मेष : तुमचे खोचक बोलणे इतरांना राग आणेल. मैत्रीत नाराजी होऊ शकते. विरोध होईल.
वृषभ : वरिष्ठांच्या कामात मदत करताना तुम्हाला तुमचे काम करून घेता येईल. धंदा वाढेल.
मिथुन ः महत्त्वाची कामे रेंगाळत ठेऊ नका. भागीदाराला, नोकरांना सांभाळून ठेवता येईल. यश मिळेल.
कर्क : आत्मविश्वास वाढेल. नव्या पद्धतीने काम करा. लोकांचे मन जिंका. प्रतिष्ठा कमवा.
सिंह : धंद्यात वाढ करता येईल. स्पर्धेत जिंकाल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. मित्र भेटतील.
कन्या ः कामातील अडचणी कमी होतील. खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला दिशा मिळेल. लाभ होईल.
तूळ : तुम्हाला राग येईल असे वर्तन समोरची व्यक्ती करण्याची शक्यता आहे. संयम ठेवा. धंदा वाढेल.
वृश्चिक : तुमची कामे होतील. भेटीत यश मिळेल. नम्रपणे रहा. मान-अपमानाचा विचार करू नका.
धनु : साहित्याला नवा विषय मिळेल. जुने स्नेही भेटतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
मकर : कोर्टाच्या केस संबंधी चर्चा यशस्वी होईल. केस संपवण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या. संधी शोधा.
कुंभ : हायब्लड प्रेशरचा त्रास संभवतो. पाहुणे येतील. धावपळ होईल. धंद्यात फायदा होईल.
मीन : वाहन जपून चालवा. राग आवरा. धंद्यात ओळखीतून काम मिळेल. स्पर्धेत कष्ट घ्या.