राशीभविष्य: सोमवार, १६ नोव्हेंबर २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष – क्षुल्लक कारणाने एखादे काम रेंगाळण्याची शक्यता आहे. घरात वाद होईल. आपसांत गैरसमज होईल.

वृषभ – अडचणी कमी झाल्याने सरकार दरबारची कामे करता येतील. नोकर माणसे त्रास करण्याची शक्यता आहे.

मिथुन – अपेक्षित व्यक्तीची मदत मिळणे थोडे कठीण होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. जुने स्नेही भेटतील.

कर्क – मुलांची प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठांना तुमची मदत महत्त्वाची ठरेल. प्रवासात वाहनाचा वेग कमी ठेवा.

सिंह – अपमानास्पद घटना घडण्याची शक्यता आहे. अचानक कामात बदल करण्याची वेळ येईल.

कन्या – आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. नवीन परिचय फायदेशीर व उत्साहवर्धक ठरेल. धंदा वाढेल.

तूळ – राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. थकबाकी वसूल करा.

वृश्चिक – तणाव कमी होईल. वरिष्ठांच्या बरोबर झालेला वाद मिटेल. प्रवासात घाई करू नका. नम्र राहा.

धनू – घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. धावपळ होईल. स्वतःचे काम वाढेल कामात बदल होऊ शकतो.

मकर – आज महत्त्वाचा निर्णय घेता येईल. मान-सन्मान मिळेल. स्पर्धी जिंकाल. धंदा वाढेल. मित्र भेटतील.

कुंभ – अचानक कुणी आल्याने तुमचा वेळ फुकट खर्च होईल. शेजारी एखादी तक्रार करेल. पोटदुखी होऊ शकते.

मीन – आज ठरविलेले काम आजच पूर्ण करा. उद्या अडचण येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांना खूश करता येईल.