राशीभविष्य गुरुवार २३ जुलै २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- तुमच्यावर भलताच आरोप होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. धावपळ होईल. विरोधकांना धक्का द्याल. कायदा पाळा.

वृषभ ः- महत्त्वाचे काम होईल. कायद्यात प्रगती कराल. कोर्ट केस यशस्वी होईल. धंदा वाढेल.

मिथुन ः- तुमचा प्रश्न सोडवण्याचा वरिष्ठ प्रयत्न करतील. सर्वांचे सहाय्य मिळेल. खर्च वाढेल.

कर्क ः- मान-प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वासाने महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात संयम ठेवा.

सिंह ः- शारीरिक श्रम होतील. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वाहन नीट चालवा. सौम्य धोरण ठेवा.

कन्या ः- महत्त्वाचे काम करून घ्या. सरकार दरबारातील प्रश्न सोडवा. कोर्ट केस जिंकाल.

तूळ ः- कामाचा व्याप वाढेल. एका कामातून दुसरे काम निर्माण होईल. अंदाज चुकेल.

वृश्चिक ः- आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. कोर्टाच्या कामात जिंकाल. धंद्यात नीट बोला.

धनु ः- किरकोळ अडचण येईल. वाहन जपून चालवा. थकबाकी वसूल करणे सोपे नाही.

मकर ः- घरगुती कामे होतील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल.

कुंभ ः- विरोधाचा सामना करता येईल. जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करा. धंदा मिळेल

मीन ः – मन अस्थिर होईल. व्यवसायाला मोठे स्वरुप मिळेल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल.