रविवार २ डिसेंबर ते शनिवार ८ डिसेंबर २०१८ राशीभविष्य

Mumbai
rashi bhavishya

मेष ः- रविवार कामाचा व्याप वाढेल. मनाविरुद्ध घटना घडेल. धंद्यात वाद वाढवू नका. बुध, हर्षल, बडाष्टक योग, चंद्र शुक्र युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही मुद्देसूद बोलणे कमी होईल. किरकोळ चूका कुणाच्यातरी हातून होतील. धंद्यात तडजोड करण्याची वेळ देऊ शकते. संसारात वृद्ध व्यक्तीची जबाबदारी घ्यावी लागेल. वाटाघाटीत तणाव होईल. कला-क्रिडा क्षेत्रात यशासाठी झगडावे लागेल. नोकरीत कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. नियमात रहा. कोर्टाच्या कामात अडथळे येतील. विद्यार्थी वर्गाने नम्रतेने वागावे बोलावे. अभ्यासात आळस करू नये. संशोधन कार्यात डोकेदुखी वाढेल. शुभ दि. 4,5

वृषभ ः– रविवार महत्वाची गाठ भेट घेता येईल. धंद्यात जास्त काम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र बुध, युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्याचा वेग वाढवा. लोकांच्या भेटी घ्या. वरिष्ठांना मदत करा. पदाधिकार मिळू शकेल. धंद्यात प्रयत्नाने मोठे कंत्राट मिळू शकेल. घरातील वादाला जास्त खत-पाणी घालू नका. नोकरीत प्रभाव वाढेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति करता येईल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. कोर्टकेस संपवण्याचे चिन्ह दिसेल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. परिक्षेसाठी मुलांची चांगली तयारी होऊ शकेल. खाण्याची काळजी घ्या. चांगली संगत ठेवा. घर, जमिन, वाहन खरेदीचा विचार कराल. शुभ दि. 6,7

मिथुन ः- रविवार कठीण काम करण्यासाठी धावपळ करावी लागेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. थट्टा-मस्करी करतांना सावध रहा. बुध हर्षल बडाष्टक योग, चंद्र शुक्र युति होत आहे. थोरा-मोठ्यांचा सहवास मिळेल. राजकीय-सामाजिक ठिकाणी तुमचे बोलणे वादग्रस्त ठरू शकते. तुमच्या मर्यादा ओळखा. धंद्यात गैरसमज होईल. आर्थिक व्यवहारात सावध रहा. नोकरीत तुमच्या नावाच्या गैरवापर होऊ शकतो. जास्त विश्वास कुणावरही ठेऊ नका. कला-क्रिडा क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या अपमान होण्याचा संभव आहे. संशोधनाच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यास जास्त लक्ष द्यावे. तरच यश सोपे जाईल. शेअर्समध्ये अंदाज सावधपणे घ्या. शुभ दि. 4,5

कर्क ः- रविवार धंद्यासाठी चांगला निर्णय घेता येईल. घरातील कामे पूर्ण होतील. जीवनसाथी, मुले यांच्याबरोबर मजेत रहाल. सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र, बुध, युति होत आहे. प्रयत्न करा. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा करून घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा ठसा उमटेल. खंबीरपणाचे कौतुक होईल. किरकोळ वाद जास्त वाढवू नका. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. संशोधन कार्यात नवा धागा हाती लागेल. वरिष्ठ कौतुक करतील. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळेल. कठीण वाटणारे काम करून घेता येईल. शुभ दि. 2, 6

सिंह ः- रविवार तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. किरकोळ तणाव वाढू देऊ नका. धंद्यात फायदा होईल. नविन ओळखी होतील. चंद्र शुक्र युति, सूर्य नेपच्यून केंद्र योग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला दिशा मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखणे त्रस्त होईल. कला-क्रिडा क्षेत्रात कौतुक होईल. स्पर्धा कठीण वाटेल. नोकरीत अरेरावी त्रासदायक ठरेल. धंद्यात गोड बोलून काम मिळावा. थकबाकी मिळावा. कोर्टाच्या कामात सावधपणे बोला. संशोधनाच्या कामात दिशाभूल होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा. खोट्या भ्रमात राहू नये. वाहन जपून चालवावे. संसारात जबाबदारी वाढू शकते. मुले मदत करतील. शुभ दि. 2, ३

कन्या ः– रविवार किरकोळ अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. कदाचित कार्यक्रमात बदल करण्याची वेळ येऊ शकते. सूर्य, मंगळ केंद्र योग, चंद्र बुध युती होत आहे. धंद्यात मोठे काम सुरू करता येईल. शेअसर्चचा अंदाज बरोबर येईल. फायदा मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजना गतिमान करता येतील. प्रयत्न करा. सहकारी मदत करतील. विरोधक मैत्रीची तयारी दर्शवतील. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. मोठे काम मिळेल. कोर्टाच्या कामात यश येईल. संशोधनाच्या कामात वरिष्ठ खुष होतील. विद्यार्थी वर्गाला प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. नोकरीत चांगला बदल येऊ शकेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. घर खरेदी कराल. शुभ दि. 4,5

