घरभविष्यराशी भविष्य : रविवार १३ जानेवारी ते शनिवार १९ जानेवारी २०१९

राशी भविष्य : रविवार १३ जानेवारी ते शनिवार १९ जानेवारी २०१९

Subscribe

मेष :- रविवार कामात अडचणी येतील. क्षुल्लक कारणाने चिडचिड करू नका. धंदा वाढेल. नवीन ओळखीने तुमचा फायदा होईल. मार्ग मिळेल. मकर राशीत सूर्य प्रवेश, बुध शनि युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे बुद्धिचातुर्य उपयोगात आणा. नवा खेळ खेळा. यश व प्रसिद्धी मिळेल. आर्थिक सहाय्य मिळेल. घरातील जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संशोधनाच्या कामात प्रगत विचार उपयोगी येतील. नोकरीतील ताण कमी होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष द्यावे तरच यश मिळेल. चांगली संगत ठेवावी. शुभ दि. 17,18

वृषभ :- रविवार धंद्यात जम बसवण्याचा प्रयत्न करा. कामगारांना समज देताना गोड बोला. तुमचे काम होईल. मकरेत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रति युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी होईल. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांच्या सल्ल्याने पुढे जा. धंद्यात किरकोळ अडचण येईल. हिशोबात चूक करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात आश्वासन मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग होईल. कोर्ट केसमध्ये दिशा देणारा संवाद होईल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. सहकारी मदत करतील. घरातील वातावरण उत्साहाचे राहील. विद्यार्थी वर्गाने मौज-मजेबरोबर मोठ्या परीक्षेसाठी अभ्यास करावा. भानगडी करू नये. शुभ दि. १८, १९

- Advertisement -

मिथुन :- रविवार महत्त्वाचे काम आजच करून घ्या. सामाजिक कार्यात यश येईल. भेट घेता येईल. धंद्यात वाढ व फायदा होईल. मकरेत सूर्य प्रवेश, बुध शनि युति होत आहे. या सप्ताहात तुम्हाला राजकीय-सामाजिक कार्यात तत्पर राहावे लागेल. वेळकाढू धोरण ठेवल्यास वरिष्ठ नाराज होतील. लोकांचा विरोध होईल. धंद्यात तुम्ही प्रयत्नाने मोठे काम मिळवू शकाल. कुठेही दादागिरी करून चालणार नाही. बुद्धिचातुर्य कोर्टाच्या कामात वापरा. साक्षीदार फिरण्याची शक्यता आहे. कला-क्रीडा क्षेत्रात वारा येईल तशी पाठ फिरवा. वाद वाढवू नका. संशोधनाच्या कामात दिशाभूल होऊ शकते. विद्यार्थी वर्गाने मोठ्या माणसांचा विचार ऐकावा. त्याना उद्धटपणे बोलू नये. यशासाठी प्रयत्न करा. शुभ दि. 13,14

कर्क :- रविवार तुमच्या मनाची उभारी राहील. कठीण काम करून घेता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मकरेत सुर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. लोकप्रियता मिळेल. योजनांना गती द्या. उद्योग-धंद्यात वाढ करण्यात अडचणी येऊ शकतात. करार करतांना विचार करा. थकबाकी मिळू शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. कोर्टाच्या कामात योग्य व्यक्तीची मदत मिळेल. नोकरीतील तणाव कमी होईल. संशोधनाच्या कामातील त्रुटी शोधता येईल. वरिष्ठांच्या बरोबर राहावे लागेल. नवीन ओळखीमुळे उत्साह राहील. घरात शुभ समाचार मिळेल. मुलांनी अभ्यासात लक्ष द्यावे. शुभ दि. 15,16

- Advertisement -

सिंह :- रविवार धावपळ जास्त होईल. वाहन जपून चालवा. थकवा वाटेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. खर्च वाढेल. मकरेत सूर्य प्रवेश, बुध शनि युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त कारवाया होतील. मनस्ताप वाटेल. कोणताही मोह टाळा. धंद्यात काम मिळवता येईल. क्षुल्लक कारणाने कुठेही चिडचिड करू नका. दादागिरी करून समस्या वाढू शकते. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होऊ शकतो. प्रसिद्धीसाठी वाट पहावी लागेल. कोर्ट केस सावधपणे हाताळा. संशोधनाच्या कामात विचारशक्तीचा उपयोग करा. कुणालाही कमी समजू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा. प्रेमात फसगत होईल. तुमचे मन उदास राहील. शुभ दि. 18,19

