मेष : तुम्हाला मोठेपणा मिळेलच असे नाही. तरीही तुम्हाला उत्साह वाटेल. ध्येय पूर्ण होऊ शकेल. मुले खूश होतील.
वृषभ : कोर्टाच्या कामात नीट सल्ला घेऊन काम करा व मत व्यक्त करा. धंद्यात वाद वाढवू नका. संधी मिळेल.
मिथुन ः प्रयत्नांना चांगले यश मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत यशस्वी व्हाल. नोकरीचा प्रश्न सुटेल.
कर्क : तुमच्या कामाचे कौतुक होईल. नावलौकिक वाढेल. कला-क्रीडा साहित्यात नविन ओळख होईल.
सिंह : योजना पूर्ण करता येईल. जुना वाद मिटवता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
कन्या ः घरात कामे वाढतील. जबाबदारीने वागावे लागेल. स्वभावात चिडचिडेपणा तरीही यश मिळवाल.
तुला : मनाची द्विधा अवस्था होईल. दूरचा प्रवास करावा लागेल. विरोधक अडचणी आणतील.
वृश्चिक : विचारांना दिशा मिळेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेता येईल. प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख होईल.
धनु : विस्कटलेले धंद्यातील, घरातील घडी नीट सावरता येईल. नविन विषयात रस घ्याल. धंदा मिळेल.
मकर : महत्त्वाकांक्षा ठेवा. अहंभाव ठेऊ नका. गुप्त कारवाया होतील. राग वाढू देऊ नका.
कुंभ : रेंगाळत राहिलेली कामे करता येतील. घरात आनंदी वातावरण राहील. विचारांना प्रेरणा मिळेल.
मीन : तणाव वाढवू नका. कामे मिळतील. अधिकारात वाढ होऊ शकते. विरोध सहन करावा लागेल.