राशीभविष्य मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२०

Horoscope 44
राशीभविष्य

मेष : यश मिळवण्याचा वेगळा नवा मार्ग मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. विश्वासघातकी माणसे ओळखा.

वृषभ : झालेल्या चुका लक्षात येतील. त्या सुधारण्याची संधी मिळेल. धंद्यात फसगत होऊ शकेल.

मिथुन ः अचानक कामात बदल करावा लागेल. धंद्यात काम मिळेल. आळस करू नका. थकबाकी मिळवा.

कर्क : योजना मार्गी लावता येईल. धंद्यात जम बसवा. सामाजिक कार्यात मागे राहू नका. स्पर्धा वाढेल.

सिंह : घरगुती तणाव कमी होईल. ठरविलेले काम करून घेता येईल. कला क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

कन्या ः घरगुती तणाव कमी होईल. नवीन ओळख होईल. मैत्री वाढेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

तूळ : कोणतेही काम सावधपणे करा. दुखापत संभवते. वाद वाढवू नका. रस्त्याने चालताना काळजी घ्या.

वृश्चिक : सकाळी आलेली अडचण लंच टाईम पर्यंत निघून जाईल. घरगुती प्रश्नावर विश्वासार्ह चर्चा करता येईल.

धनु : धंद्यात काम मिळवताना काळजी घ्या. भावना व व्यवहार यांचा गोंधळ करू नका.

मकर : दौर्‍यात यश मिळेल. जुने मित्र भेटतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. कलेत चमकाल.

कुंभ : स्पर्धेत कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. आप्तेष्ठांची भेट होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

मीन : धंद्यात चांगली संधी मिळेल. नवीन ओळख होईल. महत्त्वाची वस्तू खरेदी कराल.