कन्या :- रविवार नातलगांची भेट होईल. आनंदी रहाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. धंद्यात जम बसेल. थकबाकी मिळवा. मकरेत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही योजनांकडे लक्ष द्या. लोकांच्या समस्यांवर उपाय शोधा. घरगुती वाटाघाटीत किरकोळ तणाव होईल. खर्च वाढेल. उत्साहाच्या भरात वाहन वेगाने चालवू नका. कायदा पाळा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रसंगानुरूप योग्य तेच बोला. संशोधनाच्या कामात यश येईल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेऊन अभ्यास करावा. घर, वाहन, जमीन खरेदी करता येईल. शुभ दि. 17, १८

तुला :- रविवार तुम्ही ठरवाल एक मात्र करावे लागेल दुसरेच. त्यामुळे मन अस्थिर होईल. अचानक पाहुणे येतील. धंद्यात वाद करू नका. मकर राशीत सूर्य प्रवेश, बुध शनि युति होत आहे. धंद्यात हिशोब नीट करा. किचकट प्रश्न विचारून तुम्हाला समोरची व्यक्ती कंटाळा आणेल. सहनशीलता ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात चूक होण्याचा संभव आहे. प्रसंगावधान कोर्ट केसमध्ये ठेवा. कला-क्रीडा साहित्यात नव्या दिशेने जाण्याचे ठरवाल. तुमच्या कामाचे श्रेय दुसरा घेऊ शकतो. संशोधनाच्या कामात वेळ जास्त खर्च होईल. मैत्रीचा फायदा होईल. विद्यार्थ्यांनी नम्रपणे वागावे. शुभ दि. 15,19

वृश्चिक :- रविवार धंद्यात जम बसवता येईल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या. भेटीत यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मकर राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र प्रतियुति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात प्रेरणादायी विचार तुम्हाला सुचतील. सरकारी वर्गाला सन्मानाने वागवा. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. ओळखीतून काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. मोठे काम मिळेल. कौतुक होईल. कोर्ट केसमध्ये आशादायक परिस्थिती राहील. संशोधनात यश मिळेल. नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. शुभ दि. 17, १८

धनु :- रविवार तुमचा विचार योग्य ठरेल. धंद्यात वाढ करता येईल. प्रवासात घाई करू नका. ओळखी होतील. मकरेत सूर्य प्रवेश, बुध शनि युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने कामे करा. लोकांना वेळ द्यावा लागेल. तुम्ही रागावर ताबा ठेवा. घरगुती समस्या किरकोळ असतील. तणाव होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नव्याने वाटचाल करता येईल. साहित्याला विषय मिळेल. व्यसनापासून दूर रहा. वरिष्ठ मदत करतील. विद्यार्थी वर्गाने ध्येय समोर ठेवावे. आळस करू नये. शुभ १३, १५

मकर :- रविवार तुमचा दिवस वेगाने जाईल. ठरविलेले काम पूर्ण करू शकाल. नातलगांची भेट होईल. धंद्यात फायदा होईल. तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात सुधारणा होईल. गैरसमज झाला होता तो दूर करता येईल. लोकांचे सहाय्य मिळेल. धंद्यात कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातल्या माणसांना खूश ठेवता येईल. मौल्यवान खरेदी कराल. घर, वाहन, जमीन खरेदी करताना सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्टाच्या कामाला नवी दिशा मिळेल. संशोधनात तुम्हाला मदत मिळेल. विद्यार्थी वर्गाला ध्येयपूतीर्र्साठी प्रयत्न करता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 17,18

कुंभ :- रविवार महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात वाढ होईल. समाजकार्यात यश मिळेल. गरज असलेली व्यक्ती तुम्हाला भेटेल. मकर राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरू प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात गुप्त शत्रू कुरापती वाढण्याचा प्रयत्न करतील. लोकप्रियता टिकवून ठेवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. कोर्टाच्या कामात बोलण्यात चातुर्य पाहिजे. नम्रता ठेवा. साहित्याला नवा विषय मिळेल. संशोधनाच्या कामात दुसर्‍यांनी दिलेले मत समजून घ्या. मदत नाकारू नका. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. अभ्यास करावा. शुभ दि. 13, १४

मीन :- रविवार मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात तुमचा अंदाज बरोबर येईल. नवीन ओळख होईल. स्पर्धा जिंकाल. मकर राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु प्रतियुति होत आहे. मागिल राहिलेली कामे राजकीय-सामाजिक क्षेत्रात पूर्ण करता येतील. आर्थिक मदत तुमच्या कामासाठी मिळेल. धंद्यात वाढ होईल. फायदा वाढेल. घरातील समस्या कमी होतील. मनाची उभारी कला-क्रीडा क्षेत्रात वाढेल. कोर्ट केस संपवता येईल. संशोधनाच्या कामात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाने मन स्थिर ठेवावे. अभ्यास करावा. शुभ दि. १५, १७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -