जाणून घ्या, साप्ताहिक राशीभविष्य रविवार १२ मे ते शनिवार १८ मे २०१९

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- या सप्ताहात वृषभेत सूर्य, बुध प्रवेश होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात चांगला फायदा होईल. मोठे काम मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी होईल. वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी घरगुती समस्या येईल. क्षुल्लक वाद वाढवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड करण्याची वेळ येईल. प्रसिद्धी मिळेल. नोकरीत प्रगती होईल. संशोधनाच्या कामात दिशा मिळेल. डोळ्यांची काळजी घ्या. अचानक खर्च निर्माण होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा मौज-मजा कमी करावी. शुभ दि. १३, १७

वृषभ :- तुमच्याच राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. जम बसावा. पैसे सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांच्या बरोबर राहून काम करावे लागेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. संसारात मिळते-जुळते धोरण ठेवा. वाद वाढवू नका. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मैत्रीत मतभेद होईल. नोकरीत बदल करता येईल. संशोधनाच्या कामातील अडचणी दूर होतील. कोर्टकेस संपवता येईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. गोष्टी लपवू नये. शुभ दि. १४, १५

मिथुन :- वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात सावधपणे बोलणी करा. व्यवहार करताना फसगत संभवते. रागावर ताबा ठेवा. चांगला मित्र मदत करेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला बोलताना मोजून-मापून बोलावे लागेल. अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने वाटाघाटीत तडजोड करावी लागेल. अरेरावी चालणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. ओळखी होतील. त्यातून काम मिळू शकेल. नोकरीत वाकड्या वाटेने जाऊन निर्णय घेणे घातक ठरेल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. प्रवासात चौफेर लक्ष द्या. विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी. शुभ दि. १२, १३

कर्क :- या सप्ताहात वृषभेत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. सर्वच ठिकाणी तुम्ही तुमची कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. मागिल येणे वसूल करा. नोकरीत बदल होऊ शकेल. वरिष्ठ खूश होतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. वाटाघाटीत फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. उत्साह वाढेल. घरातील कामे होतील. गैरसमज दूर करता येईल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. संशोधनाच्या कामात यश येईल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. विद्यार्थी वर्गाला प्रगतीचा मार्ग मिळेल. शुभ दि. १३, १४

सिंह :- या सप्ताहात वृषभेत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा उत्साह, खंबीरपणा लोकांना दिसेल. यश मिळेल. थोड्या कमी प्रमाणात असले तरी महत्त्वाचा निर्णय साध्य करता येईल. धंद्यात मागे राहू नका. मोठे कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करा. घरात शुभ समाचार मिळेल. जमिनी, घर, यासंबंधी कामे करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवा परिचय चांगला वाटेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. नवी दिशा मिळेल. कोर्ट केस जिंकाल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल. शुभ दि. १५, १७

कन्या :- या आठवड्यात सूर्य, बुध वृषभेत प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात कलह निर्माण होईल. मनावर दडपण येईल. अस्थिर व्हाल. धंद्यात प्रगती करता येईल. मागिल येणे सावधपणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला वेगळेच महत्त्व दिले जाईल. ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा होती तेच लोक मदत करतील. असे समजू नका. कला-क्रीडा क्षेत्रात नाव होईल. जुनी मैत्री तुटण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल करता येईल. घर, वाहन खरेदी-विक्री करताना भावनेच्या आहारी जाऊ नका. संशोधन कार्यात यश मिळेल. कौतुक होईल. विद्यार्थी पुढे जातील. चांगली संगत ठेवावी. शुभ दि. १७, १८

तुला :- वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या मध्यावर प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात हिशोब नीट करा. धावपळ होईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकारासाठी विलंब होऊ शकतो. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी सहनशीलता ठेवा. घरात पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. एखादा निर्णय घेताना मनाचा गोंधळ होईल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत जास्त होईल. मैत्री वाढेल. आश्वासन मिळेल. नोकरीत काम वाढेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. संशोधनाच्या कामात दिशाभूल होईल. बोलताना, चर्चा करताना काळजी घ्या. तुम्हाला इतरांचे बोल ऐकावे लागतील. विद्यार्थी वर्गाने नम्रता बाळगावी.शुभ दि. १२,१३

वृश्चिक:- या सप्ताहात वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. सप्ताहात महत्त्वाची चर्चा, देवघेव करता येईल. धंदा मिळेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. राजकीय-सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. जवळचे नेते नाराज होण्याची शक्यता आहे. संसारात तुमच्यावर नाराज झालेले लोक आरोप करू शकतात. हे सर्व तात्पुरते असेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीत बिघाड संभवतो. वाहन जपून चालवा. संशोधन कार्यात यश मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रतिष्ठा पणाला लागेल. विद्यार्थी वर्गाने मैत्रीपेक्षा ध्येयावर लक्ष द्यावे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घर, जमीन, वाहन खरेदी कराल. शुभ दि. १४, १५

धनु :- वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. तुमचे मन खंबीर राहील. मित्र नातलग कठीण काळात मदत करतील. तरीही दुसर्‍यावर जास्त विसंबून राहू नका. नोकरीत तणाव होईल. कायद्याचे योग्य ते पालन करा. धंद्यात समस्या येऊ शकते. खर्च वाढेल. चर्चा नीट होणार नाही. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक बिकट परिस्थिती निर्माण करतील. गुप्त कारवाया होतील. कला-क्रीडा क्षेत्रात यश सोपे नाही. कोर्ट केसमध्ये अडचणी वाढतील. सावध रहा. फसगत होऊ शकते. संशोधनाच्या कामात उशिराने दिशा मिळेल. जिद्द ठेवा. हनुमान चालिसा वाचा. साडेसाती सुरू आहे. विद्यार्थ्यांनी वाकड्या वाटेने यश मिळवायचा प्रयत्न करू नये. शुभ दि. १३, १४

मकर :- साडेसाती सुरू आहे. साडेसातीत माणसाला चांगले वाईट अनुभव येतात. शत्रू मित्र होतात तर मित्र शत्रू. त्यामुळे तुम्ही चौफेर लक्ष द्या. वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मनस्ताप होईल. त्यानंतर योग्य दिशा तुम्हाला मिळेल. धंद्यात प्रश्न सोडवाल. मोठे काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुम्हाला आश्वासन मिळेल. संसारात किरकोळ मतभेद होईल. गुप्त कारवायांना रोखता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मागिल येणे वसूल होईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. संशोधनाच्या कामात सहाय्य मिळेल. कौतुक होईल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. कठीण कामे लवकर करून घ्या. शुभ दि. १७, १८

कुंभ :- वृषभ राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात समस्या होईल. सप्ताहाच्या मध्यावर मिळालेले काम जाण्याची शक्यता आहे. चर्चा करताना तणाव होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे इतरांना फारसे प्रभावी वाटणार नाहीत. यश कमी पडण्याची शक्यता आहे. वाटाघाटीत तडजोड करावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. कामात दिरंगाई होईल. संशोधनाच्या कामात विचारांचा गोंधळ होऊ शकतो. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. घरगुती कामे होतील. विद्यार्थी वर्गाला कसून मेहनत घेतल्यास यश मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. १३, १४

मीन :- वृषभ राशीत सूर्य बुध प्रवेश होत आहे. या सप्ताहात अडचणीतून जावे लागेल. धंद्यात कामासाठी धावपळ होईल. क्षुल्लक कारणाने संताप वाढेल. जवळचे लोक मदत करतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व असले तरी तुम्हाला आश्वासन देतील. तुमच्यावर विश्वास दाखवला जाईल. तुम्ही गोड बोलून हित साधा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवा परिचय होईल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. नोकरीत कामाचा ताण राहील. संशोधनात जिद्दीने यश मिळेल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. घरात जबाबदारी वाढेल. शुभ दि. १५, १६