राशीभविष्य सोमवार,०३ ऑगस्ट २०२०

राशीभविष्य

मेष : तुमच्या क्षेत्रात यशाचा नवा टप्पा गाठता येईल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. स्पर्धेत प्रगती होईल.

वृषभ : तणाव कमी करता येईल. केस जिंकता येईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. मान-सन्मानात भर पडेल.

मिथुन : कठीण प्रसंगावर मात करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत काम असले तरी यशस्वी व्हाल. मन स्थिर ठेवा.

कर्क : वादविवादाने प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता आहे. तुमच्या ओळखीचा उपयोग येईल. प्रतिष्ठा राहील.

सिंह : ठरविलेले काम पूर्ण करता येईल. नाराज झालेल्या लोकांना बोलावून त्यांच्या मनातील विचार समजून घ्या.

कन्या : नवीन कामात यश मिळेल. कल्पनाशक्तीला संधी मिळेल. मान-सन्मान मिळेल. नोकरी मिळवा.

तुला : तणाण कमी होईल. खरेदी कराल. धंद्यात सुधारणा करता येईल. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत कराल.

वृश्चिक : नवीन ओळखी होतील. उत्साह वाढेल. कामाचा ताण कमी करता येईल. नोकरीत प्रगतीची संधी सावधपणे घ्या.

धनु : घरगुती तणाव कमी होईल. काम करण्यातील अडचण दूर होऊ शकेल. नातलगांच्या भेटी होतील.

मकर : जमीन, घर यासंबंधी समस्या येऊ शकते. रागावर ताबा ठेवा. सौम्य शब्दात तुमचे मत व्यक्त करा.

कुंभ : वरिष्ठांच्या मनातील संशय दूर करता येईल. साहित्याला नवा विषय मिळेल. पाहुणे येतील.

मीन : धंद्यात आळस नको. नोकरीत कौतुकास्पद काम कराल. परदेशात जाण्याचा विचार होईल. स्पर्धा जिंकाल.