Wednesday, January 20, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य राशीभविष्य रविवार 15 सप्टेंबर ते शनिवार 21 सप्टेंबर २०१९

राशीभविष्य रविवार 15 सप्टेंबर ते शनिवार 21 सप्टेंबर २०१९

Related Story

- Advertisement -

मेष ः- कन्या राशीत सूर्य प्रवेश, बुध हर्षल बडाष्टक योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात वाद होईल. गिर्‍हाईक तुटणार नाही याकडे लक्ष द्या. घरात समस्या येईल. आपसांत गैरसमज होईल. एखाद्या व्यक्तीचा दुरावा संभवतो. राजकीय-सामाजिक कार्यात बोलणी करताना, चर्चा करताना सावध रहा. तुमचे बोलणे कठोर वाटेल. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत जास्त घ्या. नोकरीत लक्षपूर्वक काम करा. कायदा मोडू नका. कोर्टकेस कठीण असेल. शोध कार्यात योग्य व्यक्तीकडून माहिती घ्या. चांगली संगत ठेवा. सरळमार्गी रहा. संकटात सापडाल. शुभ दि. 20,21

वृषभ ः या सप्ताहात कन्या राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात नवा प्रयोग यशस्वी करता येईल. मागिल येणे वसूल करा. नवे मित्र मैत्रीसाठी येतील. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना महत्त्व द्या. महत्त्वाची कामे करा. नोकरीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करता येईल. चांगला बदल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. शोध कार्यास यश मिळेल. घर घेण्याचा विचार कराल. प्रेमाला चालना मिळेल. शिक्षणात मागे राहू नका. जीवनाला योग्य वळण लावा. शुभ दि. 15,16

- Advertisement -

मिथुन ः- कन्या राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या शेवटी घरात किरकोळ वाद होईल. राजकीय-सामाजिक कार्याला वेग येईल. लोकांच्या प्रश्नावर तोडगा शोधा. लोकप्रियता मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मैत्री करणारे लोक जवळीक करतील. नोकरीत जबाबदारी वाढेल. कोर्टाच्या कामात नेमकेच मुद्दे मांडा. शोध कार्यात यश मिळेल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल. विद्यार्थी वर्गाने वेळ फुकट घालवू नये. अभ्यास प्रामाणिकपणे करावा. सप्ताहाच्या शेवटी पोटाचा त्रास होईल. शुभ दि. 16.17

कर्क ः– कन्या राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट मिळवता येईल. मागिल येणे वसूल करा. नवीन ओळखीचा उपयोग राजकीय-सामाजिक कार्यात करता येईल. योजनांना पूर्ण करू शकाल. लोकप्रियता मिळेल. घरातील कामे होतील. घर, जमीन, खरेदी-विक्रीत फायदा होईल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने गुंतवणूक करता येईल. नोकरीत प्रभाव वाढेल. चांगली संधी मिळेल. परदेशात जाता येईल. शोध कार्यास प्रगती होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा. शिक्षणात यश मिळेल.

- Advertisement -

सिंह ः- कन्या राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात तुम्ही आत्मविश्वासाने प्रगती करू शकाल. रागाचा पारा वाढू शकतो. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात सावध रहा. दुखापत होऊ शकते. घर, जमीन, संबंधीची कामे करता येतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. वाटाघाटीच्या चर्चेत यश मिळेल. लोकप्रियता व आर्थिक सहाय्य मिळवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ओळखी वाढतील. कोर्टकेस जिंकाल. कुटुंबात सुखद वातावरण राहील. शिक्षणात मनाप्रमाणे यश मिळेल. शोध कार्यात वरिष्ठ खुश होतील. शुभ दि. 17,18

कन्या ः- तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. सप्ताहाच्या मध्यावर प्रवासात सावध रहा. क्षुल्लक वाद वाढवू नका. मोठे कंत्राट मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मोठ्या लोकांचा परिचय होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. योजनांना पूर्ण करता येईल. नोकरीत फायदा होईल. वरिष्ठ खुश होतील. संसारात शुभ घटना घडेल. विवाहासाठी चांगली स्थळे मिळतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळखी होतील. प्रेमाला चालना मिळेल. शोध कार्य पूर्ण होईल. शिक्षणात मोठे यश मिळेल. शुभ दि. 20,21

