मेष : राजकीय-सामाजिक कार्यासाठी गाठ-भेट घेता येईल. यश मिळेल. इतर लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला निश्चित निर्णय घेणे जमणार नाही.
वृषभ : नोकरीत वर्चस्व राहिल. जवळचे मित्र मदत करण्यास कमी पडतील. महत्त्वाची वस्तु नीट ठेवा. केस जिंकता येईल.
मिथुन : अस्थिर मनाने कोणताही निर्णय निश्चित करता येत नाही. घरगुती समस्या सोडवता येईल. आवडते पदार्थ मिळतील.
कर्क : धंद्यात हिशोब नीट करा. नवीन परिचय झालेल्या माणसावर जास्त भरवसा ठेऊ नका. कामाचा व्याप वाढेल.
सिंह : शेजारी तुमच्याकडे मदत मागण्यास येतील. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.
कन्या : योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करता येईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.
तूळ : तुमच्या योजनांना गती मिळेल. योग्य ती मदत मिळू शकेल. कोर्टकेस जिंकाल. बेकारांना नोकरी शोधता येईल.
वृश्चिक : प्रश्न निर्माण होईल. खर्च होईल. मार्ग दाखवणारी व्यक्ती भेटल्याने तणाव कमी होईल. रागावर ताबा ठेवा.
धनु : घरातील व्यक्तींना खुष कराल. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत केल्याने तुमच्या फायद्याचा विचार केला जाईल.
मकर : घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. जीनवासाठी बरोबर वाद होईल. मौल्यवान वस्तु नीट ठेवा. कल्पनाशक्ती वाढेल.
कुंभ : आज ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. मौज-मजा कराल. आवडते पदार्थ मिळतील. नवीन ओळख होईल.
मीन : खंबीर मनाने एखादा प्रश्न सोडवाल. संताप होईल. कायदा पाळा. वाहनाची काळजी घ्या. दुखापत टाळता येईल.