राशीभविष्य शनिवार, ८ ऑगस्ट २०२०

Horoscope 44
राशीभविष्य

मेष – मित्र परिवाराची मदत होईल. हवापालट करण्यामुळे मन उल्साहीत होईल. नविन परिचय होईल.

वृषभ – कामात व्यस्त रहा. जे मिळाले आहे त्यात तुमचे कौशल्य दाखवा. वर्चस्व वाढवा.

मिथुन – आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल.

कर्क – खर्चाचा ताळ-मेळ बसवता येईल. डोळ्यांची काळजी घ्या. प्रवासात धंद्याला पोषक चर्चा होईल आणि व्यक्तीचा परिचय होईल.

सिंहः- मनावरील दडपण कमी होईल. कुटुंबातील चर्चा सफल होईल. वाटाघाटीत यश मिळेल.

कन्या – तुमच्यावर आरोप येण्याची शक्यता आहे. हाय ब्लडप्रेशरचा त्रास होण्याची शक्यता आहे. राग वाढेल.

तूळ – आप्तेष्ठांचा फोन येईल. महत्त्वाच्या विषयावर बोलणी करता येईल. जुने येणे वसूल करा. गैरसमज संपवा.

वृश्चिक – कामाची नविन संधी मिळण्याची शक्यता आहे. धंद्यात लाभ होईल. चांगली संगत ठेवा.

धनु – महत्त्वाच्या विषयावर तुम्हाला चर्चा करता येईल. स्पर्धा जिंकाल. मान-सन्मान मिळेल. धंद्यात लाभ होईल.

मकर – अहंकार दिसून येईल. गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृतीवर ताण पडेल.

कुंभ – कुटुंबातील वाटाघाटींसंबंधी चर्चा कराल. तुमचे मत ग्राह्य धरले जाईल. व्यवसायात परिवर्तन संभवते.

मीन – तुमच्या बोलण्यातून कुणाचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. कायदा मोडून वागल्यास त्रास होईल.