तूळ ः- कन्या राशीत सूर्य प्रवेश, सूर्य चंद्र बडाष्टक योग होत आहे. धंद्यात चर्चा करताना संयम ठेवा. चुकून एखादा शब्द कठोर वाटेल. बुद्धिचातुर्य वापरा. अरेरावी करून चालणार नाही. तुमच्या विरोधात काही लोक जातील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा पटणे कठीण आहे. मानसिक त्रास होईल. शारीरिक दगदग होईल. घरात तणाव होईल. गैरसमज होईल. कला-क्रीडा क्षेत्रात तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. निराश व्हाल. कोर्टकेसमध्ये कायदा पाळा. अडचणी येतील. शोध कार्यास दिशा चुकेल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. चांगली संगत ठेवावी. शुभ दि. १७, १८

वृश्चिक ः- कन्या राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात वाढ करण्याच्या प्रयत्नाला यश मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. नवा फंडा उपयोगी पडेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे कौतुक होईल. लोकांच्या समस्या सोडवण्याची संधी सोडू नका. नोकरीत बदल केलेला फायद्याचा ठरू शकतो. अविवाहितांना विवाहासाठी योग्य स्थळे मिळतील. घरातील कामे होतील. कर्जाचे काम मार्गी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन परिचय उत्सावर्धक ठरेल. तुमची प्रगती होईल. शोध कार्यास सप्ताहाच्या मध्यावर धावपळ होईल. शिक्षणात यश मिळेल. शुभ दि. 20,21

धनु ः- कन्या राशीत सूर्य प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय व्यवसायात घेता येईल. कामात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधाचा सामना करून यश मिळवता येईल. योजनांच्या मागे लागून त्या पूर्ण करा. घरातील लोकांच्या मदतीने वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. आप्तेष्ठ भेटतील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्टकेस जिंकाल. शोध कार्य होईल. वरिष्ठ कौतुक करतील. विद्यार्थी वर्गाला ध्येयासाठी प्रयत्न करता येतील. शुभ दि. 16,17

मकर ः– कन्या राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र, त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील वाद कमी होईल. नोकर मिळतील. कामही मिळेल. शेअर्समध्ये पैसा गुंतवण्यासाठी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. फायदा होईल. राजकीय-सामाजिक कार्यात झालेला गैरसमज दूर होईल असे काम करा. लोकप्रियता मिळेल. योजनांना पूर्ण करा. प्रत्येक संधी महत्त्वाची ठरेल. घरातील तणाव, चिंता कमी होईल. कुटुंबातील वाटाघाटी करता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. बदल होईल. शिक्षणात प्रगती होईल. शोध कार्यास यश मिळेल. शुभ दि. 20,21

कुंभ ः– कन्या राशीत सूर्य प्रवेश, सूर्य चंद्र बडाष्टक योग होत आहे. धंद्यात फायदा होणारे मोठे काम मिळण्याची शक्यता आहे. कामगार लोक त्रस्त करतील. घरात मनस्ताप होईल. दगदग होईल. क्षुल्लक कारणाने नाराजी होईल. खर्च वाढेल. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विरोधात बोलले जाईल. इतरांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. अपरिचीत व्यक्तीपासून सावध रहा. कोर्टकेसमध्ये फसगत होऊ शकते. शोध कार्य हिमतीने पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाने नम्र रहावे. व्यसन करू नये. शुभ दि. १५, १६

मीन ः– कन्या राशीत सूर्य प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील समस्या कमी होऊन नवे काम मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. योग्य ठिकाणी पैसा गुंतवता येईल. नोकरीत जम बसेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घर, जमीन, खरेदी-व्रिकीत फायदा होईल. राजकीय-सामाजिक कार्याला गती मिळेल. आर्थिक सहाय्य करणारे लोक मिळतील. घरातील वाद मिटेल. सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. ओळखी वाढतील. कोर्टकेस संपवता येईल. शैक्षणिक क्षेत्रात नवे पाऊल उचलता येईल. शोध कार्य पूर्ण कराल. शुभ दि. १७, १९

- Advertisement -