साप्ताहिक राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे राहतील हे 7 दिवस

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- मेषेच्या दशमात शुक्र, द्वादशात बुध प्रवेश करीत आहे. घरातील समस्या कमी होतील. संततीसंबंधी चांगली बातमी मिळेल. धंद्यात लक्ष द्या. ग्रहांची साथ आहे. फायदा वाढवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कार्याला गती मिळेल. लोकांच्या ओळखी वाढतील. प्रयत्नाने सर्व ठिकाणी यश मिळवता येईल. सप्ताहाच्या मध्यावर प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. वाहन जपून चालवा. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासक्रम पूर्ण अभ्यासावा तरच मनाप्रमाणे प्रगती करू शकाल. शुभ दि २८, १

वृषभ :- वृषभेच्या नवमात शुक्र, एकादशात बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात सुधारणा करू शकाल. सौम्य धोरण ठेऊन धंदा मिळवा. किरकोळ तणाव कुठेही होऊ शकतो. प्रवासात घाई करू नका. संसारातील समस्येची कारणे शोधून त्यावर चांगला उपाय शोधता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. कोर्ट केसमध्ये नम्रपणे बोला. कला-क्रीडा क्षेत्रातील तणाव कमी होऊ शकेल. नवीन ओळखी होतील. नोकरीत कायद्याविरोधात जाऊ नका. संशोधनाच्या कामात धावपळ जास्त होईल. परीक्षेसाठी उत्साहाने अभ्यास करा.

मिथुन :- मिथुनेच्या अष्टमात शुक्र, दशमात बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात मेहनत घ्या. भागिदाराचा विचार समजून घ्यावा लागेल. काळजी घ्या. जीवनसाथीची मर्जी पाहूनच बोला. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. योजना पूर्ण करण्याची तयारी ठेवा. नोकरीत वरिष्ठांच्या मदतीला जावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. आर्थिक व्यवहारात सावध रहा. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. यशासाठी प्रयत्न करावे लागतील. कोर्ट केसमध्ये चांगल्या घटना घडतील. शुभ दि. २८, १

कर्क :- कर्केच्या सप्तमात शुक्र, नवमात बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. दादागिरी कुठेही करू नका. गोड बोलून काम करून घेण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. कामाकडे लक्ष द्या. काम करण्यात अडचणी येतील. घरातील लोकांचे मत ऐकून मगच घरातील कामे करा. नोकरीच्या कामात चुका होऊ शकतात. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. तुमची जिद्द फारच उपयोगी पडले. संशोधनाच्या कामात धावपळ होऊ शकते. वरिष्ठांचा विचार ऐकून घ्या. परीक्षेसाठी सर्व अभ्यास करा. शुभ दि. २६, २७

सिंह :- सिंहेच्या षष्ठात शुक्र, अष्टमात बुध प्रवेश करीत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाची चर्चा करण्याची वेळ येईल. मित्रपक्षाचा दबाव वाढेल. थोरा-मोठ्यांचे सहकार्य मिळेल. धंद्यात वाढ करता येईल. थकबाकी वसूल करा. घरगुती समस्यांवर लक्ष देऊन प्रश्न लवकर सोडवा. कोर्ट कचेरीच्या कामात बोलताना प्रथम नीट मुद्दे ओळखा म्हणजे अधिक प्रभाव पडेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन ओळखीचा मोह वाढेल. संशोधनाच्या कामात तत्परता ठेवा. इतरांकडून प्रेमाने कामे करून घ्यावी लागतील. विद्यार्थी वर्गाला जास्त मेहनत परीक्षेसाठी घ्यावी लागेल. शुभ दि. २४, २५

कन्या :- कन्येच्या पंचमात शुक्र, सप्तमात बुध प्रवेश करीत आहे. तुमचे महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात फायदा होईल. जम बसेल. नोकरीत वरिष्ठांच्या हाताखाली काम करावे लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांसाठी नीट मांडणी करून ठेवा. कोणतेही मत व्यक्त करताना प्रसंगावधान ठेवा. संधी पाहून तुमचे विचार मांडा. कला-क्रीडा क्षेत्रातील तणाव कमी करता येईल. मोठ्या व्यक्तींची मर्जी राखावी लागेल. कोर्ट केसमध्ये उतावळेपणा नको. प्रभावी मुद्दे निवडा. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. विद्यार्थी वर्गाने प्रगतीचा नवा मार्ग शोधावा. शुभ दि. २६, २७

