Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य राशीभविष्य रविवार 15 मार्च ते 21 मार्च 2020

राशीभविष्य रविवार 15 मार्च ते 21 मार्च 2020

Related Story

- Advertisement -

मेष : या सप्ताहात चंद्र बुध लाभयोग, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. अरेरावी न करता वसुली करा, काम मिळवा. नोकरीत अधिकारी वर्गाच्या इच्छेनुसार कामाची पद्धत ठेवावी लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही गोड बोलून त्यांच्या चूका दाखवा. वचक वाढेल. संसारातील समस्या कमी करण्यात कला-क्रीडा क्षेत्रात ओळखीतून काम मिळू शकेल. कोर्टाच्या कामात कायदा पाळा. यश मिळेल. शोध कार्यात क्षुल्लक मतभेद होईल. परिक्षेत यश मिळेल. आळस करू नका. शुभ दि. १७,1८

वृषभ : सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र, मंगळ युती या सप्ताहात होत आहे. धंद्यात काम मिळाले तरी छोट्या समस्या येतील. रागावार मात करावी लागेल. प्रवासात सावध रहा. नोकरीत काम वाढले तरी इतरांना त्याच्या दोष न देता काम करावे लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना महत्व देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जवळचे लोक तुमच्यावर टिका करतील. मोहाचे जाळे तुमच्याभोवती टाकले जाईल. मुले, जीवनसाथी यांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल. खर्च वाढेल. वस्तु नीट सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात मैत्रीत वाद संभवतो. शोध कार्यात धावपळ होईल. पण यश मिळेल. शुभ दि. १९, २०

- Advertisement -

मिथुन ः चंद्र शुक्र त्रिकोणयोग, सूर्य चंद्र लाभयोग या सप्ताहात होत आहे. घरातील कामांना महत्व द्या. मुलांच्या प्रगतीने खूश व्हाल. नवीन ओळखातून धंदा मिळवता येईल. वसुली करता त्याच्या उपयोग होईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. प्रगतीची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. दिलेला शब्द पाळा लोकप्रियता मिळेल. कला-क्रीडा विभागात प्रसिद्धी मिळेल. लाभ मिळेल. शोध कार्य यशस्वी कराल. वाहन हळू चालवा. कोर्टकेस यशस्वी कराल. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. शुभ दि. १७, १८

कर्क : या सप्ताहात चंद्र शुक्र त्रिकोणयोग, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. नोकरीत समस्या सोडवता येईल. कठीण करून घेता येईल. धंद्यात मनाविरुद्ध निर्णय घेण्याची वेळ येईल. कमी फायद्याचे काम मिळेल. तडजोड करावी लागेल. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव, गैरसमज कसे दूर करावयाचे याचा विचार करता येईल. सौम्य धोरण ठेवा. जनहितासाठी काम करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कल्पनाशक्तिला वाव मिळेल. शोध मोहिमेत जिद्दीने यश मिळवाल. परिक्षेसाठी जास्त अभ्यासाची तयारी करा. शुभ दि. १५, १९

- Advertisement -

सिंह : या सप्ताहात चंद्र शुक्र त्रिकोणयोग चंद्र मंगळ युती होत आहे. धंद्यात काम घेऊन ठेवा. लवकरात लवकर पूर्ण करा. जमिन, घर यासंबंधी आर्थिक व्यवहार सावधपणे करा. सौम्य धोरण उपयोग पडेल. नोकरीत अधिकारी वर्गाचा दबाव वाढेल. जबाबदारी वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती तुमची होईल. सहनशीलतेचा अंत पाहिला जाईल. अरेरावी चालणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. ओळखी होतील. शोध मोहीम कठीण वाटेल. कोर्टकेस मध्ये कायदा पालन करा. शुभ दि. १७,२१

कन्या ः या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र मंगळ युती होत आहे. धंद्यात तुमचा विचार चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे विचार करा. वाद टाळणे सोपे नाही. टिका कमी करा. नोकरीतील तणाव कमी होऊ शकेल. मैत्रीत वाद होईल. नाराजी होईल. घरातील समस्या किचकट वाटतील. आप्तेष्ठांची मर्जी राखणे त्रासदायक वाटेल. राजकीय-सामाजिक कार्यात मोहाचे क्षण टाळावे लागतील. व्यसनाने नुकसान होईल. शोध मोहिमेत यश मिळेल. प्रतिष्ठा सांभाळता येईल. कोर्टाच्या कामात बुद्धिचातुर्य जास्त उपयुक्त ठरेल. चांगली संगत ठेवा. शुभ दि. १९,20

