राशीभविष्य बुधवार, १६ सप्टेंबर २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : ताण-तणावाचा सामना करावा लागेल. विरोधक आरोप करतील. मैत्री करण्याचा प्रयत्न करतील.

वृषभ : कायद्याचे पालन करा. निर्णय चुकण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.

मिथुन : आज ठरविलेले काम करून घ्या. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. धंद्यात वाढ होईल.

कर्क : कला-क्रीडा-साहित्यात चमकाल. प्रेमाला योग्य वळण देता येईल. नोकरीत फायदा होईल.

सिंह : नवीन ओळख फायदेशीर ठरेल. धंद्यात फायदेशीर योजना समोरून येईल. स्पर्धा जिंकाल.

कन्या : बुद्धिचातुर्याची छाप पडेल. कठीण काम करताना सावधपणा बाळगा. वाहन हळू चालवा.

तुला : अतिशयोक्तीपूर्ण वागणे टाळा. नवीन ओळख आकर्षक वाटेल. धंद्यात काम मिळेल.

वृश्चिक : मन अस्थिर होईल. तुम्ही जिद्द ठेवा. धंद्यात वाढ होईल. प्रवासात घाई करू नका.

धनु : आजचे काम उद्यावर टाकू नका. तुमचा प्रभाव पडेल. स्पर्धेत चमकाल. थकबाकी मिळवा.

मकर : तुमची योजना वेगाने पुढे जाईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यात फायदा होईल.

कुंभ : महत्त्वाचे काम आजच करा. अडचण आली तरी त्यावर मात करता येईल. कंटाळा येईल.

मीन : घरातील लोकांना खुष कराल. प्रवासाचा बेत ठरवाल. प्रेमाला चालना मिळेल.