राशीभविष्य : गुरुवार,५ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष : क्षुल्लक कारणाने घरात वाद होईल. खाण्या-पिण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते. मोहाला बळी पडाल.

वृषभ : विचारांना चालना मिळेल. कोर्टाच्या कामात यशासाठी प्रयत्न करता येईल. मित्राची मदत घेता येईल.

मिथुन : तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. धंद्यात जम बसेल.

कर्क : अडचणी दूर करून यशाकडे जाता येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. सावधपणे व्यवहार करा.

सिंह : वाद होईल. घरातील माणसांना दुखवून चालणार नाही. धावपळ होईल. वस्तू नीट सांभाळा.

कन्या : तुमच्या बुद्धीचे कौतुक होईल. मोठी खरेदी करण्याचा विचार होईल. वस्तू नीट सांभाळा.

तूळ : ठरविलेल्या कामात बदल करावा लागेल. इतरांच्या मतानुसार तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तडजोड करा.

वृश्चिक : दादागिरी न करता तुमचे मत दुसर्‍यांना पटवून द्या. आवडते पदार्थ मिळतील. धंद्यात वाढ होईल.

धनु : जवळची व्यक्ती तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल. वरिष्ठांना खूश कराल. धंद्यात वाढ करा.

मकर : तुमच्या विचारांना चांगला प्रतिसाद मिळेल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. धंद्यात कष्ट घ्या.

कुंभ : तुम्ही केलेले परिश्रम सत्कारणी लागतील. धंद्यात सुधारणा होईल. कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल.

मीन : मनाची द्विधा अवस्था होईल. घरगुती कामे करून घेता येतील. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. राग आवरा.