घरभविष्यराशीभविष्य रविवार, १७ ते शनिवार २३ फेब्रुवारी २०१९

राशीभविष्य रविवार, १७ ते शनिवार २३ फेब्रुवारी २०१९

Subscribe

मेष ः- रविवारच्या दिवशी तुम्ही ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण कराल. नातलगांची भेट होईल. धंद्यात फायदा होईल. स्पर्धेत जिंकाल. सूर्य हर्षल लाभयोग, शुक्र-शनि युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही सावधपणे लोकांच्या व नेत्यांच्यावर विश्वास ठेवा. कदाचित तुम्हाला विचार बदलावा लागेल. धंद्यात काम मिळेल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना विचार करा. भाळून जाऊ नका. संसारात मुले आनंद देतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. संशोधनात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहून बोला. कोणत्याही परीक्षेसाठी कसून अभ्यास करा. भ्रमात राहू नका. प्रेमात वाहवत जाऊ नका फसाल. शुभ दि. 19, 20

वृषभ ः- धंद्यात जम बसेल. उधारी वसूल करा. पाहुणे आल्याने खर्च वाढेल. वाहन जपून चालवा. घरच्यांची मर्जी राखा. चंद्र बुध प्रतियुति, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कायम ठेवता येईल. कोणत्या व्यक्तीशी वाद वाढवावयाचा याचे भान ठेवा. नोकरीत क्षुल्लक व्याप वाढेल. फसगत टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात काम मिळेल. परंतु पैसे देऊन तुमचे कोणतेही काम होईल. यावर भरवसा ठेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. तुमच्याशी मैत्री करणारे लोकच स्पर्धा करतील. परीक्षेसाठी चांगली तयारी करा. वाकड्या वाटेने जाऊ नका. शुभ दि. १७, १८

- Advertisement -

मिथुन ः- रेंगाळत राहिलेले कोणतेही काम करून घ्या. धंद्यात सुधारणा करता येईल. गैरसमज दूर करू शकाल. वेगाने कार्य करा. सूर्य हर्षल लाभयोग, बुध नेपच्यून युती होत आहे. धंद्यातील चूक सुधारून मोठा निर्णय घेता येईल. शेअर्सना अंदाज बरोबर येईल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यातील त्रुटी समजून घ्या. प्रगतीचा वेग वाढवता येईल. तुमच्या बद्दलचा कोणताही संशय दूर करू शकाल. घरात शुभ समाचार मिळेल. मैत्री वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. संशोधनाच्या कामाला वेग प्राप्त येईल. वरिष्ठांना खूश कराल. परीक्षेसाठी उत्तम तयारी करा, तरच यश मिळेल. खाण्याची काळजी घ्या. शुभ दि. १८, १९

कर्क ः- चहाच्या पेल्यातील वाद चहापुरतेच राहील त्यानंतर कामे होतील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. धंद्यात वाढ करा. सूर्य, चंद्र षडाष्टक योग, शुक्र शनि, युति होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात भलत्या व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. जवळची माणसे सुद्धा विश्वासघात करू शकतात. धंद्यात पैसे गुंतवणे धोक्याचे ठरू शकते. संसारात मतभेद होतील. वाटाघाटीत तुमचे मत विचारात घेतले जाईल अथवा नाही. दादागिरीची भाषा उपयोगी पडणार नाही. नोकरीत मनस्ताप होईल. संशोधनात तुम्ही सावध रहा. राग वाढू देऊ नका. वाहन जपून चालवा. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवावी. सकस आहार घ्यावा. शुभ दि. 20,२१

- Advertisement -

सिंह ः- तुम्ही ठरविलेल्या कामात अचानक बदल करण्याची वेळ येऊ शकते. दगदग वाढेल. वादाला जास्त महत्त्व देऊ नका. बुध नेपच्यून युती, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. तणावातून मार्ग शोधता येईल. चर्चा सफल होईल. संसारातील वाद कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. धंद्यात लक्ष देऊन वाढ करा. आप्तेष्ठांच्या मदतीला जावे लागेल. नोकरीत वर्चस्व राहील. मुले प्रगती करतील. कला-क्रीडा प्रगतीची संधी मिळेल. संशोधन चांगले होईल. वरिष्ठ खूश होतील. कोर्ट केसमध्ये आशादायक वातावरण राहील. परीक्षेसाठी मन लावून अभ्यास करा. भ्रमात राहू नका. शुभ दि. 21,२२

कन्या ः- राहून गेलेली कामे करून घ्या. सामाजिक कार्याची चर्चा करता येईल. धंद्यात वाढ होईल. सूर्य चंद्र षडाष्टक योग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. राजकारणात इतरांना मदत करताना तुमच्यासाठी अडचणी वाढू शकतात. त्याची सावधगिरी बाळगा. सामाजिक कार्यात लोक तुमची मदत मागण्यास येतील. आर्थिक व्यवहार करताना उतावळेपणा नको. धंद्यात खोटा मोह टाळा. तुमची प्रतिष्ठा घालवण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होईल. दुखापत संभवते. वाहन जपून चालवा. संशोधनाच्या कामात दिशाभूल केली जाईल. विद्यार्थी वर्गाने चांगले संस्कार विसरू नये. शुभ दि. 17, 18

