राशिभविष्य : शुक्रवार, १६ ऑगस्ट २०१९

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष : तुमचा उत्साह वाढेल. नवे काम हाती घेता येईल. तुम्ही वेळेला नेहमीच महत्त्व देता हे उत्तम आहे.

वृषभ : कामाची ठरविलेली वेळ पाळता येईल. नविन ओळख होईल. वाटाघाटीत यश मिळेल.

मिथुन : गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांना खुष करता येईल. धंदा मिळेल.

कर्क : तुमचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. अरेरावी करू नका. विचारपूर्वक वाहन चालवा.

सिंह : आशेचा किरण तुम्हाला तुमच्या समस्येवर मिळेल. मेहनत घ्या. यश मिळवा. कमी बोला. राग आवरा.

कन्या : रेंगाळलेले काम गोड बोलून करून घ्या. वादाच्या प्रसंग निर्माण होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा.

तुला : विचारांना चालना मिळेल. कला-क्रिडा साहित्यात चमकाल. नोकरी लागेल. धंदा वाढेल.

वृश्चिक : क्षुल्लक तणाव वाढवू नका. संयमाने प्रश्न सोडवा. नविन ओळखीमुळे तुमच्या उत्साह वाढेल.

धनु : परिस्थिती सावरता येईल. प्रकृतित सुधारणा होईल. नविन ओळखीवर जास्त भरवसा ठेऊ नका.

मकर : धंद्यात मोठा फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. नविन ओळख प्रेरणा देणारी ठरेल.

कुंभ : कठीण प्रसंगावर मात करता येईल. प्रकृती सुधारेल. वस्तू सापडेल. तणाव कमी होईल.

मीन : मनाची द्विधा अवस्था होईल. धंदा मिळेल. रागावर ताबा ठेवा. खरेदी कराल.