रविवार १६ ते २२ डिसेंबर २०१८ राशी भविष्य

Mumbai
rashi bhavishya

मेष ः- रविवारी तुमच्या कामात किरकोळ अडचणी येतील. कदाचित कार्यक्रमात बदल करण्याची वेळ येईल. वाद वाढवू नका. धनु राशीत प्रवेश करणारा सूर्य, चंद्र, शुक्र प्रतियुति तुमच्या राजकीय-सामाजिक कार्याला मदत करेल. तुमचे विचार पटतील. लोकसंग्रह वाढवता येईल. धंद्यातील प्रश्न कमी होईल. प्रयत्नावर भर द्या. तुमचे मन स्थिर राहील. घरातील तणाव कमी होईल. शुभ समाचार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाता येईल. विद्यार्थी वर्गाने मोठ्या परीक्षेची तयारी जोरात करावी. संशोधनात यश मिळेल. वरिष्ठांना खूश कराल. कोर्टाच्या कामात प्रगतिकारक वातावरण राहील. नोकरीतील वाद मिटवता येईल.शुभ दि. १९, २०

वृषभ ः- रविवारी महत्त्वाचे काम आजच करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात फायदा होईल. सामाजिक कार्यात चांगला निर्णय घेता येईल. धनुराशीत प्रवेश करणारा सूर्य, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील जबाबदारी वाढवेल. बुध, गुरु, युति होत आहे. व्यवसायात वाढ करा. प्रयत्न करा. अरेरावीची भाषा करू नका. घरातील कामे वाढतील. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होऊ शकतो. विद्यार्थी वर्गाने पोटाची काळजी घ्यावी. संशोधनाच्या कामात किचकटपणा वाढू शकतो. कोर्ट केसमध्ये अडचणी येतील. तात्पुरत्या स्वरूपाची समस्या राहील. कायदा कुठेही मोडू नका. शुभ दि. 16, 17

मिथुन ः- रविवारी राहून गेलेली कामे करून घ्या. धंद्यात सुधारणा होईल. नवीन ओळख उपयोगात आणता येईल. धनु राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रति युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी करता येईल. वरिष्ठांच्या बरोबर असलेला वाद संपवता येईल. मान-प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करू शकाल. घरातील वाटाघाटीचा प्रश्न निघेल. धंद्यातील अडचणींवर उपाय शोधता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागेल. कोर्टाच्या कामात शब्दप्रयोग चुकीचा होण्याची शक्यता आहे. संशोधनाच्या कामात नेमका धागा मिळवण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाने अपयश टाळण्यासाठी नियमित अभ्यास करावा. श्री दत्तजयंतीला शुभ समाचार मिळेल. शुभ दि. 17, १८

कर्क ः- रविवाीर आप्तेष्ठांच्या भेटी होतील. समाजकार्यासाठी धावपळ करावी लागेल. धंद्यात आळस करू नका. लाभ होईल. धनुराशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील महत्त्वाची कामे, महत्त्वाचा निर्णय याच सप्ताहात घेता येईल. धंद्यात मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात टिकाव धरता येईल. कोर्टाच्या कामात किरकोळ वादावादी होऊ शकते. श्री दत्तजयंतीच्या दिवशी प्रवासात सावध रहा. वाहन जपून चालवा. संशोधन कार्यात दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने प्राचार्यांच्या बरोबर नम्रतेने वागावे. शुभ दि. 18, 19

सिंह ः- रविवारी वाहन जपून चालवा. किरकोळ वाद होईल. धंद्यात गिर्‍हाईकाला दुखवू नका. धनु राशीत सूर्य प्रवेश, शुक्र नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. मंगळवारपासून तुमचा ताण कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात बिघडलेले वातावरण सुधारू शकाल. वरिष्ठांना विचारपूर्वक तुमचे मत सांगता येईल. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. घरातील समस्या सोडवता येईल. नाराजी दूर करता येईल. नोकरीत गुप्त कारवायांना रोखता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळण्याचा प्रयत्न करता येईल. संशोधनाच्या कामाला दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासासाठी आळस करू नये. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ समाचार मिळेल. शुभ दि. 19,20

कन्या ः– रविवारी घरातील व्यक्तींना खूश ठेवता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. धंद्यात फायदा होईल. महत्त्वाचे काम आज करा. धनु राशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुति होत आहे. धंद्यात दुर्लक्ष करू नका. वेळेला महत्त्व द्या. राजकीय-सामाजिक कार्यात कोणताही कसूर करू नका. प्रतिष्ठा सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. मैत्रीत वाढ होईल. कोर्टाच्या कामात सावधपणे निर्णय घ्या. संशोधनाच्या कामात अडचणी येऊ शकतात. विद्यार्थी वर्गाने चांगले विचार व चांगली संगत धरावी. नोकरीत कायदा पाळा व चूक टाळा. शुभ दि. 20, २२

