मेष : तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात दुखापत होऊ शकते. सहाय्य मिळेल.
वृषभ : संसारात वाद, नाराजी होईल. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. अचानक खर्च होईल. वस्तू नीट सांभाळा.
मिथुन : आज ठरविलेले काम करण्याचा आळस करू नका. नोकरीत महत्त्व वाढेल. कौतुक होईल. स्पर्धा जिंकाल.
कर्क : तुमच्या विरोधात लोक जातील. स्वतःची चूक कबूल करावी लागेल. दुसर्याचे काम करण्याची वेळ येईल.
सिंह : तुमच्या मनाप्रमाणे घरात, बाहेर घटना घडतील. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात फायदा होईल.
कन्या : रेंगाळत राहिलेले काम करून घ्या. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. कायदा समजून घ्या.
तूळ : धंद्यात जम बसेल. नवीन ओळखी होतील. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. यशस्वी दिवस.
वृश्चिक : व्यवसायाला कलाटणी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. प्रतिमा उजळेल.
धनु : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. नोकरीत बदल करता येईल. प्रेमाला चालना मिळेल.
मकर : कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. खरेदी करताना खिसा, पाकीट सांभाळा. वाहनाचा वेग कमी ठेवा.
कुंभ : महत्त्वाचे काम आज करून घ्या. कार्याला वेग प्राप्त होईल. नवीन परिचय कला क्षेत्रात होईल.
मीन : अडचणीत आलेले काम करून घ्या. धंद्यात फायदा होईल. मौज-मजा कराल.