राशी भविष्य रविवार, १८ नोव्हेंबर ते शनिवार २४ नोव्हेंबर २०१८

Mumbai
rashi bhavishya

मेष ः- रविवार तुमच्या कार्याला दिशा मिळेल. दुपारनंतर मनावर दडपण येईल. धंद्यात लक्ष द्या. चंद्र शुक्र प्रतियुति, मंगळ, गुरु केंद्र योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला बोलताना सावधगिरी ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणींचा सामना करावा लागेल. लोकांच्या सहाय्याने पुढे जाता येईल. धंद्यात कामगार वर्गाला सांभाळून घ्यावे लागेल. करार करताना उतावळेपणा करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. नाराज होऊ नका. विद्यार्थी वर्गाने नियमित अभ्यास करावा. कोर्ट केसमध्ये चुकीचा मुद्दा नकळत मांडला जाऊ शकतो. संशोधन कामात सहकार्य मिळवण्यासाठी नम्रता ठेवा. संसारात जबाबदारी वाढेल. शुभ दि. 22,२३

वृषभ ः- रविवार तुमचा कार्यक्रम पद्धतशीर पूर्ण करता येईल. सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. धंद्यात वाढ होईल. सूर्य चंद्र त्रिकोण योग, चंद्र गुरु प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात कार्यावर भर द्या. वरिष्ठांच्या सहाय्याने पुढे जाता येईल. सप्ताहाच्या मध्यावर घरात किरकोळ तणाव होईल. खर्च वाढेल. धंद्यात सुधारणा करता येईल. मोठे काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. विशेष कार्य हातून होईल. कोर्ट केसमध्ये जिंकता येईल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश परीक्षेत मिळेल. नोकरीचा प्रश्न सोडवता येईल. भावना व व्यवहार यांचा गुंता करू नका. संशोधनात यश मिळेल. शुभ दि. 18,19

मिथुन ः- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. धंद्यात बेसावध राहू नका. थकबाकी मिळवा. सूर्य चंद्र षडाष्टक योग, चंद्र शुक्र प्रतियुति होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात निर्णय घ्या व योजनांना गती द्या. सप्ताहाच्या शेवटी आरोप येईल. घरात जबाबदारी वाढेल. नोकरीत कटकटी होतील. संयम ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात जिद्दीने यश खेचावे लागेल. कोर्ट केसमध्ये बोलण्यात चूक करू नका. धंद्यात कामगार वर्गाला फटकारू नका. नम्रतेने वागा. विद्यार्थी वर्गाने उद्धटपणे बोलून गुरुवर्यांना दुखवू नका. संशोधनात मेहनत जास्त घ्यावी लागेल. शुभ दि. 19, २०

कर्क ः- प्रवासात अडचणी रविवारी येतील. वाद निर्माण होईल. वाहन जपून चालवा. शेजारी निष्कारण कुरापत वाढून त्रस्त करेल. सूर्य चंद्र त्रिकोण योग, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला प्रगतीची मोठी संधी मिळेल. गैरसमज दूर करण्यासाठी वेळ मिळेल. लोकांचे सहकार्य घेता येईल. धंद्यात नवा फंडा उपयुक्त ठरेल. थकबाकी मिळेल असा प्रयत्न करा. नोकरीत बदल करण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. विद्यार्थी वर्गाने ठरविलेले काम पूर्ण होईल. कोर्ट केस जिंकता येईल. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. संशोधन कार्यात वरिष्ठ खूश होतील. संसारात सुखद घटना घडेल. शुभ दि. 19, 20

सिंह ः- रविवार तडजोड करावी लागेल. ठरविलेला कार्यक्रम अचानक बदलावा लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल. चंद्र शुक्र प्रतियुती, मंगळ गुरु केंद्र योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील. वरिष्ठांच्या विरोधाने मन उदास होईल. धंद्यात मेहनत घ्या. काम मिळवण्याचा प्रयत्न करा. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मुलांची प्रगती झाल्याने उत्साह वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख होईल. मैत्री वाढेल. कोर्ट केसमध्ये बुधवारपासून अडथळे कमी होतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचा आळस करू नये. कोणाताही वाद वाढवू नये. संशोधनाच्या कामात तत्परता ठेवावी लागेल. शुभ दि. 21, २३

कन्या ः- रविवार सकाळी किरकोळ तणाव होईल. दिवसभर मात्र तुम्ही जे काम करण्याचे ठरवाल ते पूर्ण करता येईल. घरातील नाराजी दूर होईल. सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. परदेशात धंदा नेता येईल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात बुधवार, गुरुवार वाद होईल. विरोधाला उत्तर देण्याची घाई करू नका. तुमचे महत्त्व वाढतच जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केसमध्ये प्रगतिकारक वातावरण राहील. विद्यार्थी वर्गाला परीक्षेसाठी उत्तम तयारी करता येईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. शुभ दि. 19, 20

