घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य मंगळवार, १२ मे २०२०

राशीभविष्य मंगळवार, १२ मे २०२०

Subscribe

मेष ःमुलांनी दिलेला सल्ला जास्त उपयोगी ठरेल. नवीन कामे मिळतील. ओळखीचा फायदा करून घ्याल.

वृषभ ःरस्त्याने चालताना वेंधळेपणा करू नका. खिसापाकिट नीट सांभाळा. खर्च जास्त कराल.

- Advertisement -

मिथुन ःसंधीचा सदुपयोग करण्याची गरज असते. स्पर्धेत जिंकाल. मेहनत कमी पडणार नाही.

कर्क ःधंद्यात मोठे काम मिळेल. प्रयत्न करा. मोठ्या लोकांच्या ओळखीने प्रभाव पडेल.

- Advertisement -

सिंह ःमनावरील ताण कमी होईल. समाजकार्यात सहभागी व्हाल. लोकांच्या कामात मदत करावी लागेल.

कन्या ःनातलगांच्या फोनमुळे मन अस्वस्थ होईल. खर्च अनाठाई करण्याची वेळ येईल. रस्त्याने सावध रहा.

तूळ ःतुमच्या मनातील ठरलेली कामे करून घ्या. नातलगांची भेट घेता येईल. धंद्यात फायदा होईल.

वृश्चिक ःगरज असलेला फोन येण्याची शक्यता आहे. वेळेला महत्त्व दिल्यास जास्त कामे होतील.

धनु ःनव्या विचाराने प्रेरित व्हाल. लिखाण होईल. नवीन ओळखीचा फायदा करून घेता येईल.

मकर ःविरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. खाण्याची काळजी घ्या. प्रवासात अडचण येऊ शकते.

कुंभ ःआजचे काम वेळेत पूर्ण करता येईल. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तयारी कराल.

मीन ःएखाद्या कामास थोडा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. कुणावरही जास्त भरवसा ठेऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -