राशीभविष्य बुधवार ०५ ऑगस्ट २०२०

Horoscope 44
राशीभविष्य

मेष – नवीन ओळखीमुळे तुमच्या कार्याला दिशा मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळेल.

वृषभ – तुमच्या बोलण्या-वागण्यातील संयम तुम्हाला उपयुक्त ठरेल. धंदा वाढवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन – मनाची चंचलता होईल. स्पर्धेत चमकण्यासाठी जिद्द ठेवा. वाहनाशी खेळ करू नका.

कर्क – घरातील व्यक्तीच्या बरोबर वाद संभवतो. कामात चुका होणार नाही याकडे लक्ष द्या.

सिंह – उत्साहवर्धक वातावरण राहील. धंद्यातील उणीव भरून काढता येईल.

कन्या – गोडी गुलाबीने वागल्यास कामे पटापट होतील. अरेरावी करण्याची गरज नाही. वस्तू सांभाळा.

तूळ – तुमच्या कार्याला नवे वळण मिळेल. नवीन मित्र परिवार मिळेल. नावलौकिक वाढेल.

वृश्चिक- स्वभाव चिडचिडा होईल. माणसे तोडू नका. कष्टासाठी आळस केल्यास नुकसान होईल.

धनु – संसारात सुखद वातावरण राहील. प्रेमाचा अनुभव मिळेल. धंदा वाढेल. मागे राहू नका.

मकर- प्रश्न नीट शांतपणे समजावून घ्या. विरोधक तुमची चूक शोधण्याचा प्रयत्न करतील.

कुंभ -विचारांना लिखाणाला चालना मिळेल. कल्पना शक्तीचा विकास होईल. मित्र मिळेल.

मीन – कठीण प्रसंगावर कसा उपाय शोधावयाचा याचा अंदाज घेता येईल. जिद्दच यश देईल