Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य राशीभविष्य रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर २०१९

राशीभविष्य रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर २०१९

Related Story

- Advertisement -

मेष ः- या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, शुक्र नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्यात समस्या मोठी असेल. तुमच्या बोलण्यातून अधिक वाद वाढू शकतो. तुमचे गत सत्य असले तरी तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची तडजोड करावीच लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात निरुत्साह वाढेल. तरुण वर्गाला नवे शिक्षण देऊन त्यांना तयार करा. ही परिस्थिती पुढे बदलणार आहे. मैत्री करा. नवीन ओळख झालेल्या माणसांवर एकदम विश्वास टाकणे धोक्याचे ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रातही काळजी घ्या. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीमध्ये काम करताना चूक होईल. शोध कार्यात जिद्द ठेवा. विद्यार्थी वर्गाने बेफीकीरीने वागू नये. वृद्धांची काळजी वाटेल. शुभ दि. २२, २३

वृषभ ः या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, बुध गुरु लाभयोग होत आहे. धंद्यातील महत्त्वाची कामे करून घ्या. आळस करू नका. पुढे वेळ पडेल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्याला योग्य दिशा देऊन योजना पूर्ण करा. लोकप्रियता मिळेल. दौर्‍यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. ओळखी होतील. चांगले मित्र ओळखून ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केस संपवा. शोधकार्यात यश मिळेल. प्रेम प्रकरणाला योग्य वळण देऊन जीवन सुरू करता येईल. घर घेण्याचे विचार यशस्वी होतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष द्यावे. स्वतःचे हित साधावे. शुभ दि. २६, २७

- Advertisement -

मिथुन ः– या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. तुमची वाटाघाटीची चर्चा सफल होईल. नवे मित्र मिळतील. त्यांच्याकडून विशेष प्रेरणा मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. तुमच्या मनातील विचार सांगता येईल. घर, दुकान घेणेबाबत ठरवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात लोकांच्या हितासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा. वडिलधार्‍या व्यक्तींचा मान ठेवा. घरातील कामे होतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेलच असे समजू नका. तटस्थ रहा. प्रयत्न करा. शोध कार्यात यश मिळेल. कोर्ट केसमध्ये योग्य सल्ल्याने मुद्दे ठरवा. विद्यार्थ्यांनी ध्येय सोडू नये. शुभ दि. २३, २४

कर्क ः– या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, बुध, गुरू लाभयोग होत आहे. धंद्यात तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. मोठे काम मिळेल. मागिल येणे वसूल करा. योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. भविष्यासाठी उपयोग होईल. नोकरीत मनाप्रमाणे प्रगती होईल. वरिष्ठ कौतुक करतील. घरातील व्यक्तींना खुश करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने कार्य करा. दौरा करा. लोकांच्या समवेत रहा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केस लवकर संपवा. शोध कार्य व्यवस्थित होईल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. नवे मित्र मिळतील. शुभ दि. २६, २७

- Advertisement -

सिंह ः– या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या कमी होईल. ओळखी वाढतील. नवे काम मिळेल. उत्साह वाढेल. खर्च वाढेल. नोकरीतील कामे व्यवस्थित पूर्ण कराल. बदलण्याची चांगली संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात चर्चा प्रभावी होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. दौर्‍यात यश मिळेल. घरात सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक वाद संभवतो. डोळ्यांची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कोर्ट केस जिंकाल. शोध कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला वरिष्ठ जबाबदारी देतील. यशाचा चांगला मार्ग मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. परंतु घाई करू नका. शुभ दि. २२, २३

कन्या ः– तुमच्याच राशीत या सप्ताहात मंगळ प्रवेश, बुध, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यातील चूक सुधारता येईल. कामगार मिळतील. आत्मविश्वास वाढेल; पण रागावर ताबा ठेवा. थकबाकी वसूल करता येईल. नोकरीत चांगली प्रगती करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांना खुश करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. दौर्‍यात यश मिळेल. लोकांच्या हितासाठी योजना करा. पुढील वर्षी तुमच्या कार्याची आठवण त्यांना झाली पाहिजे. कला-क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी कराल. तुम्हाला नवे मित्र मिळतील. कोर्ट केस जिंकाल. शोध कार्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थी वर्गाने स्वतःच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष द्यावे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. २४, २५

