राशीभविष्य : शनिवार, ७ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष : तुमचा प्रभाव सामाजिक क्षेत्रात वाढेल. जवळचे काही लोक गैरसमज तयार करतील. व्यवहारात दुर्लक्ष करू नका.

वृषभ : नोकरीत कामाचा व्याप वाढेल. बोलताना एखादा शब्द कठोरपणे उच्चारला जाईल. मोहाला बळी पडू नका.

मिथुन : महत्त्वाचे काम आजच करून घ्या. मागील येणे वसूल करा. थोर व्यक्तीचे विचार ऐकावयास मिळतील. यश मिळेल.

कर्क : तुम्ही ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. मुले सहाय्य करतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

सिंह : कला क्षेत्रात नवीन ओळख होईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कोर्टकेस जिंकाल. वाद मिटेल.

कन्या : कायद्याचे पालन करा. धंद्यात वादावादी होईल. कामगार लोक समस्या निर्माण करतील. डोळ्यांची काळजी घ्या.

तूळ : ठरविलेले काम वेळेत पूर्ण होईल. आळस करू नका. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. खरेदी कराल.

वृश्चिक : कामात चूक होईल. सावध रहा. कोर्टाच्या कामात मुद्याचेच बोला. घरात क्षुल्लक तणाव होईल. खर्च होईल.

धनु : तुमचा विचार सर्वांना पटवून देता येईल. धंद्यात वाढ होईल. नवीन ओळख होईल. प्रवासाचा बेत ठरवाल.

मकर : कार्याचा विस्तार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धंदा वाढवा.

कुंभ : कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा जिंकाल. नवीन विषय साहित्याला मिळेल. पाहुणे येतील. धंद्यात नवा विचार उपयोगी पडेल.

मीन : धंद्यात फायदा होईल. परदेशात जाण्याची संधी कंपनी द्वारा नोकरीत मिळेल. वाहन, घर घेण्याचे ठरवाल.