राशीभविष्य शनिवार २५ जुलै २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- सहनशीलता ठेवा. जबाबदारीने वागावे लागेल. तुमची महत्त्वाकांक्षा फोल ठरू शकते. राग आवरा.

वृषभ ः- सकाळी महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात लक्ष द्या. मोठे काम मिळेल. स्पर्धेत पुढे जाल.

मिथुन ः- वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. स्पर्धेत चमकाल. कोर्ट केस जिंकाल. थकबाकी वसूल करा.

कर्क ः- तुमची प्रशंसा होईल. नवीन परिचय होईल. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल.

सिंह ः- ताण-तणाव सहन करावा लागेल. वाहन जपून चालवा. वाद वाढवू नका.

कन्या ः- सकाळीच महत्त्वाचा निर्णय घ्या. काम करा. तुमचा अंदाज बरोबर येईल. धंदा मिळेल.

तूळ ः- अपरिचित व्यक्तीसमोर कमीच बोला. धावपळ होऊ शकते. शेवटी तुमचे काम होईल.

वृश्चिक ः- तुमच्या कामात इतरांची मदत होईल. प्रश्न सोपा करा. वाद वाढवू नका. यश खेचा.

धनु ः- क्षुल्लक कारणाने मन उदास होईल. शेजारी तुमचा वेळ घेतील. वस्तू सांभाळा.

मकर ः- मान-प्रतिष्ठा मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. मुलांची प्रगती पाहून समाधान मिळेल.

कुंभ ः- जबाबदारीने वागणे कठीण वाटेल. तुमचा अंदाजबरोबर येईल. मैत्री वाढेल.

मीन ः – धंद्यात जम बसेल. स्पर्धा जिंकाल. जुने काम करून घेता येईल. मदत मिळेल.