तूळ ः– रविवार ठरविलेल्या कामात अचानक बदल करण्याची वेळ येऊ शकते. कामाचा व्याप वाढेल. धंद्याकडे लक्ष द्या. सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र बुध युति होत आहे. मंगळवार पासून तुमच्या राजकीय-सामाजिक कार्याला वेग येईल. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांना सर्व प्रकारे मदत करता येईल. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करा. कला-क्रिडा क्षेत्रात महत्व वाढेल. कोर्टकेस जिंकता येईल. नविन नोकरी मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगति होईल. परिक्षेत यश मिळवता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. घर, वाहन, जमिन खरेदीचा प्रयत्न करता येईल. शुभ दि. 5, 7

वृश्चिक ः– रविवार अनेक कामे करण्यासाठी धावपळ करावी लागेल. खाण्याची काळजी घ्या. विचारांना चालना मिळेल. सूर्य मंगळ केंद्र योग, चंद्र, बुध युति होत आहे. गुरुवार पासून धंद्यात सुधारणा करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात जवळचे लोक डावपेच तुमच्याबरोबर खेळण्याची शक्यता आहे. प्रवासात वाहनाचा वेग कमी ठेवा. लोकांच्या बरोबर सहकार्याने व प्रेमाने बोला. कला-क्रिडा क्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. तुमचे कौतुक होईल. कोर्टकेसमध्ये जिंकण्याची आशा वाढेल. संशोधनात कार्यात जबाबदारी वाटेल. परिक्षेसाठी नियमितपणाने अभ्यास करा. मौज-मजानंतर करता येईल. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. शुभ दि. 2,8

धनु ः- रविवार महत्वाचे काम करून घ्या. शुभ समाचार मिळेल. मनावरील ताण कमी होईल. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. चंद्र शुक्र, युति, मंगळ नेपच्यून युती होत आहे. आप्तेष्टांच्या साठी धावपळ करावी लागेल. स्वतःची कामे करण्यात किरकोळ अडचणी येतील. राजकीय-सामाजिक कार्यात तत्पर रहा. वरिष्ठांचा निरोप तुमच्या पर्यंत पोहचण्यास वेळ लागू शकतो. कला-क्रिडा क्षेत्रात कामे समोर दिसतील. तुमच्या पर्यंत येण्यास विलंब होऊ शकतो. कोर्टाच्या कामात सावध रहा. बोलताना बेसावध राहू नका. संशोधन कार्यात ताण वाढू शकतो. मुलांनी अभ्यास करण्याचा आळस करू नये. शुभ दि. 1, 2

मकर ः– रविवार विचारांना, कार्याला योग्य दिशा देता येईल. मार्गदर्शन मिळेल. धंद्यात मोठा निर्णय घेता येईल. वेळेला महत्व द्या. सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात नीट अभ्यास करा. तुमचे कार्य कुठे प्रभावी ठरेल त्याचा विचार करा. चौफेर यश घेता येईल. नोकरीत चांगला बदल होईल. व्यवसायात सुधारणा होऊन आर्थिक लाभ मिळेल. कोर्टकेस संपवता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात नवा प्रयोग यशस्वी ठरेल. संशोधन कार्याला वेग येईल. यश मिळेल. वरिष्ठ कौतुक करतील. कोणतीही परीक्षा टाळू नका. प्रयत्न करा यश मिळेल. दूरच्या प्रवासच्या विचार कराल. शुभ दि. ३, ४

कुंभ ः– रविवार कामे वाढतील. शेजारी त्रस्त करण्याची शक्यता आहे. दुसर्‍याला मदत करावी लागेल. धंद्यात काम मिळेल. सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या निर्णय फारच प्रभावी ठरेल. तुमची प्रतिमा उजळेल. लोकप्रियता वाढेल. धंद्यात जम बसेल. थकबाकी वसूल करा. नोकरीत चांगला फायदा होईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठे काम मिळेल. पुरस्कार मिळेल. कोर्टकेस मिटवता येईल. संशोधन कार्यात यश मिळेल. जबाबदारी पूर्ण करू शकाल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. घर, दुकान खरेदी करता येईल. दूरच्या प्रवासाच्या बेत ठरवाल. शुभ दि. 4,5

मीन ः- रविवार धंद्यात जम बसेल. वाढ होईल. महत्वाचे काम करून घ्या. चर्चा करण्यात यश मिळेल. वरिष्ठांच्या सामाजिक कार्यात मदत करावी लागेल. सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्वाचा निर्णय तुमच्या बाबत घेतला जाईल. प्रतिष्ठा वाढेल. पदाधिकार मिळेल. धंद्यात जोरदार प्रयत्न करा. मोठे कंत्राट मिळेल. नोकरीतील तनाव कमी होईल. घरातील व्यक्तीच्या बरोबर सप्ताहाच्या मध्यावर वाद होईल. कोर्टकेसमध्ये आशादायक परिस्थिती दिसेल. कला-क्रिडा क्षेत्रात पुढे जाल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. बरोबरच्या लोकांना दुखवू नका. खाण्याची काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. 2, ७

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here