तूळ ः- रविवारी तुम्हाला एखादा निर्णय बदलावा लागण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. रस्त्याने चालताना सावध रहा. धनुराशीत सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुति होत आहे. धंद्यात कामाचा व्याप वाढेल. तुम्हाला वेळेला महत्त्व द्यावे लागेल. अडचणी किरकोळ असतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याबरोबर स्पर्धा करणारे लोक मनातून तुमचा द्वेष करतील. वरिष्ठांच्या बरोबर संयमाने वागा. तुमची प्रतिष्ठा सांभाळता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात तुम्हाला आत्मविश्वासाने वागावयाचे आहे. कोर्टाच्या कामात क्षुल्लक अडचणी येतील. धावपळीने थकवा येऊ शकतो. संशोधनाच्या कामात अडचणींवर मात करावी लागेल. विद्यार्थ्यांनी मन स्थिर ठेवावे. शुभ दि. 18,19

वृश्चिक ः- रविवारी महत्त्वाचे काम आज करा. धंद्यात सुधारणा करताना भागिदाराला समजून घ्या. सामाजिक कार्य मनाप्रमाणे होऊ शकेल. धनु राशीत सूर्य प्रवेश, बुध गुरू युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील तुमची प्रतिष्ठा सांभाळता येईल. विरोधकांना थोपवून ठेवता येईल. प्रवासात मंगळवार, बुधवार सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. घरात चांगले वातावरण राहील. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. संशोधनाच्या कामात तुमची बुद्धी उपयोगी येईल. मित्रासाठी काम करावे लागेल. कायदा पाळा. विद्यार्थ्यांनी पोटाची काळजी घ्यावी. अभ्यासात आळस करू नका. नोकरीत तणाव कमी होईल. शुभ दि. 20, 21

धनु ः- रविवारी तुमच्या मनावरील दडपण कमी होईल. अडचणीतून मार्ग शोधण्याचा उपाय मिळेल. नियमात राहून बोला. तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव व समस्या सोडवता येईल. धंद्यात सप्ताहाच्या शेवटी बोलण्यातून वाद वाढू शकतो. प्रवासात घाई करू नका. घरगुती वातावरण मनासारखे राहील. वाटाघाटीत सर्वांचे मत घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. कोर्टाच्या कामातील अडचण लक्षात येईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात जास्त मेहनत घ्यावी. संशोधनाच्या कामाला नव्याने सुरुवात करता येईल. शुभ दि. 18, 19

मकर ः- रविवारी तुमचा उत्साह राहील. धंद्याला नवी दिशा मिळेल. कुणावरही झटकन विश्वास टाकू नका. मैत्री वाढेल. धनु राशीत सुर्य प्रवेश, बुध, गुरु युति होत आहे. बुद्धिचातुर्य व अनुभवी माणसाचा सल्ला घेऊन राजकीय-सामाजिक कार्यात निर्णय घ्या. जवळच्या लोकांना पारखून घ्या. धंद्यात खर्च होईल. गुंतवणूक करणारे मिळतील. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. नवीन ओळखीने प्रगतीची संधी मिळेल. कोर्टाच्या कामात क्षुल्लक अडचण येईल. संशोधनाच्या कामात बेसावधपणा नको. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरीत काम वाढेल. शुभ दि. 17, २१

कुंभ ः- रविवारी धंद्यात फायदा होईल. महत्त्वाची चर्चा करण्यात यश येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. धनुराशीत सूर्य प्रवेश, शुक्र नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व जबरदस्त वाढेल. लोकसंग्रह वाढेल. धंद्यात मोठा बदल करता येईल. मोठी गुंतवणूक करणारे मिळतील. शेअर्समध्ये फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठी प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केस यशस्वी होईल. घर, वाहन खरेदी होऊ शकेल. संशोधनात प्रगतीच होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे अभ्यासात पुढे जाता येईल. घरात आनंदी रहाल. शुभ सभार मिळेल. शुभ दि. 17, १८

मीन ः- रविवारी मनाची द्विधा अवस्था होईल. चांगली बातमी मिळेल. घरातील व्यक्तींची समस्या सोडवता येईल. प्रवासात घाई नको. धनु राशीत सूर्य प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करा. जिद्द ठेवा. अहंकार नको. धंद्यात वाढ करू शकाल. मैत्रीत व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा. घरातील प्रश्न सौम्य प्रमाणे सोडवा. जास्त आक्रमक होऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात मनाप्रमाणे पुढे जाता येईल. मैत्रीत गैरसमज होऊ देऊ नका. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. दत्तजयंतीच्या दिवशी महत्त्वाची घटना घडेल. परीक्षेत लक्ष द्या ध्येय गाठा. शुभ दि. १७, २१

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here