राशीभविष्य रविवार 10 नोव्हेंबर ते शनिवार 16 नोव्हेंबर २०१९

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष ः– या सप्ताहात तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश करीत आहे. ईदच्या दिवशी तुमच्या रागाचा पारा वाढू शकतो. धंद्यात सावध धोरण ठेवा. फसगत होईल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर एकदम भरवसा ठेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही जिद्द ठेवा. अरेरावी नको. घरात ताण वाढू शकतो. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. शोध मोहिमेत दगदग होईल. प्रकृतीची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. शिक्षणात आळस नको. शुभ दि. ११, १२

वृषभ ः या सप्ताहात तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश करीत आहे. धंद्यात तुमचा अंदाज चुकेल. कामगारांना दुखवू नका. नवे काम गोड बोलून मिळवा. राजकीय-सामाजिक नम्रता ठेवा. पदाधिकारीसाठी वाट पहावी लागेल. जीवनसाथी, मुले यांना कडक भाषेत बोलू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीत टिकून रहा. शोध मोहिमेत बुद्धिचातुर्याने जिंकावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागेल. कोर्ट केस सोपी नाही. दूरच्या प्रवासात जाण्याचा विचार कराल. शुभ दि. १५, १६

मिथुन ः– तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंदा चांगला होईल. नवे काम मिळवा. घरात किरकोळ कारणाने मतभेद होईल. जास्त महत्त्व त्याला देऊ नका. नोकरीत वर्चस्व राहील. नम्रता ठेवा. राजकीय सामाजिक कार्यात तुमची प्रगती पाहून इतरांना द्वेष वाटेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. मोहात अडकाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळवता येईल. कोर्ट केसमध्ये दिशा मिळेल. शिक्षणात आळस नको. पुढे जाता येईल. शुभ दि. १०, ११

कर्क ः- या सप्ताहात तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश करीत आहे. वाहनाचा वेग कमी ठेवा. रस्त्यात वाद वाढवू नका. धंद्यात नवे काम मिळेल. नोकरांना कमी समजू नका. कडक शब्दात बोलू नका. नोकरीत वरिष्ठांना खूष करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात परिस्थितीचा नीट अभ्यास करा. तुमचे व्यक्तिमत्त्व बदलण्याची वेळ येईल. घरात चांगली घटना घडेल. शोध मोहीम यशस्वी कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शिक्षणात मार्ग मिळेल. संगत चांगली ठेवा. शुभ दि. १०,११

सिंह ः- या सप्ताहात तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश करीत आहे. ईदच्या दिवशी समस्या येऊ शकते. दगदग होईल. धंद्यात नवे काम मिळेल. गोड बोलून चर्चा करा. नोकर मिळतील. नोकरीत टिकून रहा. घरातील कामे होतील. एखाद्या प्रश्नावर वाद होईल. खर्च वाढेल. अरेरावी राजकीय-सामाजिक कार्यात उपयोग पडणार नाही. निर्णय घाईत घेऊ नका. शोध मोहीम यशस्वी करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. शिक्षणात फक्त स्वप्न पाहू नका. विरुद्धलिंगी व्यक्तीचा प्रभाव तुमच्यावर राहील. शुभ दि. ११, १२

कन्या ः- या सप्ताहात तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात घाई करू नका. दुखापत होऊ शकते. रागावर ताबा ठेवा. धंद्यात प्रगती होईल. मोठे कंत्राट मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. नवीन ओळखी होतील. शोध मोहीम फत्ते कराल. स्पर्धेत प्रगती होईल. शिक्षणात आळस नको. पुढे जाल. नोकरी मिळेल. जिद्द ठेवा. व्यसन नको. शुभ दि. ११, १५

तूळ ः– तुमच्याच राशीत या सप्ताहात मंगळ, वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसेल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा. पैसा नीट गुंतवा. ग्रहांची साथ आहे. प्रयत्न करा. कर्जाचे काम होईल. राजकीय-सामाजिक कार्यात पद मिळेल. नवीन ओळखी मोठ्या लोकांच्या होतील. फायदा करून घ्या. घरात शुभ घटना घडेल. विवाहासाठी प्रयत्न करा. नोकरीत चांगला बदल करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्ट केस जिंकाल. शिक्षणात प्रगती होईल. आळस नको. शुभ दि. ११,१२

वृश्चिक ः- या सप्ताहात तूळ राशीत मंगळ, तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. साडेसाती चालू आहे. प्रवासात जपून रहा. वाहनाचा वेग कमी ठेवा. धंद्यात गोड बोलून काम करा. नोकरांना कमी समजू नका. नोकरीत कामाचा व्याप सप्ताहाच्या सुरुवातीला वाढेल. संसारात चांगला बदल करता येईल. विवाह, संतत्तीप्राप्तीचा प्रयत्न करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात लोकांचा कल पाहून निर्णय घ्यावा लागेल. तुमचा व्यवहारी स्वभाव दिसून येईल. शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. शुभ दि. १३, १४

धनु ः- या सप्ताहात तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश होत आहे. धंद्यात उतावळेपणा करून चालणार नाही. जास्त मोहापाई अडचणीत याल. महत्त्वाची वस्तू सांभाळा. नोकरीत वाद वाढवू नका. वरिष्ठांची मर्जी राखा. प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबातील वाटाघाटीचा प्रश्न कठीण असेल. नाराजी होईल. तुमच्या मनावर राजकीय-सामाजिक कार्यात दडपण येईल. शोध मोहिमेत दगदग होईल. अंदाज नीट घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात नाराज न होता कष्ट घ्यावे. कोर्ट केसमध्ये परिस्थितीचा नीट अभ्यास करा. शिक्षणात कष्ट घ्या. आळस नको. शुभ दि. १७,२०

मकर ः– या सप्ताहात तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश होत आहे. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. धंद्यात काम मिळेल. त्याकडे लक्ष पुरवा. मागिल येणे वसूल करा. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. योग्य सल्ल्याने निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. व्यवस्थित कामाची आखणी करा. कार्य करत रहा. लोकांची समस्या समजून घ्या. त्यांच्यात मिसळा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रभाव दिसेल. शोध मोहीम यशस्वी होईल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात चांगली संगत ठेवा. कष्ट घ्या. यश मिळेल. शुभ दि. २२, २३

कुंभ ः– या सप्ताहात तूळ राशीत मंगळ व वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळेल. क्षुल्लक कारणाने वाद होऊ शकतो. सावध रहा. प्रवासात घाई नको. नोकरीत चांगला बदल करण्याचा विचार करता येईल. घरातील कामे होतील. दगदग वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव दिसेल. तुमचा मुद्दा प्रसिद्ध होईल. लोकप्रियता मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. लाभ होईल. कोर्ट केस संपवा. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात मागे राहू नका. शिस्त ठेवा. पुढे जाल. शुभ दि. २०, २१

मीन ः– या सप्ताहात तूळेत मंगळ, वृश्चिकेत सूर्य प्रवेश करीत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. छोट्या व्यक्तीला कमी समजू नका. नम्रपणे बोला. प्रवासात घाई नको. वाहन जपून चालवा. नोकरीत प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात पदाधिकाराची शक्यता वाढेल. योजना पूर्ण करा. कला-क्रीडा क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. शोध मोहीम यशस्वी होईल. शिक्षणात पुढे जाता येईल. कोर्ट केसमध्ये दिलासा मिळेल. कठोर बोलणे घातक ठरेल. शुभ दि. २२, २३