घरभविष्यराशी भविष्य रविवार, 25 नोव्हेंबर ते शनिवार १ डिसेंबर २०१८

राशी भविष्य रविवार, 25 नोव्हेंबर ते शनिवार १ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- रविवार कामातील अडचणी वर मात करू शकाल. धंद्यात गोड बोलून वागा. नवा परिचय होईल. मोठेपणा करून उपयोग नाही. सूर्य, चंद्र बडाष्टक योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही विचारपूर्वक कार्य पद्धतीची मांडणी करा. तुमचा मुद्दा इतरांना पटणे कठीणे आहे अरेरावी नको. मैत्रीच्या भावनेतून वागा. धंद्यात तात्पुरतीच गुंतवणूक करा. शेअर्समध्ये अभ्यासपूर्ण निर्णय घ्या. कला-क्रिडा क्षेत्रात उतवाळेपणा नको. संयम ठेवा. संशोधनाच्या कामात घाई करून प्रश्न सुटेलच असे नाही. वरिष्ठांचा सल्ला घ्या. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे वागावे. शुभ दि. २९, ३०

वृषभ :- रविवार तुम्ही ठरविलेले काम पूर्ण करू शकाल. घरातील लोकांच्या इच्छेनुसार तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. इच्छेनुसार तुम्हाला निर्णय निर्णय घ्यावा लागेल. सूर्य गुरु युती, चंद्र बुध त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात पूर्वी झालेल्या चूका सुधारून नवे कार्य करता येईल. आळस करू नका. नव्या धय्येची तयारी करा. धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी मिळवा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. संसारातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकाल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. संशोधन कार्यात वरिष्ठांना शकेल. विद्यार्थी वर्गाला उच्च यश मिळवता येईल. तसे प्रयत्न करत रहा. शुभ दि. २६, २७

- Advertisement -

मिथुन :- रविवार तुमच्या मनाची द्विधा अवस्था होईल. कोणातही निर्णय घेतांना मागचा पुढचा विचार करावा लागेल. मुले साथ देतील. सूर्य, चंद्र षडाष्टक योग, सूर्य बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात कठोर प्रतिक्रिया व्यक्त केल्यास समस्या निर्माण होईल. मनाचा खंबरीपणा राहिल. धंद्यात मतभेद होईल. गुंतवणूक करण्यात चूक होऊ शकते. शेअर्समद्ये उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. कला-क्रिडा क्षेत्रात तडजोडीने वागा. कोर्टकेस मध्ये प्रभाव टिकवता येईल. संशोधनाच्या कामात वरिष्ठांचा विचार आणून घ्या. सरकारी ताण करतील. विद्यार्थी वर्गाने गर्विष्ठपणा करू नये. अभ्यासात जास्त लक्ष घ्यावे. शुभ दि. २७, २८

कर्क :- रविवार खर्च वाढेल. प्रवासात घाई करू नका. किरकोळ मतभेद होतील. कोणातही वाद जास्त वाढवू नका. सूर्य गुरु, युति, चंद्र त्रिकोण योग होत आहे. मंगळवारपासून तुमच्या कार्यातील अडचणी कमी होतील. राजकीय-सामाजिक कार्यात ठरविलेली योजना पूर्ण करता येईल. जनहितासाठी चांगले कार्य होईल. धंद्यात वाढ होईल. मोठ्या लोकांच्या मदतीने प्रगतिची संधी धंद्यात मिळेल. थकबाकी मिळवा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धि मिळेल. कोर्टकेस जिंकता येईल. संशोधनाच्या कामात कौतुक होईल. नोकरी लागेल. परदेशात जाता येईल. शुभ दि. २९, ३०

- Advertisement -

सिंह :- बुध मंगळा केंद्र योग, सूर्य बुध युति होत आहे. रविवार तुम्ही ठरविलेले काम होईल. नातलगीच्या भेटी होतील. उत्साह वाढेल. धंद्यात फायदा होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला विचारपूर्वक कामांची आखणी करावी लागेल. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. धंद्यात किरकोळ वाद होईल. ताणू नका. धंदा सांभाळा. कला-क्रिडा क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. मित्र मदत करतील. घरातील वृद्ध व्यक्तींच्यासाठी दगदग करावी लागेल. नोकरीत काम वाढेल. संशोधनाच्या कामात चौफेर सावध रहा. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी वर्गाने नियमितपणाने अभ्यास करावा. शुभ दि. ३०, १

कन्या :- रविवार उत्साहाने कामे देतील. घर, वाहन खरेदी करण्यासाठी शोध घेता येईल. धंद्याथ सुधारणा होईल. सूर्य, गुरू, युति बुध, मंगळ केंद्र योग होत आहे. मैत्रीपूर्ण भाषेत जरब वाढवता येईल. धंद्यात प्रगति करा. थकबाकी मिळवा. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी नम्रता ठेवा. कला-क्रिडा क्षेत्रात तडफदार काम कराल. कोर्टकेस मध्ये यश मिळेल. संशोधनात कौतुकास्पद काम कराल. विद्यार्थी वर्गाने स्वतःच्या ध्येयासाठी झगडावे मागे राहू नये. दूरच्या प्रवासच्या बेत ठरवाल. संशोधन कार्यात पुढे जाल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करू शकाल. शुभ दि. २७, २८

