राशीभविष्य : गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : महत्त्वाचे कोणतेही काम आजच करून घ्या. नवीन ओळख कला क्षेत्रात होईल. प्रेरणा देणारी घटना घडेल.

वृषभ : कोणतेही भाष्य करताना प्रसंगाचे भान ठेवा. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल.

मिथुन : राजकीयसामाजिक कार्यात सावधपणे निर्णय घ्या. नोकरीत वरिष्ठांच्या बरोबर राहावे लागेल. स्पर्धा कठीण वाटेल.

कर्क : धंद्यातील तणाव कमी करता येईल. मैत्रीत गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. मनाची एकाग्रता होईल.

सिंह : अधिकारी थाटात वागून चालणार नाही. जुने स्नेही भेटतील. धंद्यात कामे होतील. वाटाघाटीत यश मिळेल.

कन्या : किरकोळ कारणाने घरात वादविवाद होईल. पोटाची काळजी घ्या. धंद्यात खर्च करावा लागेल. मैत्री होईल.

तूळ : आज ठरविलेले काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल. कलाक्रीडा क्षेत्रात प्रगती, पैसा मिळेल. नोकरी शोधा.

वृश्चिक : कोर्टाच्या कामात तुमचा प्रभाव पडेल. बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. कला क्षेत्रात विशेष प्रगती होईल. पैसा मिळेल.

धनु : आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात जबाबदारीने काम करावे लागेल. धंदा वाढेल. व्यवहारिक धोरण ठेवा.

मकर : गुरुठाई असलेल्या व्यक्तींच्या बरोबर नम्रपणे बोला. भावना अनावर होईल. घरात तणाव होईल. कायदा पाळा.

कुंभ : आजचे काम आजच करा. नवीन ओळखीमुळे तुमचे काम व्यवस्थित पूर्ण होईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.

मीन : रागावर ताबा ठेवा. धंद्यात वाढ होईल. कष्ट पडतील. धावपळ करावी लागेल. स्पर्धा जिंकाल.