राशीभविष्य शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२०

राशीभविष्य

मेष – फायदेशीर योजना धंद्यात वापरता येईल. थकबाकी वसूल करा. मान-प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत प्रगती होईल.

वृषभ – कोर्टाच्या कामातील अडचणी दूर करता येईल. घरगुती लोकांच्या मनातील शंका वेळीच दूर करा.

मिथुन – वाद वाढेल असे कृत्या टाळा. रस्त्याने चौफेर लक्ष देऊन चाला. दुखापत संभवते.

कर्क – आजचे काम वेळेत पूर्ण करता येईल. आळस करून नंतर पश्चाताप होईल. वेळेला महत्त्व द्या.

सिंह – प्रेमाला चालना मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. कला-क्रिडा क्षेत्रात वर्चस्व राहील.

कन्या – कोर्टाचे काम, अडचणी, वाद लवकर संपवा. नोकरीत चांगला बदल शक्य होईल. शुभ कार्य ठरेल.

तूळ – यांत्रिक बिघाड घरात होऊ शकतो. अचानक तुमचा कार्यक्रम अडचणीत येऊ शकतो. नवा पर्याय मिळेल.

वृश्चिक – महत्त्वाचे काम करून द्या. वेळ, प्रसंग पाहून निर्णय घेता येईल. तुमचा प्रभाव राहील.

धनु – धंद्यात दुर्लक्ष न करता काम मिळवा. कोर्टाच्या कामात नवा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा.

मकर – आजची योजना ठरविल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत जिंकाल.

कुंभ – प्रगतीची संधी आज नाही तर उद्या नकी मिळेल. धंद्यासाठी धावपळ करावी लागेल.

मीन – अधिकार प्राप्ती झाल्याने जबाबदारी वाढेल. खाण्याची काळजी घ्या. प्रयत्नाला यश मिळेल.