तूळ :- रविवार उत्साह, आत्मविश्वास वाढेल. रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. धंद्यात मोठा फायदा होईल. नविन ओळख वाढेल. सूर्य, चंद्र त्रिकोण योग, सूर्य बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात स्वतः पुढाकार घेऊन कार्यात जोरात सुरुवात करा. लोकांचे व वरिष्ठांचे विचार समजून घ्या. धंद्यात प्रयत्नांचा वेग वाढवा. घर, जमिन, वाहन इ. खरेदी-विक्रीत यश मिळेल. घरात शुभ समाचार मिळेल. प्रकृतित सुधारणा होईल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगतिचा नवा मार्ग मिळेल. मोठ्या लोकांचा परिचय होईल. मार्गदर्शन मिळेल. कोर्टकेस यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाला स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. शुभ दि. २६, २७

वृश्चिक :- रविवार विचार करून प्रश्न सुटेलच असे नाही. दडपणाखाली राहू नका. नम्रतेने बोला. धंद्यात आळस नको. बुध, मंगळ केंद्र योग, सूर्य बुध युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात मागे न राहता नव्या पद्धतीने कार्य करा. जवळच्या लोकांचा त्रास होईल. धंद्यात कष्ट घ्या. यश मिळेल. कर्जाचे काम होईल. कला-क्रिडा क्षेत्रात तडजोड करावी लागू शकते. मोठे लोक तुम्हाला आश्वासन देतील. कोर्टकेसमध्ये संयमाने प्रकरण सोडवा. संशोधनाच्या कामात धागादोरा मिळेल. घरातील ताण कमी होईल. पुढे जाता येईल. शुभ दि. २७, २८

धनु :- रविवार नातलगांच्या भेटी घेता येतील. कठिण कामाची चर्चा सफल होईल. महत्वाची वस्तु शोधून काढता येईल. बुध, मंगळ, केंद्र योग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात नुसते बोलून चालणार नाही. प्रत्यश कार्य करावे लागेल. वरिष्ठांच्या बरोबर खंबीरपणे बोला पण गर्विष्ठपणाने नको. धंद्यात अडचणी येतील. सप्ताहाच्या मध्यावर कोर्टकेसमध्ये चिंता वाढेल. नोकरीत नम्रता ठेवा. कला-क्रिडा क्षेत्रात कष्ट घ्या. संधी वाट पहावी लागेल. घरातील. वाटाघाटीसाठी तटस्थपणे चर्चा करा. परिक्षेसाठी मुलांनी फाजिल आत्मविश्वास न ठेवता अभ्यास करावा. वस्तु सांभाळा. शुभ दि. २६, २९

मकर :- रविवार विचारांचा गुंता वाढेल. खर्च होईल. मनाप्रमाणे घटना घडणे कठीण आहे, जिद्द फार महत्वाची ठरेल. डोळ्यांची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात या सप्ताहात प्रगतिची संधी मिळेल. दगदग जास्त होईल. सूर्य, गुरु, युति, बुध मंगळ केंद्र योग होत आहे. चिडचिडपणाने नुकसान होईल. सर्वत्र संयमाने कामे करा. धंद्यात वाढ होईल. प्रवासात सावध रहा. शेअर्समध्ये घाईने निर्णय घेऊ नका. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. कोर्टाच्या संबंधी कामात विचारपूर्वक वागा. संशोधनाच्या कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. दूरच्या प्रवासाच्या बेत ठरवाल. नोकरीत प्रगति कारक घटना घडेल. शुभ दि. २७, २८

कुंभ :- कामांचे नियोजन केल्यास अनेक कामे होतील. चपळता वाढेल. प्रकृति सुधारेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. सूर्य, बुध युति, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात विचारपूर्वक योजना बनवा वेळ फुकट जाऊ देऊ नका. प्रतिष्ठा वाढेल. अधिकार मिळेल. असा प्रयत्न करत रहा. सप्ताहाच्या मध्यावर विरोधकांना स्पष्ट शब्दात बोलण्याची वेळ येऊ शकते. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. पैसा मिळेल. कोर्टकेसमध्ये जिंकात येईल. नोकरीसाठी चांगला प्रयत्न करू शकाल. परिक्षेत चमकदार यश मिळवता येईल. शुभ दि. २५, २६

मीन :- कामे वाढतील. धंद्यात वेळ कमी पडेल. कठीण कामे करता येईल. थकबाकी वसूल करता येईल. प्रेमाने बोला. सर्वांना जिंका. सूर्य गुरू, युति, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला महत्वाची घटना घडेल. चर्चा सफल होईल. धंद्यात जम बसेल. घरात सप्ताहाच्या शेवटी तणाव व गैरसमज होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. यशाचा किरण दिसेल. संशोधनात दिशा मिळेल. नोकरीतील समस्या कमी होईल. शुभ दि. २६, २७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -