घरभविष्यराशी भविष्य ०९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर

राशी भविष्य ०९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर

Subscribe

मेष – सूर्य प्लुटो त्रिकोण योग, चंद्र बुध लाभयोग, धंदा वाढवता येईल. महत्त्वाचा निर्णय सप्ताहाच्या सुरुवातीला घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात विचारपूर्वक निर्णय घेता येईल. लोकांच्या मताचा, अडचणींचा विचार समजून घेता येईल. डावपेच टाळता येईल. घरातील अडचणी सोडवता येतील. वाद जास्त वाढवू नका. श्री गणेश मंडळात काम करताना तणावाचे प्रसंग येतील. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. श्रीगणेश पूजन लाभदायक ठरेल. त्यादिवशी शुभ समाचार मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. कामाचा व्याप वाढेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेसाठी योग्य तयारी करता येईल. संशोधन कार्यात अडचणीवर मात करू शकाल. शुभ दि. १३, १४

वृषभ – शुक्र हर्षल प्रतियुति, चंद्र बुध लाभयोग होत आहे. संसारात सप्ताहाच्या मध्यावर वाद होईल. प्रवासात अडचणी येतील. मन अस्थिर राहील. राजकीय-सामाजिक कार्यात निर्धाराने काम करा. लोकांना दुखवू नका. धंद्यात भागिदाराकडून मनस्ताप होण्याचा संभव आहे. मौल्यवान वस्तू सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडेल. मित्र दुरावण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. खाण्याची काळजी घ्यावी. संगत चांगली ठेवावी. संशोधन कार्यात अडथळे येतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. विरुद्धलिंगी व्यक्तीचा मोह महागात पडेल. शुभ दि. १०, ११

- Advertisement -

मिथुन –गुरु प्लुटो लाभयोग, चंद्र, शुक्र युति होत आहे. तुमच्या मनातील मोठे होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. धंद्यात गुंतवणूक करणारे लोक येतील. फायदा वाढेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही ठरविलेल्या योजना मार्गी लावता येतील. पदाधिकार मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. नोकरीत प्रगती होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख वाढल्याने काम मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. विद्यार्थी वर्गाने प्रगतीची संधी सोडू नये. संशोधन कार्यात यश व किर्ती मिळेल. संसारात राहिलेली कामे होतील. जीवनसाथीला खूश ठेवता येईल. शुभ दि. १२, १३

कर्क – चंद्र मंगळ केंद्रयोग, चंद्र, बुध लाभ योग होत आहे. श्री गणेशा पूजनाची तयारी व्यवस्थित होईल. पूजनचा लाभ नवीन वर्षात चांगला मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. कायदा सांभाळून निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. मान-सम्मान मिळेल. लोक तुमच्याकडे अडचणी मांडतील. त्यामुळे विचारांना चालना मिळेल. कार्य वाढवता येईल. रागावर नियंत्रण ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. विद्यार्थी वर्गाला मेहनतीनेच यश मिळेल. संसारातील अडचणी कमी होतील. वाटाघाटीचा प्रश्न सुटण्याची आशा वाटेल. संशोधन कार्यात यश मिळेल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. शुभ दि. 11,12

- Advertisement -

सिंह – सूर्य गुरु लाभयोग, शुक्र हर्षल प्रतियुति होत आहे. दूर गेलेले सरकारी, नेते मंडळी राजकीय क्षेत्रात तुमच्याकडे वळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. योजना नव्या पद्धतीने मांडता येतील. संसारात नवीन बातमी सुखकारक असेल. विवाहासाठी योग्य स्थळ मिळू शकेल. धंद्यात जम बसेल. समस्या सोडवता येईल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभही वाढेल. परीक्षेत यश मिळेल. संशोधन कार्याला दिशा मिळेल. काम पूर्ण करता येईल. शुभ दि. ११,१२

कन्या – चंद्र मंगळ केंद्र योग, चंद्र शुक्र युती होत आहे. धंद्यामध्ये अचानक समस्या येऊ शकते. रविवारी वाद होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा संताप वाढू शकतो. तुमच्या कार्यावर संशय घेतला जाईल. कमीपणा तुमच्याकडे येईल असे वर्णन विरोधक करतील. घरातील माणसे तुम्हाला सहाय्य करतील. आर्थिक व्यवहारात भावना आणू नका. वाटाघाटीत मतभेद होऊ शकतो. सर्व अडचणी तात्पुरत्या स्वरूपाच्या असतील. अरेरावी कुठेही करून चालणार नाही. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात थोडक्यात यश दूर जाऊ शकते. नोकरीत सरळमार्गी काम करा. मनोबल टिकून राहील हे महत्त्वाचे आहे. शुभ दि. १२, १३

तुला – सूर्य प्लुटो त्रिकोण योग, चंद्र शुक्र युति होत आहे. श्री गणेश पूजनाची तयारी करताना काळजी घ्या. चुकीने वागल्यास दुखापत होईल. पूजन मात्र मनाप्रमाणे होईल. राजकीय-सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. संधी समोरून चालून येईल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. लोकप्रियता मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. धंदा चालेल. फायदा होईल. नवीन फंडा धंद्यासाठी सुचेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. नवीन ओळख होईल. विवाहासाठी चांगले स्थळ मिळेल. संशोधन कार्यात सप्ताहाच्या शेवटी चांगला क्ल्यू मिळेल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 13,14

वृश्चिक – साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. सूर्य प्लुटो त्रिकोण योग, चंद्र बुध लाभ योग होत आहे. श्री गणेशपूजनाच्या दिवशी मन चंचल राहील. एकाग्रता ठेवा. घरगुती कामे करण्यात वेळ द्यावा लागेल. धंद्यामध्ये लक्ष द्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करा. लोकांची नाराजी होऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचा मुद्दा सर्वांना पटणे कठीण आहे. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. खाण्या-पिण्याची चंगळ महागात पडू शकते. नोकरीत स्वतःच्या कामात लक्ष द्या. इतरांच्यावर अवलंबून राहू नका. संशोधन कार्यात त्रुटी राहतील. शुभ दि. १०, ११

धनु – साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. सूर्य प्लुटो त्रिकोण योग, चंद्र शुक्र युति होत आहे. श्रीगणेशा पूजनाची तयारी, पूजन मनोभावे करता येईल. धंद्यात जम बसेल. नवा फंडा उपयोगी पडेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोकसंग्रह वाढवता येईल. सामाजिक कार्याचा विस्तार करता येईल. आर्थिक मदत गोळा करू शकाल. कला-क्रीडा क्षेत्रात मनाप्रमाणे यश मिळेल. दर्जेदार लोकांची ओळख होईल. जुने मित्र नव्याने भेटतील. प्रत्येक चालना मिळेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळ मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. नोकरी लागेल. संशोधन कार्य पूर्ण होईल. शुभ दि. १२, १३

मकर – साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. धंद्यात उतावळेपणाने वागू नका. आर्थिक नुकसान होऊ शकते. कामगार अडचणी वाढवू शकतात. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना फारसे महत्त्व द्यावे की नाही हा प्रश्न येईल. तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न रविवारी होईल. घरात वाटाघाटीसाठी बंधु-भगिनी आग्रह धरतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रयत्नानेच यश खेचावे लागेल. विद्यार्थी वर्गाने सरळमार्गे अभ्यास करावा. दादागिरी करू नये. संशोधन कार्यात काड्या घालण्याचा प्रयत्न होईल. वरिष्ठांची मर्जी राखणे नोकरीत कटकटीचे वाटेल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून महत्त्वाची माहिती कळू शकते. शुभ दि. १३, १५

कुंभ – मनोभावे केलेले श्री गणेश पूजन तुम्हाला तुमच्या कार्यात मोठे यश देणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वाद होईल. काम सावधपणे करा. दुखापत संभवते. सूर्य गुरु, लाभयोग, चंद्र शुक्र युति होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे स्वरूप देता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकांची मदत मिळेल. वाटाघाटीत यश येईल. संसारात शुभ समाचार मिळेल. घर, वाहन, जमीन इ. खरेदी करण्याचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात अव्वल रहाल. प्रसिद्धी, पैसा मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. संशोधन कार्यात प्रभाव वाढेल. शुभ दि. १३, १४

मीन – शुक्र हर्षल प्रतियुती चंद्र मंगळ केंद्र योग होत आहे. श्रीगणेश पूजनाची तयारी व्यवस्थित होऊ शकेल. पूजनाच्या दिवशी मनावर दडपण राहील. घरातील व्यक्तीची काळजी वाटेल. किरकोळ तणाव जीवनसाथी बरोबर होऊ शकतो. धंदा वाढेल. त्यामुळे धावपळ होईल. स्वतःची काळजी घ्या. चिडचिडेपणा सप्ताहाच्या शेवटी होईल. नोकरीच्या ठिकाणी वेळकाढू धोरण ठेवल्यास वरिष्ठ नाराज होतील. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत होईल. विद्यार्थी वर्गाने वाकड्या वाटेने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नये. शिक्षकवर्गाबरोबर नम्रतेने बोलावे. प्रेमात वाहवत जाल. संशोधन कार्यात अडचणी येतील. शुभ दि. ११, १५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -