घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य मंगळवार, ७ एप्रिल २०२०

राशीभविष्य मंगळवार, ७ एप्रिल २०२०

Subscribe

मेष ःधंद्यात मेहनतीचा उत्तम मोबदला मिळेल. सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक सहाय्य घेता येईल.

वृषभ ःदिवसाच्या दुसर्‍या प्रहरात तुमच्या कामांना गती मिळेल. प्रवासात घाई करून उपयोग होणार नाही.

- Advertisement -

मिथुन ःसकाळी लवकर महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. मागिल येणे वसूल करा.

कर्क ःतुमच्या कार्याला दिशा देता येईल. तुमचे मुद्दे प्रेमाने व संयमानेच सर्वांना पटवून द्या. कायदा पाळा.

- Advertisement -

सिंह ःआनंदी रहाल. प्रकृतीत सुधारणा होईल. घरगुती समस्या सोडवताना स्वतःच्या चुका सुद्धा विचारात घ्या.

कन्या ःदुपारनंतर सकाळचा वाद निपटण्याचा प्रयत्न करता येईल. घरातील व्यक्ती तुमच्या बरोबर मदतीसाठी येतील.

तूळ ःसकाळी कामे करून घ्या. वाहन जपून चालवा. संध्याकाळी मनावर दडपण येईल. खर्च वाढेल.

वृश्चिक ःदुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. शांत डोक्याने प्रश्न सोडवा. दुसर्‍याला कमी लेखू नका.

धनु ःनवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. संध्याकाळी तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे.

मकर ःप्रयत्नाने कोणताही प्रश्न सोडवता येतो. जिद्द ठेवा. रागाने स्वतःचेच नुकसान होण्याची शक्यता असते.

कुंभ ःधंद्यातील चुका शोधून काढता येतील. कलाक्रीडासाहित्यात मोठ्या लोकांची ओळख होईल.

मीन ःतुमच्या भावनांची कदर केली जाईल. धंद्यातील वाद मिटेल. मोठे काम मिळवता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -