राशीभविष्य : मंगळवार, १० नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष : उत्साहवर्धक घटना घडेल. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करू शकाल. आर्थिक उन्नती होईल.

वृषभ : तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. ओळखी होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे लागेल. कायदा पाळा.

मिथुन : क्षुल्लक वाद वाढण्याची शक्यता आहे. तुमचे गुपित उघड होऊ शकते. नोकरीत संयमाने वागा. प्रश्न सोडवा.

कर्क : ओळखी वाढल्याने तुम्हाला कामाला नवीन दिशा देता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. घरातील कामे होतील.

सिंह : धंद्यात जम बसेल. जमीन, घर या संबंधी कामे होतील. कोर्ट केस संपवता येईल. आनंदी रहाल.

कन्या : ताण-तणाव दूर होईल. इतरांना मदत कराल. धंद्यात चांगला फायदा होईल. स्पर्धा जिंकाल.

तूळ : रागाच्या भरात कुणालाही दुखवू नका. दुखापत संभवते. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल.

वृश्चिक : प्रेमाची व्यक्ती तुमची समस्या सोडवण्यात मदत करेल. कला-क्रीडा क्षेत्रात धाडसाचे कौतुक होईल.

धनु : खाण्याची काळजी घ्या. विसराळू पणाने एखादे काम राहून जाण्याची शक्यता आहे. पैसा देऊ नका. सावध रहा.

मकर : तुमचे काम पूर्ण कराल. मान-प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. कला क्षेत्रात विशेष मन रमेल.

कुंभ : विचारपूर्वक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. मुले आनंद देतील. नोकरीत चांगला बदल करता येईल.

मीन : प्रयत्नाला चांगले यश मिळेल. कठीण काम होईल. कोर्ट केस जिंकाल. कल्पनाशक्तीचा उपयोग होईल.