राशीभविष्य 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : या सप्ताहात वृश्चिकेत चंद्र, बुध, युती, चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. सौम्य शब्दात बोला. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे नमते घ्या. अरेरावी त्रासदायक ठरेल. संसारातील कामे होतील. वृद्ध माणसाची काळजी घ्यावी लागेल. रागावर ताबा ठेवा. जिद्द ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखी होतील. कोर्टाच्या कामात कायदा पाळा. शोध मोहीम यशस्वी कराल. दगदग होईल. शिक्षणात आळस नको. शुभ दि. ११, १२

वृषभ : या सप्ताहात वृश्चिकेत चंद्र, बुध युती सूर्य नेपच्यून केंद्र योग होत आहे. धंद्यातील काम करून घ्या. वेळ वाया घालवू नका. नवीन ओळखीतून काम मिळेल; पण व्यवहारात घाई करू नका. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. संसारात खर्च वाढेल. किरकोळ समस्या येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव राहील. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात शोध मोहीम पूर्ण कराल. शिक्षणात आळस नको. व्यसन त्रासदायक ठरेल. कायदा पाळा. शुभ दि. १२, १३

मिथुन ः या सप्ताहात वृश्चिकेत चंद्र बुध युती, शुक्र नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात कामात अडचणी येतील. दत्तजयंतीच्या दिवशी जास्त गर्दीत जाऊ नका. प्रकृती सांभाळा. नोकरीत कायद्याचे पालन करून मगच निर्णय घ्या. संसारातील कामे करता येतील. वयस्कर व्यक्तींची काळजी वाटेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वजन, प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न होईल. कला-क्रीडा क्षेत्रात कठीण परिश्रम घ्या. शोध मोहिमेत दिशाभूल होऊ शकते. कोर्ट केसमध्ये वाद वाढेल. शिक्षणात पुढे जाता येईल. योग्य संगत ठेवा. शुभ दि. ८, ९

कर्क : सूर्य नेपच्यून केंद्र योग, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात गिर्‍हाईकाला न दुखावता धंदा करा. चर्चा पूर्ण होईल. वसुली करताना संयमाने बोला. पैसे नीट ठेवा. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. सप्ताहाच्या मध्यावर पोटाची काळजी घ्या. पाकीट सांभाळा. संसारात जबाबदारी वाढेल. कामे वाढतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व राहील. सहकारी, नेते यांचा विचार घ्या. त्यांना प्रेमाने जिंका. दुखवू नका. शोध मोहीम फत्ते कराल. कोर्ट केस संपवता येईल. कला-क्रीडा स्पर्धा रंगेल. शिक्षणक्षेत्रात चांगली संगत ठेवा. शुभ दि. ११, १२

सिंह : चंद्र मंगळ प्रतियुती, चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. मोठेपणाच्या आहारी जाऊ नका. पाकीट नीट ठेवा. गुप्त गोष्टी उघड करू नका. संसारात घरातील मोठे लोक सहाय्य करतील. नोकरीत काम वाढेल. कामात चूक होईल. सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा, तुम्हाला वेगळे प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. शोध मोहीम कटकटीची वाटेल. शिक्षणात लक्ष द्या. कला-क्रीडा स्पर्धा कठीण आहे. मन स्थिर ठेवा. शुभ दि. ८, ११

कन्या ः सप्ताहाच्या सुरुवातीला मनस्ताप होईल. वाहन जपून चालवा. संयमाने बोला. चंद्र बुध प्रतियुती, सूर्य नेपच्यून केंद्र योग होत आहे. धंद्यात नवे काम मिळवता येईल. प्रयत्न करा. संसारात कामे वाढतील. क्षुल्लक वाद वाढवू नका. नोकरीत वरिष्ठांना मदत केल्याने तुमचे कौतुक होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. तुम्ही निरीक्षण करा. नवे शिकावयास मिळेल. शोध मोहीम यशस्वी होईल. कला-क्रीडा स्पर्धा जिंकाल. शिक्षणात आळस नको. मेहनत घ्या. शुभ दि. ११, १३

