राशीभविष्य शनिवार, २७ जून २०२०

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- पैशाची गरज पूर्ण होईल. कामाच्या वेळेत इतरांच्या चौकशी करण्यात वेळ घालवू नका. महत्वाचा दिवस राहिल.

वृषभ ः- मनावरील दडपण दूर होईल. आळस केल्यास संधी हुकेल. तडजोड करण्याने फायदा होईल.

मिथुन ः- स्पष्ट बोलणे दुसर्‍यांना त्रास ठरेल. वाहन जपून चालवा. कोर्ट केसमध्ये दगदग व धावपळ होईल.

कर्क ः- जुने संबंध सुधारतील. व्यवसायात सुधारणा करता येईल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.

सिंह ः- काम करण्याचा उत्साह वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. जागेचा प्रश्न सुटेल.

कन्या ः- मदत करण्याची संधी मिळेल. जुनावाद मिटवण्याची वेळ येईल. फायदा होईल.

तूळ ः- थकवा आला तरी उत्साह टिकेल. मोठे खरेदी कराल. महत्त्वाचा निर्णय सावधपणे घ्या. वस्तू सांभाळा.

वृश्चिक ः- जीवनाला मिळालेले वळण आनंद देणारे वाटेल. उत्साह वाढेल. काम करण्यास गती मिळेल.

धनु ः- विरोध होईल. रागाने समस्या वाढेल. कायद्या महत्वाचा असतो हे पहा.

मकर ः- मुलांच्या सुखाने भारावून जाल. गुंतवणूक वाढेल. प्रवास संभवतो. नविन संबंध जुळतील.

कुंभ ः- क्षुल्लक तणाव संभवतो. काम करण्यासाठी नियोजन करण्याची गरज असते.

मीन ः- नवा मार्ग मिळेल. खर्च वाढेल. मैत्रीचे बंध सुधारतील. प्रेमाची व्यक्ती मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here