राशीभविष्य गुरुवार, २५ जून २०२०

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. धंदा सुरू होईल. मित्रांची भेट होईल.

वृषभः- धंद्यात सावध रहा. नोकरवर्गाचा त्रास होऊ शकतो. खर्च होईल. वस्तूच्या मध्ये बिघाड होण्याचा संभव आहे.

मिथुन ः- मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. सहज फिरावयास जा म्हणजे मन उल्हासित होईल. आवडते पदार्थ खाता येतील.

कर्क ः- जे आहे त्यातच समाधान मानले तर काही समस्या कमी होतील. खाण्याची काळजी घ्या. खर्च कराल.

सिंह ः- मनावरील दडपण कमी होऊ शकेल. बाहेरचा तणाव घरात आणू नका. म्हणजे घरात तरी आनंदी वातावरण राहिल.

कन्या ः- धंदा वाढेल. जवळच्या व्यक्तीचा राग दूर करता येईल. खर्च होईल. धंद्यात पैशाची गुंतवणूक होईल.

तूळ ः- मनाची द्विधा अवस्था होईल. धंदा वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. कल्पना शक्तीला चालना मिळेल.

वृश्चिक ः- विचारांचा गुंता होईल. छोटासा प्रश्न सोडवण्यासाठी जास्त विचार केल्यास उत्तर अधिक कठीण होऊ शकते.

धनु ः- वेगाने पुढे जाता येईल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. प्रेमाला चालना मिळेल. विशेष यश मिळेल.

मकर ः- वाद नको. महत्वाचा प्रश्न सोडवा. यश मिळेल. गुप्त कारवायांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ ः- घरातील व्यक्तीच्या बरोबर वेळ खर्च करावा लागेल. खरेदी कराल. मौज-मजेत वेळ जाईल. मित्र भेटेल.

मीन ः- प्रवासात सावध रहा. कायद्या तोडल्यास दंड भरावा लागेल. अनाठाई वेळ व पैसा खर्च होऊ शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here