तूळ : चंद्र बुध प्रतियुती, शुक्र नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. वसुली करता येईल. मोठे कंत्राट मिळेल. मोठ्या लोकांच्या ओळखीतून काम मिळवता येईल. संसारात सुखद समाचार मिळेल. मौज-मजेत वेळ जाईल. नोकरीत नवीन संधी शोधा. विवाह, संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. पद मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. कोर्ट केस जिंकाल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात मोठे यश मिळेल. वाहन जपून चालवा. शुभ दि. ८, ९

वृश्चिक : वृश्चिकेत चंद्र बुध प्रतियुती, शुक्र नेपच्यून लाभयोग होत आहे. या सप्ताहात ताण-तणाव वाढेल. संयम ठेवा. धावपळ होईल. धंद्यात काम मिळेल. नोकरांना सांभाळून ठेवा. कोणतेही काम करताना सावध रहा. छोटी दुखापत होऊ शकते. संसारात सौख्य मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुम्हाला मोठे काम देतील. कष्ट पडतील; पण कौतुक होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला तत्परता दाखवावी लागेल. प्रतिष्ठा राहील. शोध मोहिमेत कुणालाही कमी लेखू नका. स्पर्धा जिंकाल. विद्यार्थ्यांनी जिद्द सोडू नये. मार्ग मिळेल. शुभ दि. ११, १२

धनु : सूर्य चंद्र षडाष्टक योग, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात समोरच्या व्यक्तीला कमी समजू नका. अरेरावी, मोठेपणा करून चालणार नाही. मिळते-जुळते धोरण उपयोगी पडेल. दत्तजयंतीच्या दिवशी जास्त गर्दीत जाऊ नका. नोकरीत बोलताना काळजी घ्या. वरिष्ठांचे मत ऐकून घ्यावे लागेल. संसारात प्रेम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही कोणताही मुद्दा मांडताना भान ठेवा. गदारोळ उठेल. आरोप येईल. कला-क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. शोध मोहिमेत मेहनत जास्त पडेल. शिक्षणात चिंता नको. प्रयत्न करा. यश मिळेल. शुभ दि. ८, ९

मकर : सूर्य नेपच्यून केंद्र योग, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. जवळची माणसे दूर जाण्याची शक्यता आहे. धंद्यात काम मिळेल. नवीन ओळख झालेल्या माणसावर मोठा विश्वास टाकू नका. फसगत होईल. मोहाला बळी पडाल. संसारात क्षुल्लक समस्या येईल. पोटाची काळजी घ्या. खर्च जपून करा. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. तुम्ही सावधपणे बोला. भावनावश लवकर व्हाल. कला-क्रीडा स्पर्धेत कौतुक होईल. शोध मोहीम यशस्वी करा. शिक्षणात मेहनत घ्यावी. चुकीचा सल्ला ऐकू नका. शुभ दि. ११, १२

कुंभ : सूर्य नेपच्यून केंद्रयोग, शुक्र शनी युती होत आहे. धंद्यात मोठा फायदा होईल. शेअर्समध्ये अंदाज घेता येईल. गुंतवणूक वाढवता येईल. वसुली करा. मोठे कंत्राट मिळेल. नोकरीत बढती मिळेल. संसारात सुखद समाचार मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व राहील. नवीन ओळखी कला-क्रीडा क्षेत्रात होतील. उत्साह वाढेल. कल्पना शक्तीला चालना मिळेल. प्रेम कराल. शोध मोहीम यशस्वी होईल. शिक्षणात प्रगती कराल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घर, जमीन, खरेदी-व्रिकी करता येईल. शुभ दि. ८, १३

मीन : चंद्र गुरु त्रिकोण योग, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. धंद्यातील तणाव, समस्या कमी होईल. नवे काम मिळेल. ओळखीतून काम मिळेल. मागिल येणे वसूल करा. संसारातील तणाव कमी करा. नोकरीत नवा बदल करण्यासाठी प्रयत्न करा. परदेशात कंपनी द्वारा जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. कला-क्रीडा स्पर्धेत टिकाल. कौतुक होईल. शोध मोहीम जिंकाल. शिक्षणात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. शुभ दि. ८, ११