तूळ ः या सप्ताहात चंद्र बुध लाभयोग, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात गोड बोलून रहावे लागेल. नवीन काम मिळवता येईल. जुने येणे वसुल करा. रागात बोलून चालणार नाही. नोकरीत अधिकारी वर्गाला मदत करावी लागेल. मनाची द्विधा अवस्था एखादा निर्णय घेता येऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे ठाम मत देण्याची घाई करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात नवे मित्र मिळतील. नवे शिकण्यास मिळेल. शोध मोहिमेत संयम ठेवा. यश मिळवता येईल. परिक्षेसाठी तयारी नीट करा. यश दूर नाही. शुभ दि. १६,१७

वृश्चिक ः या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, मंगळ गुरु युती होत आहे. तुमच्या धाडसी निर्णयाला विरोध होऊ शकतो. घरातील लोक नाराज होऊ शकतात. धंद्यात लक्ष द्या. आळस नको. प्रवासात घाई नको. अनोळखी व्यक्तीला मदत करताना काळजी घ्या. पैशाच्या मोहाने शेअर्सचा अंदाज चुकू शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात प्रवासात खाण्याची काळजी घ्या. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. अनाठाई खर्च झाल्याचा आरोप जनता करेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. शोध मोहिमेत बाजी माराल. परीक्षा उत्तम होईल. शुभ दि. १७. १९

धनु ः– या सप्ताहात चंद्र शुक्र त्रिकोण योग, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळाल्याने उत्साह वाढेल. मागिल येणे वसुल होईल. नोकरीत कामाचा व्याप राहिल तरीही तुम्ही प्रभाव पाडू शकाल. राजकीय-सामाजिक कार्यात दगदग होईल. मोठ्या लोकांच्या ओळखीने कला-क्रीडा क्षेत्रात नवी दिशा मिळेल. नावलौकिकात भर पडेल. दुखापत, ऑपरेशनाची वेळ येऊ शकते. शोध मोहिमेत किरकोळ समस्या येईल. परिक्षेसाठी चांगली मेहनत घ्या. त्यामुळे उत्तम यश मिळेल. शुभ दि. 19,20

मकर ः– चंद्र बुध लाभयोग, सूर्य चंद्र लाभयोग या सप्ताहात होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम मिळवा. कर्जाच्या संबंधी असलेले काम करून घेता येईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जी राखता येईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जी राखता येईल. घरातील व्यक्तीचा बरोबर किरकोळ वाद होईल. मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख होईल. अनुभवी जुन्या लोकांचा सल्ला उपयोगी येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात सप्ताहाच्या शेवटी यश मिळेल. शोध मोहीम यशस्वी कराल. परिक्षेसाठी जास्त मेहनत घ्या. शुभ दि.१९,२०

कुंभ ः- या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र गुरु युती होत आहे. धंद्यात फायदेशीर योजना मिळेल. भागीदाराच्या बरोबर एकमत होईल. मागिले येणे वसुल करा. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. परदेशात कंपनी द्वारा जाता येईल. घर, वाहन, जमिन घेण्याचा विचार करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात लोकांच्या मध्ये मिसळून त्यांच्या समस्या ऐकून घेता येतील. नवे कार्य करता येईल. मान-प्रतिष्ठा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. ओळखी वाढतील. त्यामुळे उत्साहात भर पडेल. शोध मोहीमेत पुढे जाल. शुभ दि. 16, 17

मीन ः– या सप्ताहात चंद्र शुक्र त्रिकोणयोग मंगळ गुरु युती होत आहे. संताप माणसाला रसातळाला नेतो. धंद्यात सौम्य शब्दात बोला. थोडी सहनशीलता ठेवण्यास फायदा होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. ओळखीतून नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. घरातील वाद मिटवता येईल. घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामजिक कार्यात झालेला गैरसमज बाजूला सारता येईल. नावलौकिक वाढवणारी कामे करता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोध मोहिमेत बाजी माराल. विद्यार्थी वर्गाने प्रगतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. यश मिळेल. मेहनत घ्या. शुभ दि ११, 14

- Advertisement -