घरभविष्यराशी भविष्य २ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर

राशी भविष्य २ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर

Subscribe

राशी भविष्य २ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर

मेष –

- Advertisement -

सिंह राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीयसामाजिक कार्याला नवे वळण देण्याचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल. धंद्यातील समस्या कमी होईल. नवे कंत्राट मिळवता येईल. घरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण राहिल. नोकरीतील तणाव कमी झाल्याने वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गैरसमज दूर करून नव्याने संबंध जोडता येतील. कोर्टकेस मध्ये यश मिळेल. अडचणी वाढतील अशी कामे करू घ्या. कलाक्रिडा क्षेत्रात पुरस्कार, लाभ मिळेल. संशोधन कार्याला गती मिळेल. कौतुकस्पद काम तुमच्या कडून होईल. बढती मिळू शकेल. शुभ दि. 3,4

वृषभ –

- Advertisement -

सिंह राशीत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात तुमचे मन स्थिर राहिल्याने योग्य निर्णय घेता येईल. कायद्याच्या भाषेत बोला. कायदा पाळा व्यवहारात, धंद्यात काम मिळेल. परंतु गोड बोलणार्‍या व्यक्तींकडून फसगत होऊ शकते. प्रेमात वाद होईल. वाटाघाटीत मतभेद होईल. कोर्टकेस पर्यंत घरातील वाद जाऊ देऊ नका. कलाक्रिडा क्षेत्रात संधी मिळल्यास उशीर होउ शकतो. मैत्रीत दूरावा येऊ शकतो. कोर्टाच्या कामात सहाय्य मिळू शकेल. संशोधन कार्यात तुमचा अंदाज बरोबर येऊ शकतो. सहकार्य वर्ग आळस करण्याची आहे. शुभ दि. 2,5

मिथुन –

सिंहेत बुधाचे राश्यान्तर, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात तुमचे स्थान मजबूत करा. प्रतिष्ठा वाढेल असे कार्य जनहितासाठी करा. सप्ताहाच्या सुरुवातीला वाद होऊ शकतो. वाहन जपून चालवा. दुखापत होईल. संसारात महत्वाच्या निर्णय घेता येईल. मुलांच्या संबंधी चांगले बातमी ऐकावयास मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. नोकरीत बदल फायदेशिर ठरेल. कलाक्रिडा क्षेत्रात नावलौकिक व लाभ मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. कोर्टकेस संपवा. घर, वाहन, जमिन इ. खरेदीचा विचार करता येईल. संशोधन कार्यात प्रभाव दिसेल. विद्यार्थी वर्गाची प्रगति होईल. शुभ दि. 4,6

कर्क –

सिंह राशीत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर घरात वाद वाढवण्याची शक्यता आहे. वाटाघाटी संबंधी प्रश्न उपस्थित होऊ शकतो. राजकीयसामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. प्रसिद्धि मिळेल. चूका सुधारता येतील. धंदा वाढेल. थकबाकी मिळवा. नविन ओळख कला क्षेत्रात होईल. नवे काम मिळेल. कोर्टाच्या कामात सावधपणे प्रकरण हाताळा. विद्यार्थी वर्गाला परिक्षेत यश मिळेल. वेळ फुकट घालवू नका. संशोधन कार्यात दिशा मिळेल. काम पूर्ण करता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 2,3

सिंह –

तुमच्याच राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. चांगले मोठे काम मिळवता येईल. राजकीयसामाजिक कार्याला गती मिळेल. वरिष्ठांच्या दबाव कमी होईल. नविन योजना मार्गी लावता येतील. संसारात शुभ घटना घडेल. सुखद समाचार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कलाक्रिडा क्षेत्रात नविन ओळखी वाढतील. कोर्टकेस कशा पद्धतीने संपवता येईल. याचा विचार करा. सप्ताहाच्या शेवटी गुप्तगोष्टांचा भास होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. संशोधनात यश मिळेल. शुभ दि. 2,3

कन्या –

सिंहेत बुधाचे राश्यान्तर, चंद्र शुक्र त्रिकोणयोग, राजकीयसामाजिक कार्यात अडचणींना सामना करून काम करावे लागेल. प्रतिष्टेवर टिका होण्याची शक्यता आहे. मैत्रीच्या भाषेतच बोलावे लागेल. धंद्यात लक्षपूर्वक हिशोब ठेवा. कामगार लोक टाळाटाळ करू काम करतील. अडचणी येतील. कुटुंबातील वाटाघाटीत अपेक्षा वाढतील. तणाव संभवतो. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहिल. न पटणारे काम, कायदा मोडणारे काम करण्याचा प्रयत्न करू नका. कोर्टकेस मध्ये नम्रतेने वागा. कलाक्रिडा क्षेत्रात नविन ओळखी होईल. स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करा. संशोधन कार्यात वरच्या अधिकार्‍याचे सहाय्य मिळते कठीण आहे. शुभ दि. 4,5

तूळ –

सिंहेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात तुमचे मिळेल. नविन कार्य करण्याची संधी मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ होईल. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. स्त्रियांना कामे करतांना सावधगिरी घ्यावी. घरातील व्यक्तीचा आधार उपयोगी येईल. नविन ओळख होईल. कलाक्रिडा क्षेत्रात प्रगतिची मोठी संधी मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळवता येईल. नोकरीसाठी प्रयत्न करा. विवाहासाठी चांगले स्थळ मिळेल. संशोधन कार्यात बुद्धिची चमक दिसेल. विद्यार्थी वर्गाला परिक्षेत यश मिळेल. स्वप्न पहा, परंतू पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. मेहनत घ्या. शुभ दि. 4,5

वृश्चिक –

सिंहेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात सुधारणा करता येईल. लोकांची नाराजी तुमच्याबद्दल दिसून येईल. धंद्यात वाढ होण्यासाठी खर्चच करावा लागेल. आनावार्ह खर्च टाळा. घरातील व्यक्तींची नाराजी होऊ शकते. सप्ताहाच्या मध्यावर गैरसमज होईल. मैत्रीत दूरावा वाटेल. खाण्याची काळजी घ्या. कलाक्रिडा क्षेत्रात मेहनत घ्या. संधी पुढे मिळेल. नाराज होऊ नका. प्रेमात फसगत होईल. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यासात लक्ष द्यावे. कोर्टाच्या कामात सावधपणे बोला. संशोधन कार्याला दिशा देता येईल. मौल्यवान वस्तु वेळीच जागेवर ठेवा. शुभ दि. 6,7

धनु –

सिंह राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. जास्त भावूक झाल्यास मन अस्थिर होईल. जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. प्रकृतिची काळजी घ्या. राजकीयसामाजिक कार्यात विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. स्वभाव चिडका होईल. धंदा मिळेल. खर्च ही वाढेल. डोळ्यांची काळजी घ्या. कर्जाचे काम करण्यास थोडा विलंब लागू शकतो. कलाक्रिडा क्षेत्रात तुमचे डावपेच चांगले ठरले जातील. महत्वाची कागदेपत्रे वेळीच जागेवर ठेवा. कोर्टकेस सरळ सोपी दिसत असली तरी अडथळे येतील. संशोधन कार्यात जबाबदारी वाढेल. धावपळ वाढेल. थकवा वाटू शकतो. परिक्षेसाठी मुलांनी चांगली तयारी करावी. यश मिळेल. शुभ दि. 4,5

मकर –

सिंह राशीत बुध प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. राजकीयसामाजिक कार्यात उर्मटपणा दिसता कामा नये. मैत्रीने सर्व कामे करून घ्या. मंगळवार, बुधवार वाद वाढेल. तणाव होईल. टिका होईल. धंदा नीट सांभाळा. विश्वास टाकून गप्प बसू नका. फसगत होईल. नोकरीत कायदेशीर पद्धतीने काम करा. वरिष्ठांची नाराजी होईल. कलाक्रिडा क्षेत्रात स्पर्धेत टिकणे कठीण वाटेल. कौतुक होईल. संधी मिळणे सोपे नाही. कोर्टाच्या कामात मुद्दे सायतेने मांडा. रागावर ताबा ठेवा. संशोधन कार्यात दिशाभूल होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने नम्रता ठेवाव. शुभ दि. ,

कुंभ –

सिंहेत बुध प्रवेश, बुध शुक्र लाभयोग होत आहे. तुमच्या बुद्धिची चमक पाहून गुप्त हित शत्रू काड्या घालण्याचा प्रयत्न सर्वच ठिकाणी करू शकतात. राजकीयसामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. जबाबदारी वाढेल. तुमच्यावर निष्कारण आरोप करण्याचा प्रयत्न होईल. संसारात किरकोळ वाद होईल. खर्च वाढेल. डोळ्यांची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. कलाक्रिडा क्षेत्रात यश थोडक्यात हुकण्याचा संभव आहे. कोर्टाच्या कामात प्रभाव पडेल. संशोधन कार्यात काम वाढेल. विद्यार्थी वर्गाला उत्साह देणारी बातमी मिळेल. कलात्मक दृष्टिकोण वाढेल. शुभ दि. 4,5

मीन –

सिंहेत बुध प्रवेश, बुध, मंगळ बडाष्टक योग होत आहे. व्यवसायात वाढ झालेली पाहून कुणाचातरी पोटात दुखेल. तुम्हाला त्रास करण्याचा प्रयत्न होईल. राजकीयसामाजिक कार्यात विरोध होईल. तुमचे नाव दूषित करण्याचा प्रयत्न होईल. नम्रता ठेवा. संयमाचे प्रसंग हाताळा. अरेरावी महागात पडेल. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. किरकोळ वाद टोकाला जाऊ शकतो. कोर्टकेस मध्ये सावध रहा. कमी बोला. कलाक्रिडा क्षेत्रात मेहनत होईल. संशोधन कार्यात अडचणी येतील. वेळ कमी पडेल. विरुद्धलिंगी व्यक्ती कडून मनस्पातप होईल. शुभ दि. 3,4

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -