राशी भविष्य २१ ते २७ एप्रिल २०१९

Mumbai
Horoscope 44
राशी भविष्य

मेष ः या सप्ताहात २२ एप्रिल रोजी गुरु ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य हर्षल युति होत आहे. तुमच्या राजकीय-सामाजिक कार्याला मिळालेली दिशा प्रगतीकारक असेल. तुमच्यावर टिकास्त्र सोडले जाईल. नातेसंबंध टिकवावे लागतील. धावपळीमुळे सप्ताहाच्या सुरुवातीला प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. काळजी घ्या. प्रवासात सावध रहा, संसारातील वाद चव्हाट्यावर आणू नका. धंद्यात नोकर माणसांच्या कुरबुरी राहतील. व्यवहारात भावनेला स्थान नसते. मैत्रीत दुरावा संभवतो. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. दादागिरीने वागून तुम्ही वाईट होऊ नका. संशोधनात यश मिळेल. वरिष्ठांना दुखवू नका. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवून परिश्रम घ्यावेत. शुभ दि. २४, २५

वृषभ ः २२ एप्रिल रोजी गुरु महाराज वृश्चिकेत वक्री, सूर्य शुक्र त्रिकोणयोग होत आहे. गुरुबल नव्याने सुरू झाले आहे. तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. धंद्यात वाढ करता येईल. जम बसवा. प्रयत्न जोरात करा. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्या. यश मिळेल. लोकांच्या बरोबर चर्चा करा. सौम्य धोरण ठेवा. अरेरावी करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढल्याने उत्साह वाढेल. नवे काम मिळेल. घरातील समस्या सोडवता येईल. सप्ताहाच्या मध्यावर रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. संशोधनाच्या कामात दगदग होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात पुढे जाता येईल. कोर्ट केसमध्ये नम्रपणेच बोला. शुभ दि. २६, २७

मिथुन ः– या सप्ताहात २२ एप्रिलला गुरू महाराज वृश्चिकेत वक्री, सूर्य हर्षल युती होत आहे. गुरुबल कमी झाले आहे. धंद्यात जम बसेल असे काम मिळेल. नवीन परिचय उपयुक्त ठरेल. प्रत्येक कार्यात राग वाढणार नाही याची काळजी घ्या. क्षुल्लक तणाव होऊ शकतो. सहनशीलता ठेवा. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. संसारात मुलांच्या प्रगतीने बरे वाटेल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. संशोधनाच्या कामात यश येईल. धावपळ वाढेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे प्रयत्न चालू ठेवावेत. यश खेचावे लागेल. शुभ दि. २४, २५

कर्क ः– वृश्चिक राशीत वक्री होणार्‍या गुरुमुळे तुम्हाला गुरुचे पाठबळ पुन्हा मिळणार आहे. चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर गुप्त कारवायांचा त्रास होईल. धंदा वाढवता येईल. थकबाकी मिळवता येईल. मोठी कामे मिळवा. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. पैसा मिळेल. सुधारण्याची संधी मिळेल. लोकांना एकत्र करता येईल. घरातील वाद मिटवता येईल. वाटाघाटीचा प्रश्न सुटेल. नोकरीत बदल होऊ शकेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. नवीन ओळख होईल. प्रेमाला चालना मिळेल. परदेशात जाण्यासाठी तयारी करता येईल. परीक्षेत यश येईल. वास्तु, वाहन खरेदी-व्रिकी लाभदायक ठरेल. शुभ दि. २६, २७

सिंह ः- या सप्ताहात २२ एप्रिल रोजी गुरु महाराज वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य हर्षल युती होत आहे. या सप्ताहात तुमच्या मनावर ताण येईल. त्यामुळे प्रत्येक काम करताना, निर्णय घेताना सावधपणे घ्या. बोलताना बेसावध राहू नका. धंद्यात समस्या येईल. भागीदार नाराज होईल. तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात तारेवरची कसरत करावी लागेल. मित्रपक्ष संशय घेईल. संसारात गैरसमज होईल. एखादा वाद कोर्टापर्यंत जाऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात नाव मिळेल. जवळचे लोक दुखावण्याची शक्यता आहे. व्यसनाने नुकसान होईल. प्रेमात तणाव होईल. संशोधनाच्या नादात अहंकारी वृत्तीने वागल्यास समस्या वाढेल. विद्यार्थ्यांनी सरळ मार्गाने अभ्यासच करावा. शुभ दि. २४, २५