तूळ ः- या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात फारच सावध भूमिका घ्या. कामगार, गिर्‍हाईक यांना कमी समजू नका. वादाचा प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. नवीनच ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर व्यवहार करताना काळजी घ्या. हिशोब नीट करा. नोकरीत वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. काम वाढेल. मित्र, सहकारी यांची मदत मिळणे कठीण होईल. स्पर्धा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात तुम्ही टिकून राहण्याचा प्रयत्न करा. कोर्ट केस लांबणीवर टाका. शोधकार्य करताना संयम ठेवा. बुद्धि वापरा. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. वाहनाचा वेग कमी ठेवा. विद्यार्थी वर्गाने चिडचिड न करता वडिलाधार्‍या व्यक्तीशी नीट वागावे शुभ दि. २२, २३

वृश्चिक ः– या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला किरकोळ अडचण येईल. धंद्यात वाढ करता येईल. ओळखीचे लोक संबंध नव्याने ठेवतील. मोठे कंत्राट मिळेल. नोकरीत बदल करता येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कार्याचे कौतुक होईल. नवे काम हाती घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. नवे मित्र मिळतील. उत्साह वाढेल. प्रकृतीत सुधारणा होईल. विवाहासाठी स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. शोधकार्य पूर्ण कराल. कोर्ट केस यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे प्रगती करता येईल. शुभ दि. 24, २५

धनु ः- या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. वेळच्या वेळी थकबाकी वसूल करा. ओळखीतून काम मिळवा. नोकरीत वर्चस्व राहील. फायदेशीर बदल शक्य होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे नावलौकिक वाढेल. लोकांना खुश करता येईल. आर्थिक सहाय्य सामाजिक कार्याला मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कौतुक होईल. नवे काम मिळेल. कोर्ट केस आशादायक ठरेल. शोधकार्य पूर्ण करून वरिष्ठांना खुश कराल. विद्यार्थी वर्गाने वर्ष फुकट जाऊ नये म्हणून अभ्यास करावा. घरातील वातावरण आनंदी राहील. नव्या घराचा विचार कराल. शुभ दि. 22,23

मकर ः- या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, बुध गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. या सप्ताहात प्रत्येक कामास विलंब लागेल. अडचण येईल. तुम्ही जिद्दीने सर्व कामे करा. नोकरीत कामांचा व्याप वाढेल. घरगुती अडथळे आल्याने तुम्हाला कामाकडे लक्ष देण्यास कमी वेळ मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्या. मान-प्रतिष्ठा वाढेल. लोकांच्या बरोबर संवाद साधा. त्यामुळे कोणत्या प्रकारे योजना पाहिजे हे शिकाल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण राहील. कौतुक होईल. पुरस्कार मिळेल. कोर्ट केसमध्ये तुमचे मुद्दे प्रभावी ठरवण्यासाठी चांगला अभ्यास करा. लवकरच केस मिटवा. विद्यार्थी वर्गाला पुढे जाता येईल. शुभ दि. 24,25

कुंभ ः- या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, बुध नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्यात तणाव होईल. धावपळ होईल. भागिदार कटकट करण्याची शक्यता आहे. फसगत होईल, त्यामुळे व्यवहार सावधपणे करा. गोड बोलून पैसे उकळले जातील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होईल. प्रवासात धोका होऊ शकतो. वाहन जपून चालवा. तुमचे अस्तित्व, स्थान मिटवण्याचा विचित्र घाट घातला जाईल. तुम्ही त्याच गंभीरपणे अभ्यास करून ठेवा. पुढे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत पडेल. कोर्ट केस पुढे टाकणे ठिक राहील. योग्य सल्ला घ्या. विद्यार्थ्यांनी नम्र रहावे. संगत उत्तम ठेवा. शुभ दि. २२, २३

मीन ः- या सप्ताहात कन्या राशीत मंगळ प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. तुम्ही आत्मविश्वासाने धंद्यात जम बसवा. नवे कंत्राट मिळवा. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील समस्या कमी होईल. तुमच्या बाजूने वरिष्ठ बोलतील. चांगला बदल करण्याचा प्रयत्न करा. घर, जमीन, दुकान खरेदी-विक्रीत फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल. घरातील तणाव मिटेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. नवीन ओळखी होतील. त्यामुळे तुमच्या कार्याला गती मिळेल. शोधकार्य पूर्ण होईल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे पुढे जाता येईल. शुभ दि. २४, २५

- Advertisement -