. मोठी खरेदी कराल. शुभ समाचार मिळेल.

कन्या : रागाच्या भरात कुणालाही वाकडे कठोर बोलू नका. मैत्री सांभाळा. दुखापत संभवते.

तुला : आजचे काम उद्यावर टाकू नका. मैत्रीसाठी वेळ खर्च करावा लागेल. स्पर्धेत कौतुक होईल.

वृश्चिक : मैत्रीत दुरावा येऊ शकतो. तुमचे स्पष्ट बोलणे खरे असेल तरी जाचक वाटू शकते.

धनु : चांगल्या कामाची सुरुवात करता येईल. तुम्ही दिलेला सल्ला उपयुक्त ठरेल. लाभ होईल.

मकर : धंद्यात सुधारणा होईल. मोठे कंत्राट मिळवा. कठीण प्रश्न रेंगाळत ठेऊ नका.

कुंभ : विचार परिवर्तन करणे वाटते तेवढे सोपे नसते. याचा अनुभव येईल. मदत कराल.

मीन : धंद्यात समस्या येऊ शकते. वाद वाढवू नका. तडजोड करा. विश्वास जास्त टाकू नका.