कन्या ः– या सप्ताहात तुमची बरीच कामे मार्गी लावता येतील. २२ एप्रिल रोजी गुरु ग्रह वृश्चिकेत वक्री होत आहे. चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. कायद्याचे पालन करा. थकबाकी मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. अतिरेक मात्र कुठेही करू नका. नम्रपणे अभिवादन करा. लोकांना समजावून सांगा. त्यांच्या समस्या सोडवा. यशासाठी झगडावे लागेल. पण यश खेचता येईल. घरातील व्यक्ती तुमच्या पाठीशी असतील. नवे लोक जवळीक करतील. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. कौतुक होईल. घर, वाहन, जमीन खरेदी-व्रिकीत फायदा होईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. अधिकारी थाटात वागू नका. विद्यार्थी वर्गाने मोठ्यांच्या बरोबर नीट वागावे. यश मिळेल. शुभ दि. २६, २७

तूळ ः- गुरु महाराज वृश्चिकेत वक्री होत आहेत. सूर्य हर्षल युती होत आहे. तुमच्या सर्व कार्याला वेग येईल. कठीण कामे करून घ्या. धंद्यात भावनेच्या भरात उधारीवर जास्त माल देऊ नका. भलत्याच माणसावर विश्वास ठेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वरिष्ठांना कळेल. पदाधिकार मिळेल. सहकारी नेते थोडी कुरबुर करतील. सहनशीलता ठेवा. राग वाढवू नका. प्रत्येक दिवशी तुम्हाला यश मिळेल. नोकरी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व पैसा मिळेल. कोर्ट केस जिंकाल. नवीन ओळख झाली तरी सावधपणे व्यवहार करा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळवता येईल. वाहन, घर खरेदीचा विचार कराल. शुभ दि. २२, २४

वृश्चिक ः २२ एप्रिल रोजी तुमच्याच राशीत गुरु, ग्रह वक्री होत आहे. साडेसाती सुरू आहे. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. जीवनात कलाटणी देणारी घटना घडेल. अविवाहितांना स्थळे मिळतील. योग्य निवड करता येईल. काही ठिकाणी तुमच्यावर आरोप होतील. विरोधक तुमच्या चुका शोधून काढतील. कला-क्रीडा क्षेत्रात लोकांना तुमचे आकर्षण वाटेल. आर्थिक लाभ होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. कोर्ट केस सोपी नसली तरी आशायदायक वातावरण राहील. संशोधनाच्या कामात यश जिद्दीने मिळेल. खर्च वाढेल. घरातील व्यक्तींना खूश ठेवता येईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. नोकरी मिळेल. शुभ दि. २४, २५

धनु ः २२ एप्रिल रोजी गुरु महाराज वृश्चिकेत वक्री होत आहे. सूर्य हर्षल युती होत आहे. साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला समस्या येऊ शकते. कोणताही वाद वाढू शकतो. धंद्यात स्वतःच लक्ष द्या. फायदा मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात सावधपणे निर्णय घ्या. बोलताना कायदा पाळा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. आर्थिक लाभ होईल. कोणच्याही सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीबाबत स्वतःचे मन बनवू नका. दुसर्‍याच्या भरवशावर राहून शेळ्या टाकू नका. कोर्ट केसमध्ये सावध रहा. संशोधनाच्या कामात यश मिळेल. बुद्धिचा वापर करा. नोकरीत कायद्याचे पालन करा. शुभ दि. २६, २७

मकर ः- या सप्ताहात २२ एप्रिल रोजी गुरु वृश्चिकेत वक्री होत आहे. चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. गुरुबल पुन्हा सुरू झाले आहे. धंद्यातील समस्या कमी करून नव्याने बस्तान बसवता येईल. मोठे काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. नवीन दिग्गज लोकांचा परिचय होईल. आर्थिक सहाय्य मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव होईल. कायदा मोडू नका. संशोधनात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. २६, २७

कुंभ ः- वृश्चिक राशीत गुरु महाराज वक्री होत आहेत. सुर्य हर्षल युती होत आहे. या सप्ताहात तुम्ही तुमची कामे करून घ्या. धंद्यात मोठा बदल करू शकाल. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. लाभ मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या शेवटी संताप आणणारी घटना घडण्याची शक्यता आहे. संयम ठेवा. तुमची प्रतिष्ठा वाढेलच. कला, क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. नवीन लोकांचा सहवास मिळेल. परदेशात जाणण्याची संधी मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरी लागेल. संसारात शुभ समाचार मिळेल. घर, वाहन इ. मोठ्या खरेदी-व्रिकीत फायदा होईल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. २१, २३

मीन ः– वृश्चिक राशीत गुरु वक्री होत आहे. सूर्य हर्षल युती होत आहे. प्रत्येक दिवस तुमच्या कार्याला गतिमान करणारा असेल. प्रयत्न करा. उत्साहवर्धक वातावरण संसारात राहील. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभवाल. वरिष्ठ खूश होतील. दौर्‍यात यश मिळेल. लोकसंग्रह वाढेल. पद मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष कौतुक, पुरस्कार, लाभ मिळेल. कोर्ट केस संपवा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. घरातील लोकांच्या मर्जीनुसार वागता येईल. नोकरी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे पुढे जाता येईल. शुभ दि. २४, २६

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here