तूळ :- तुळेच्या चतुर्थात शुक्र, षष्ठ स्थानात बुध प्रवेश करीत आहे. तुमच्या वागण्या, बोलण्यात संयम ठेवल्यास धंद्यात पुढे जाता येईल. गोड बोलणार्‍या व्यक्ती सहवासात येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कठीण कामे प्रथम करून घ्या. कर्जाचे काम करून घ्या. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठी ओळख होईल. कामाचे आश्वासन मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. संशोधनाचे कामात यशस्वी व्हाल. घर, वाहन खरेदीचा विचार करता येईल. संसारात आनंदी रहाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष दिल्यास मोठे यश मिळवता येईल. शुभ दि. २७, २८

वृश्चिक :- वृश्चिकेच्या तृतीयात शुक्र, पंचमात बुध प्रवेश करीत आहे. आरोग्यात चांगली सुधारणा होईल. संसारातील स्वप्न पूर्ण करता येईल. धंद्याला गती मिळेल. भागीदार मिळेल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. नोकरीत प्रयत्न यशस्वी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात सर्वांच्या पुढे जाता येईल. रविवार मनावर दडपण येईल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमची मेहनत महत्त्वाची ठरेल. तुमचे कौतुक होईल. कोर्ट केसमध्ये आशा वाढतील. संशोधनाच्या कामाला दिशा मिळेल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार करता येईल. विद्यार्थ्यांना प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. मेहनत कमी पडू देऊ नका. शुभ दि. २८, १

धनु :- धनु राशीच्या द्वितीयात शुक्र, चतुर्थात बुध प्रवेश करीत आहे. कठीण परिस्थितीतून प्रगतीचा मार्ग तुम्हाला धंद्यात शोधता येईल. स्वतःचे कष्ट उपयोगी पडतील. कुणावर अवलंबून राहू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल असे कार्य करा. लोकांचे प्रश्न सोडवता येतील. घरातील वाटाघाटी मार्गी लावता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. मोठे काम मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. कौतुक होईल. नोकरीत बदल करता येईल. विद्यार्थी वर्गाने स्वतःची जिद्द सोडू नये. तरच मोठे यश मिळेल. शुभ दि. १,२

मकर :- स्वतःच्याच राशीत शुक्र, तृतीयात बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठी उडी घेता येईल. नवीन गुंतवणूक करणारे मिळतील. घरातील तणाव कमी करून आनंदी रहाल. संततीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा. नोकरीत बदली करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. सप्ताहाच्या शेवटी छोटासा कठीण प्रसंग येऊ शकतो. प्रवासात सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. अविवाहितांनी लग्नासाठी प्रयत्न करावेत. घर, वाहन, जमीन खरेदी होऊ शकेल. संशोधनात मार्ग मिळेल. परीक्षेत यश मिळेल. शुभ दि. २६, २७

कुंभ :- कुंभेच्या द्वादशात शुक्र, द्वितीयात बुध प्रवेश करीत आहे. घरातील लोकांचे मन न दुखवता प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. सप्ताहात धंद्यात चांगला जम बसेल. खर्च वाढेल. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. ठोस विचार सर्वांना मान्य ठरतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. कोर्ट केसमध्ये चांगले यश मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. परदेशात जाणण्याची संधी मिळेल. संशोधनात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने खाण्याची काळजी घ्यावी. अभ्यासात आळस करू नये. ग्रहांची साथ आहे. प्रयत्न करा. प्रत्येक दिवस यशस्वी असेल. शुभ दि. २४, २५

मीन :- मीन राशीच्या एकादशात शुक्र, तुमच्याच राशीत बुध प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला किरकोळ अडचणी येतील. धंदा वाढेल. खर्चावर ताबा ठेवा. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. कामाकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचा दबाव राहील. त्यांच्या निर्णयानुसार कामे करावी लागतील. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. दादागिरीची भाषा वापरू नका. प्रश्न सोडवणे सोपे जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख होईल. कोर्ट केसमध्ये वरिष्ठांचा मान ठेवा. विद्यार्थी वर्गाने निराश न होता अभ्यास करावा. यश मिळेल. अंधार हा कायमचा असतो त्यानंतर उजेडाचा प्रभाव सुरू होतो. शुभ दि. २७, २८