राशीभविष्य : शनिवार, १४ नोव्हेंबर २०२०

Horoscope 44
राशीभविष्य

मेष : तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. चौफेर सावध रहा. प्रतिक्रिया व्यक्त करताना काळजी घ्या. उतावळेपणा नको.

वृषभ : तुमच्या कार्यात वेगाने प्रगती होईल. धंद्यातील समस्या समजून घेता येईल. कामगारांना सांभाळून ठेवा.

मिथुन : धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. पाहुणे येतील. वरिष्ठांची मर्जी पाहून नोकरीत निर्णय घ्या. अहंकार नको.

कर्क : राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही प्रगती कराल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे कमी पणाचे नसते.

सिंह : धंद्यात सावध रहा. मोठे काम मिळेल. मोठेपणाची भावना ठेवल्यास अडचणी वाढू शकतात.

कन्या : तुमचे कार्य चालू राहील. धंद्यात सुधारणा होईल. मागील येणे वसूल करा. नवीन ओळख होईल.

तूळ : तुमच्या मार्गात चांगल्या लोकांचे सहकार्य मिळेल. प्रगती होईल. ओळखीचा उपयोग होईल. धंदा वाढेल.

वृश्चिक : मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. धंद्यात नोकरांना कमी समजू नका. मोठे लोक मदत करतील.

धनु : तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न वरिष्ठ करतील. गैरसमज करून दिला जाईल. धावपळ होईल. सावध रहा.

मकर : महत्त्वाच्या कामातील अडचण दूर करू शकाल. चर्चा सफल होईल. कोर्टकेस जिंकण्यात यश मिळेल. धंदा वाढेल.

कुंभ : क्षुल्लक कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. उत्साह असला तरी मनावर ताण राहील. खर्च करावा लागेल.

मीन : आज ठरविलेले काम पूर्ण करा. धंद्यात फायदा होईल. करार करताना बेसावध राहू नका. स्पर्धा जिंकाल.