राशीभविष्य : बुधवार, १८ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष : मुलांनी दिलेला सल्ला उपयुक्त ठरेल. मुले मदत करतील. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. धावपळ होईल.

वृषभ : तुम्ही ठरविलेले काम करण्याचा उत्साह राहील. मोठे लोक मदत करतील. नवीन ओळखी होतील. धंदा वाढवा.

मिथुन : आप्तेष्ठांची भेट होईल. धंद्यात चांगली सुधारणा करू शकाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

कर्क : धंद्यातील तणाव कुशलतेने मिटवा. जवळच्या माणसांची समस्या समजून घ्यावी लागेल.

सिंह : क्षुल्लक कारणाने नाराज होण्याची गरज नाही. धंद्यात वाढ होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : अडचणीवर मात करावी लागेल. खर्च वाढेल. धंद्यात तांत्रिक बिघाड होऊ शकतो. डोळे सांभाळा.

तूळ : तुमच्या कार्याला वेग प्राप्त होईल. थकबाकी वसूल करा. धंद्यात फायदा होईल. अंदाज घेता येईल.

वृश्चिक : तुमच्या प्रभावाखाली असलेले लोक तुमचे योग्य पद्धतीने समर्थन करतील. प्रेमाला चालना मिळेल.

धनु : आप्तेष्ठांच्या सहवासाने आनंदी व्हाल. धंद्यात वाढ करता येईल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल.

मकर : वरिष्ठांना उलटून बोलू नका. जवळची माणसे नाराज होऊ शकतात. खाण्याची काळजी घ्या. राग आवरा.

कुंभ : घरगुती कामे होतील. मौल्यवान खरेदीचा विचार कराल. विचारांना चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल.

मीन : रागामुळे तुम्ही संबंध बिघडवाल. नोकरांच्या बरोबर वाद होईल. कठोर शब्द दुसर्‍याला त्रास देतील.