तूळ ः– रविवार कटकटी होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. नको असलेली व्यक्ती तुमचा वेळ घेईल. खर्च वाढेल. चंद्र शुक्र युती, मंगळ, गुरु केंद्र योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अडथळे येतील. त्यावर उपाय शोधता येईल. तुमची प्रतिष्ठा कमी होणार नाही. जास्त धावपळ करावी लागेल. धंद्यात काम मिळेल. हिशोब नीट करा. बोलणी करताना काही गोष्टी गृहीत धरू नका. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा कठीण वाटेल. यशस्वी व्हाल. कोर्ट केसमध्ये मुद्दे शोधून बोला. संततीबरोबर मतभेद संभवतो. जीवनात दिशा मिळेल. संशोधनाच्या कामात जिद्द ठेवा. ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे लक्षात ठेवा. शुभ दि. 21, २२

वृश्चिक ः रविवार थोरा-मोठ्यांच्या भेटी होतील. महत्त्वाचा फोन येईल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. धंद्यात वाढ करता येईल. चंद्र, मंगळ, लाभयोग, चंद्र, गुरू प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील अडचणींवर मात करून योजनांना महत्त्व देता येईल. लोकांची नाराजी दूर करण्याचा जोरदार प्रयत्न करावा लागेल. सप्ताहाच्या मध्यावर घरात तणाव, गैरसमज होऊ शकतो. वाटाघाटीवरून वाद वाढू शकतो. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीसाठी प्रयत्न करा. धंद्याच्या वाढीसाठी भेट, चर्चा करता येईल. कोर्टकचेरीच्या कामात आशादायक वातावरण राहील. संशोधनात जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. परीक्षेतील यशासाठी अभ्यासाला महत्त्व द्या. शुभ दि. 19,20

धनु ः रविवार पाहुण्याचे स्वागत करावे लागेल. धावपळ होईल. घरातील जबाबदारी वाढेल. धंद्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. चंद्र शुक्र युति, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या शेवटी ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल. तुमच्यावर टीका होईल. बोलताना तुम्ही सावधगिरी बाळगा. धंद्यात व्यवहार व भावना यांच्या गोंधळात नुकसान संभवते. वाघाघाटीत तुमच्यावर आरोप येऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात चूक करू नका. नोकरीत काम वाढेल. कायद्याने जे मंजूर असेल तेच करा. संशोधनाच्या कामात कष्ट जास्त घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाने यश सोपे समजू नये. शुभ दि. २१, २२

मकर ः- रविवार तुमच्या योजनेला गति मिळेल. ठरविलेला कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण करता येईल. धंद्याला मोठे करण्याचा प्रयत्न करा. सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरु, प्रतियुती होत आहे. या सप्ताहात तुमच्या राजकीय-सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल. मान मिळेल. लोकांचे प्रेम मिळेल. प्रत्येक दिवशी तुम्ही प्रत्येक कामात यश घ्याल. धंद्यात चर्चा करा. समस्या सोडवता येईल. गुंतवणूक करणारे लोक भेटतील. कला-क्रीडा क्षेत्रात नव्या लोकांचा परिचय उत्साहवर्धक ठरेल. कोर्ट केसमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. कौतुक होईल. नोकरीत बदल करता येईल. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. घर, वाहन इ. खरेदीचा विचार करता येईल. शुभ दि. 19,20

कुंभ ः– रविवार तुमच्या कामाचे कौतुक सर्वत्र होईल. ठरविलेले काम करता येईल. थकबाकी मिळवता येईल. आनंदी रहाल. धंदा वाढेल. सूर्य चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. योजनांना गतिमान करा. लोकांच्या सोयीसाठी काम करा. धंद्याला कलाटणी मिळेल. मोठे कंत्राट मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्याकडे नव्या विषयासाठी काम करण्याची विचारणा होईल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. कोर्ट केसमध्ये सफलता मिळेल. संशोधन क्षेत्रात चमकाल. नोकरीत मोठ्या पगाराची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश संपादन करता येईल. शुभ दि. 20, 21

मीन ः- रविवार सकाळी होणारा संताप दुपारनंतर कमी होईल. महत्त्वाचा फोन येईल. धंद्याविषयी नवा विचार कराल. चंद्र बुध त्रिकोणयोग, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. व्यवसायात मोठे काम मिळेल. वेळ कमी पडेल. अधिक कामगारांची गरज भासेल. राजकीय-सामाजिक कार्याला वेग येईल. जवळचे लोक तुमच्या नावाचा फायदा घेतील. मागून कट करतील. रागावर ताबा ठेवा. संयम सहनशीलता ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केसमध्ये जिद्द उराशी येईल. नावलौकिक वाढेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. संशोधनात धागा हाती लागेल. विद्यार्थी वर्गाने चांगले मित्र जवळ करावे तरच मोठे यश मिळेल. शुभ दि २३, २४