तुला ः- तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. जुने स्नेही भेटतील. मान-प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात तुमचे नावलौकिक वाढेल. सूर्य हर्षल लाभयोग, बुध नेपच्यून युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठे काम सोपवण्यात येईल. लोकप्रियता वाढेल. धंद्यात फायदा होईल. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर्समध्ये लाभ होईल. दर्जेदार लोकांचा सहवास कला-क्रीडा क्षेत्रात मिळेल. मोठे काम तुमच्याकडून होईल. नोकरी लागेल. तुमचे स्वप्न पूर्ण होईल. कोर्ट केस यशस्वी करता येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी ग्रहांच्या चांगल्या साथीचा फायदा घ्यावा. मोठी प्रगती करावी. शुभ दि. १९, २०

वृश्चिक ः- क्षुल्लक अडचण येईल. रागावर ताबा ठेवा. चहा प्यायल्यानंतर तुमचे काम सुरळीत होईल. मन स्थिर होईल. धंदा वाढेल. चंद्र, बुध प्रतियुति, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचे काम करून घेता येईल. भेट यशस्वी होईल. तुमच्या पद्धतीने लोकांना मुद्दे पटवून देता येतील. धंद्यात लक्ष द्या. किरकोळ मतभेद होतील. संसारात सुखद घटना घडेल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांच्याकडून आश्वासन मिळेल. कल्पनाशक्तीचा उपयोग करून घेता येईल. संशोधनात यश येईल. विद्यार्थी वर्गाने घेतलेले परिश्रम उपयोगी पडतील. परदेशात जाण्याचा योग येईल. अविवाहितांना स्थळे मिळतील. शुभ दि. १८, १९

धनु ः- संमिश्र स्वरूपाचे प्रसंग घडतील. क्षुल्लक अडचणी प्रवासात येतील. धंद्यात नाराजी होऊ शकते. मार्ग शोधता येईल. या आठवड्यात शुक्र नेपच्यून लाभयोग, चंद्र, बुध प्रतियुति होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात धावपळ करावी लागेल. प्रवासात सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला योजना मार्गी लावता येईल. जास्त प्रयत्न करा. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. फसवणूक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. प्रसिद्धी मिळेल. क्रीडा क्षेत्रात चमकाल. संशोधन कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जुने स्नेही भेटतील. विद्यार्थी वर्गाने आळस न करता मोठ्या परीक्षेची तयारी नियमितपणे करावी. शुभ दि. २०, २१

मकर ः- रविवारच्या दिवशी घरगुती समस्या होईल. जवळच्या व्यक्तीला नाराज करू नका. जेवणानंतर तुमचे मन आनंदी होईल. या सप्ताहात सूर्य हर्षल लाभयोग, बुध नेपच्यून युति होत आहे. धंद्यात चांगली संधी समोरून येईल. त्याचा विचार करा. समस्येतून बाहेर पडता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला जम बसवता येईल. दिलेले शब्द कायमस्वरूपी पाळल्यास लोकांचे लक्ष तुमच्याकडे जाईल. प्रयत्न करा. संसारात किरकोळ अडचणी येतील. वाटाघाटीत गैरसमज होऊ शकतो. नोकरीत कायद्याचे पालन करा. मैत्रीमध्ये तणाव संभवतो. विरुद्धलिंगी व्यक्तींकडून मनस्ताप होईल. संशोधन कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा. खाण्याची काळजी घ्यावी. शुभ दि. २२, २३

कुंभ ः- रविवारच्या दिवशी ठरविलेल्या कामात बदल करावा लागेल. शेजार्‍याला मदत करण्यात वेळ जाईल. नको असलेले काम करावे लागेल. सप्ताहात शुक्र नेपच्यून लाभ योग, बुध नेपच्यून युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. काही लोकांना तुमची मते फारच धाडसी वाटतील. त्याला लोक विरोध करण्याची शक्यता आहे. गुप्त कारवाया होतील. कठीण प्रसंगावर मात करता येईल. संयम ठेवा. धंद्यात फायदा होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. घरगुती समस्या सोडवण्यात वेळ जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. शिक्षणात आळस नको. मोठे यश मिळवता येईल. नोकरी लागेल. संशोधनात धावपळ होईल. यश खेचता येईल. शुभ दि. 19,20

मीन ः- रविवारच्या दिवशी महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात तणाव होऊ शकतो. वेळ पडल्यास तडजोड करण्याची वेळ येईल. या सप्ताहात सूर्य, चंद्र, प्रतियुती, चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमच्या योजनांच्यावर टीका होईल. नोकरीत कामामध्ये चूक होऊ शकते. धंद्यात हिशोब नीट करा. बोलताना ताळमेळ सोडू नका. महत्त्वाची वस्तू सांभाळा. विचारपूर्वक सर्व ठिकाणी वागा. घरातील व्यक्तींचा सल्ला घ्या. खरेदी-व्रिकीत नुकसान होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. संशोधनाच्या कामात मेहनत जास्त होईल. तडजोड करावी लागेल. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे बोलावे. अभ्यासात काटकसर करू नये. मोठे यश तरच मिळेल. शुभ दि. १७, १८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -