घरभविष्यराशीभविष्य रविवार 27 ऑक्टोबर ते शनिवार 2 नोव्हेंबर २०१९

राशीभविष्य रविवार 27 ऑक्टोबर ते शनिवार 2 नोव्हेंबर २०१९

Subscribe

मेष ः– वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी मन अस्थिर होईल. रागावर ताबा ठेवा. लक्ष्मी-कुबेरपूजन ते भाऊबीज मनाप्रमाणे साजरी कराल. दिवाळी पाडव्याला नव्या कार्याचा आरंभ करता येईल. धंद्यात वाढ होईल. नोकरमाणसे सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात वाटाघाटीमध्ये नाराजी होईल. घरातील व्यक्तींमध्ये मतभेद होतील. हे सर्व तात्पुरते असेल. नोकरीत वरिष्ठांना खुष करता येईल. शोध मोहीम यशस्वी होईल. व्यसन करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. २८, २९

वृषभ ः या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, चंद्र गुरु युति होत आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन मनोभावे होईल. दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. प्रवासात दगदग होईल. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. पद मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. नोकरीत सावधपणे काम करा. शोध मोहिमेत दिशाभूल होईल. मोह आवरा. शिक्षणात प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. पोटाची काळजी घ्या. शुभ दि. २७, ३०

- Advertisement -

मिथुन ः– या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. दीपावली आनंदात साजरी कराल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेरपूजन ते भाऊबीज उत्साहाची असेल. मंगळवार प्रवासात सावध रहा. वस्तु सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. पदाच्या संबंधी समस्या निर्माण होऊ शकते. धंद्यात नवे काम मिळेल. कामगारांची भूमिका समजून घ्यावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह वाढेल. नवीन ओळख होईल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात धरसोड वृत्ती ठेऊ नका. मैत्री योग्य व्यक्तीशी करा. शुभ दि. २७, २८

कर्क ः– या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, बुध शुक्र युति होत आहे. दीपावली आनंदाची असेल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजनात मनोभावे लक्ष राहील. दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी नव्या कार्याचा आरंभ करता येईल. घर, जमीन घेण्याचा विचार कराल. धंद्यात मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. लोकांचे सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या शेवटी चूक करू नका. नोकरीत काम वाढेल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात पुढे जाल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखीमुळे फायदा होईल. शुभ दि. 27, 28

- Advertisement -

सिंह ः– या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. दीपावली महत्त्वाची ठरेल. नरक चतुर्दशी से दिवाळी पाडवा उत्साहात साजरा कराल. भाऊबीज आनंदाची ठरेल. संध्याकाळी प्रवासात सावध रहा. धंद्यात वाद वाढवू नका. मोठे काम मिळवता येईल. अरेरावी करू नका. नोकरांना दुखवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. पदाची शक्यता वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळख उत्साहाची ठरेल. मोह टाळा. शोध मोहिमेत यश मिळेल. शिक्षणात पुढे जाल. फटाके वाजवताना डोळ्यांची काळजी घ्या. शुभ दि. 2७, 2८

कन्या ः– या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट मिळवता येईल. दीपावली उत्साहात साजरी कराल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजन ते भाऊबीज सर्व दिवसांचा आनंद घेता येईल. नव्या कामाची सुरुवात करता येईल. मागिल येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. घर, दुकान घेण्याचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीचा प्रयत्न करा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. मोहिमेत यशस्वी व्हाल. शिक्षणात प्रगती कराल. शुभ दि. २७, २८

तूळ ः- या सप्ताहात वृश्चिकेत येणारा शुक्र तुमच्या कार्यात विशेष यश देणार आहे. चंद्र गुरु युती होत आहे. व्यवसायात जम बसेल. मोठे काम मिळेल. शेअर्समधील नुकसान भरून काढता येईल. शेअर्समधील नुकसान भरून काढता येईल. दीपावली आत्मविश्वासाची आनंदी ठरेल. नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. नरक चतुर्दशीच्या दिवशी मनाचा गोंधळ होईल. लक्ष्मी-कुबेर पूजन मनोभावे कराल. दिवाळी पाडवा, भाऊबीज विशेष ठरेल. शुभ समाचार मिळेल. नव्या कार्याचा आरंभ करता येईल. राजकीय-सामाजिक कार्याला दिशा मिळेल. पदाधिकार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोध मोहीम महत्त्वाची ठरेल. शिक्षणात पुढे जाल. शुभ दि. 28, २9

वृश्चिक ः– या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, चंद्र गुरु युती होत आहे. धंद्यातील स्थिती सुधारता येईल. तणाव कमी होऊन नवे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल. दीपावलीचा आनंद घ्या. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन मनाप्रमाणे साजरे कराल. दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी तुमचे मन अस्थिर राहील. प्रवासात घाई करू नका. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. पदाधिकार मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. शोध मोहिमेत मदत मिळणे कठीण आहे. शिक्षणात आळस करू नये. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. १, २

धनु ः– या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. दीपावली यथासांग साजरी कराल. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन ते भाऊबीज उत्साहात साजरी कराल. दगदग होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व टिकून राहील. वाटाघाटी, पद मिळणेसाठी जवळचे लोक काड्या घालतील. नोकरीत परदेशात जाण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा. शोध मोहिमेत धावपळ होईल, परंतु यश मिळेल. शिक्षणात चांगली संगत ठेवा. वेळेला महत्त्व द्या. दि. २७, २८

मकर ः– या सप्ताहात शुक्र वृश्चिकेत येत आहे. सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. दिवाळी तुम्ही आनंदात साजरी करा. नरक चतुर्दशी ते भाऊबीज प्रत्येक दिवशी तुमचा उत्साह वाढेल. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. मागिल येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनतीचे फळ मिळेल. पदाधिकार मिळेल. लोकांच्या प्रेमाने भारावून जाल. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात ध्येयावर लक्ष ठेवा. चांगले मित्र जवळ करा. शुभ दि. २७, २८

कुंभ ः- या सप्ताहात वृश्चिक राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या दिवशी मन अस्थिर होईल. काम करताना सावध रहा. किरकोळ दुखापत संभवते. फटाके तर वाजवणे ठीक नाही. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकांच्या सहकार्याने प्रगती कराल. नोकरीत बदल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळख होईल. शोध मोहिमेत यशस्वी व्हाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शिक्षणात धरसोड वृत्ती ठेऊ नका. शुभ दि. 28, 29

मीन ः- या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, चंद्र गुरु युती होत आहे. दिवाळी आनंदात साजरी कराल. नरक चतुर्दशी, लक्ष्म कुबेर पूजन मनाप्रमाणे साजरे कराल. दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी साजरे कराल. दिवाळी पाडवा, भाऊबीजच्या दिवशी तणाव होऊ शकतो. मौल्यवान वस्तू नीट सांभाळा. वाद वाढवू नका. धंद्यातील समस्या कमी होईल. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहिल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत घ्या. शोध मोहिमेत दगदग होईल. दिशाभूल होऊ शकते. शिक्षणात स्थिर रहा. दि. 30,१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -