रविवार २३ ते २९ डिसेंबर २०१८ राशी भविष्य

Mumbai
rashi bhavishya

मेष ः- रविवार जीवसाथी, मुले यांना खूश ठेवता येईल. धंद्यातील तणाव व वाद कमी होईल. तुम्ही ठरविलेले काम करता येईल. मीन राशीत मंगळ प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यासाठी जोरदार वेगाने काम करता येईल. व्यवहार व भावना एकत्र आणू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीची संधी मिळेल. रागाला ताब्यात ठेवा म्हणजे चांगला निर्णय घेता येईल. घरातील वाद कमी करा. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्याकडे लोकांचे लक्ष जाईल असे काम होईल. कोर्टाच्या त्रासातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता येईल. उतावळेपणा करू नका. संशोधनाच्या कामात यश येईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. परीक्षेसाठी मुलांनी चांगली तयारी करावी. शुभ दि. २४, २५

वृषभ ः– रविवार धंद्यात फायदा होईल. आळस करू नका. घरातील राहिलेले काम पूर्ण करा. अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. मीन राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यामध्ये काही लोक तुमच्या कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठ आणि तुमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करतील. सावध रहा. धंद्यात व्यवहार करताना विचार करा. काम मिळवा. थकबाकी मिळवा. घरातील वडील माणसांच्या बरोबर नम्रतेने बोला. विद्यार्थ्यांनी वडिलांचा अपमान करू नये. खोटे काम लपवू नये. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत पडेल. कोर्टाच्या कामात सावध रहा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. अधिकारी दबाव आणतील. शुभ दि. २४, २५

मिथुन ः- रविवार मनावरील दडपण कमी होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामावर लक्ष द्या. मीन राशीत मंगळ प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील समस्या, तणाव ओळखून त्याप्रमाणे पाऊले टाका. तुमच्या योजनेला पुढे न्या. यश प्रयत्नाने मिळवा. धंद्यात अरेरावी करण्यापेक्षा गोड बोलून काम करून घ्या. संसारात चांगली बातमी मिळेल. मुले प्रगती करतील. कला-क्रीडा क्षेत्रात नाव होईल. नवे मित्र भेटतील. कोर्टाच्या कामात मदत मिळू शकेल. केस संपवण्याचा हेतू ठेवा. संशोधनाच्या कामात वरिष्ठ कौतुक करतील. तुमचा अंदाज बरोबर येईल. परीक्षेसाठी मुलांनी चांगला अभ्यास करण्याची गरज आहे. शुभ दि. २४, २६

कर्क ः- रविवार मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. घरातील वाद होऊ शकतो. शेजार्‍याला मदत करण्यात वेळ जाईल. धंद्यात लक्ष ठेवा. मीन राशीत मंगळ, सुर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्तहित शत्रू त्रस्त करण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक त्याचा बंदोबस्त करा. उतावळेपणाने वागू नका. धंद्यात काम मिळाले तरी पूर्ण करण्यासाठी मेहनत पडेल. संसारातील चिंता करत रहाल. जवळचे लोक मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धेत मेहनत घ्यावी लागेल. यश झगडून मिळवावे लागेल. कोर्टाच्या अरेरावी करून चालणार नाही. संशोधनाच्या कामात दिशाभूल होऊ शकते. विद्यार्थ्यांनी नम्रता ठेवावी. ध्येय समोर ठेवावे. शुभ दि. २8, २9

सिंह ः- रविवार तुमचा उत्साह वाढेल. आत्मविश्वासाने महत्त्वाचा निर्णय घेता येईल. पाहुण्यांचे स्वागत मनाप्रमाणे करता येईल. आवडते पदार्थ मिळतील. मीन राशीत मंगळ प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव दूर करता येईल. वरिष्ठांच्या बरोबर संवाद साधता येईल. धंद्यातील अडचणींवर उपाय शोधू शकाल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. संसारातील वातावरण बर्‍याच दिवसांनी सुधारेल. नव्या व्यक्तीचा परिचय कला-क्रीडा क्षेत्रात होईल. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. मोठ्या माणसाचे सहाय्य घेता येईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला चांगले मार्गदर्शन मिळेल. परीक्षेसाठी चांगला प्रयत्न करा. शुभ दि. २८,2९

कन्या ः- रविवार तुम्ही ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण करा. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. धंद्यात आळस करू नका. शुभ समाचार मिळेल. मीन राशीत मंगळ प्रवेश, चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. राग वाढू देऊ नका. काही लोक आग लावण्याचा प्रयत्न करून जामीन होतील. धंद्यात काम मिळवा. कष्ट सोडू नका. कोर्टाच्या कामात अरेरावी करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात आश्वासन मिळेल. यश खेचता येईल. कोर्टाच्या कामात पुढे जाता येईल. संशोधनाच्या कामासाठी धावपळ होईल. प्रवासात सावध रहा. विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी मोठे यश मिळेल. शुभ दि. 2४, २५

तुला ः- रविवार जवळच्या लोकांची भेट होईल. धंद्यात वाढ होईल. नव्या विचारांची प्रेरणा मिळेल. आनंदी रहाल. मीन राशीत मंगळ प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाच्या घडामोडी घडतील. वरिष्ठ तुमच्याकडे विचाराने व आदराने कामे देतील. तुमचे संबंध वाढतील. धंद्यातील अडचणी कमी झाल्याने प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. घर, जमीन, वाहन खरेदीचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठे यश मिळेल. थोरा मोठ्यांचा सहवास मिळेल. कोर्टाच्या कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी उत्साहाने नेटाने अभ्यास करावा. चांगली दिशा तुम्हाला मिळेल. शुभ दि. २५,२६

वृश्चिक ः- रविवार कामाचा व्याप वाढेल. इतरांना मदत करण्यात वेळ जाईल. किरकोळ अडचणी येतील. वाद वाढवू नका. मीनेत मंगळ, प्रवेश, बुध नेपच्यून केंद्र योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात मनावर दडपण येईल. विरोधकांना तुम्ही गप्प करू शकाल. धंद्यात कामासाठी धडपड करावी लागेल. ओळखी होतील. घरातील कामे वेळच्या वेळी करा. मौल्यवान खरेदीचा विचार होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येईल. संशोधनाच्या वर्गाला चांगले यश मिळेल. प्रयत्न कमी करू नका. शुभ दि. 2५, २७

धनु ः- रविवार जवळची माणसे भेटतील. आनंदी व्हाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. समस्या सोडवता येईल. मीन राशीत मंगळ प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. जबाबदारीने कामे करावी लागतील. लोकप्रियता मिळेल. धंद्यात मेहनत घ्यावी लागेल. कामगारांचा प्रश्न सोडवता येईल. घरातील लोकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. वाटाघाटीची चर्चा करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात यशस्वी व्हाल. मुलांच्या प्रगतीने खूश रहाल. कोर्टकचेरीच्या कामात प्रगती होईल. संशोधन कार्यात निर्णय घेता येईल. दिशा मिळेल. प्रवासात घाई नको. परीक्षेसाठी मुलांनी अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. 27, 28

मकर ः- रविवार वाद वाढवू नका. कुणीतरी तुम्हाला अपमानास्पद बोलण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. मीन राशीत मंगळ प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक अडचणी निर्माण करू शकतात. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. तुम्ही लोकांसाठी केलेल्या कामाने लोकप्रियता वाढेल. तुम्ही दिलेली टक्कर महत्त्वाची ठरेल. नोकरीत कामाकडे लक्ष द्या. कला-क्रीडा क्षेत्रात धावपळ वाढेल. सर्वच कामे मोठी वाटतील. कोर्टाच्या कामात मनाची द्विधा होईल. संशोधनाच्या कामात मेहनत जास्त होईल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. धंद्यातील खोटा दिखावा ओळखा. शुभ दि. 25, 26

कुंभ ः- रविवार तुम्ही ठरविल्याप्रमाणे कामे करता येतील. उत्साह वाढेल. धंद्यात जम बसेल. वरिष्ठांच्या सामाजिक कार्यात मदत कराल. मीन राशीत मंगळ प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात मोठी कामगिरी निभाववी लागेल. प्रसिद्धी मिळेल. खर्च करावा लागेल. धंद्यात चांगली संधी चालून येईल. तुम्ही प्रयत्न कमी करू नका. कंत्राट मिळावा. डोळ्यांची काळजी घ्या. कला-क्रिडा क्षेत्रात पैसा व प्रसिद्धी मिळेल. कोर्टाच्या कामात आरोप दूर करून यशस्वी व्हाल. संशोधनात कौतुकास्पद काम कराल. नोकरी लागेल. परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळवू शकाल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकाल. शुभ दि. 23, 27

मीन ः- रविवार कामांची गर्दी होईल. मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल. मान-प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. तुमच्याच राशीत मंगळ-प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुुरुवातीला तुमची कामे वेगाने होतील. राजकीय सामाजिक कार्यात योजनेला महत्त्व येईल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यासाठी नवा विचार कराल. कर्जाचे काम ओळखीतून करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची नवी संधी मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात तुमचा प्रभाव वाढेल. वाहन सावधपणे चालावा. दुखापत टाळा. विद्यार्थ्यांना यश मोठे मिळेल. अभ्यासात आळस करू नये. पौष्टीक अन्न खावे. संशोधनाला पाठिंबा मिळेल. शुभ दि. २४, 25

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here