राशीभविष्य सोमवार, १२ ऑक्टोबर २०२०

Horoscope 44
राशीभविष्य

मेष – तुमच्या कार्यावर टीका होईल. वरिष्ठ नाराज होतील. प्रवासात वाद होऊ शकतो. मुले मदत करतील.

वृषभ – महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वादाला महत्त्व देऊ नका. घरातील व्यक्तींना फसवू नका. तब्येत सांभाळा.

मिथुन – धंद्यात जम बसेल. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. प्रसिद्धी मिळेल. प्रेमात यश येईल. सौम्य राहा.

कर्क – ताण-तणाव कमी होईल. थकबाकी मिळवा. धंद्यात नवा बदल करता येईल. मित्र मिळतील.

सिंह – धावपळ होईल. डोळ्यांची काळजी घ्या. उष्णतेचा त्रास संभवतो. रस्त्याने नीट चाला. प्रेमाने प्रेम वाढवता येईल.

कन्या – घरातील वातावरण आनंदी राहील. मुलांची उन्नती होईल. घर खरेदीचा विचार कराल.

तुळ – मनावर दडपण येईल. क्षुल्लक वाद मनस्ताप देऊ शकतो. मन शांत ठेवा. स्थिर ठेवा. प्रवासाचा बेत ठरवाल.

वृश्चिक – विचारांना दिशा मिळेल. दुसऱ्याला कमी लेखू नका. नवा पर्याय धंद्यात मिळेल. मैत्रीत वाढ होईल.

धनु – तुमच्या कार्याल सर्वांची मदत मिळेल. मैत्री वाढेल. स्पर्धेत प्रगती कराल. धंदा वाढेल. नोकरीतील ताण कमी होईल.

मकर – जुना वाद मिटवून नव्या कामाकडे लक्ष द्या. धंद्यात वाढ करा. संधी कमी वेळासाठी असणे.

कुंभ – फायदा होणारी योजना समोरून येईल. प्रेमाची माणसे भेटतील. आवडते पदार्थ मिळतील. वरिष्ठ कौतुक करतील.

मीन – मनाची द्विधा अवस्था होईल. पाहुणे येतील. खर्च होईल. चांगला मार्ग शोधाल.