Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार 1 सप्टेंबर ते शनि  7 सप्टेंबर

राशीभविष्य रविवार 1 सप्टेंबर ते शनि  7 सप्टेंबर

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य
मेष ः-  या सप्ताहात सिंह सूर्य चंद्र लाभयोग, सूर्य बुध युती होत आहे. श्री गणेश पुजनाची तयारी करताना एखादी छोटीशी गोष्ट विसरण्याची शक्यता आहे. मनोभावाने तुमची प्रार्थना करा. धंद्यात गोड बोलून गिर्‍हाईकाबरोबर वर्तन करा. राजकीय-सामाजिक कार्यात धावपळ होईल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. संसारातील अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात बाजी मारता येईल. नवीन ओळखी होतील. प्रगतीची संधी देण्याचे आश्वासन मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढला तरी वरिष्ठांना खूश करता येईल. शोध कार्याला दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासक्रमावर नीट लक्ष द्या. शुभ दि. ३, ४
वृषभ ः सूर्य मंगळ युती, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. श्री गणेशाचे पूजन मनाप्रमाणे करता येईल. प्रवासात घाई करू नका. धंद्यात वाढ होईल. रागावर ताबा ठेवा. नवीन ओळखीचा उपयोग होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन योजनांना तयार करून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील व्यक्तींना खूश करता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. पुरस्कार मिळेल. नोकरीत जम बसवा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शोधकार्यात यश मिळेल. कोर्ट केस संबंधी कामे नीट होतील. विद्यार्थी वर्गाचा उत्साह वाढेल. शुभ दि. १,५
मिथुन ः- बुध मंगळ युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. श्रीगणेश पूजनामुळे तुमचे मन उत्साहित होईल. धंद्यात फायदा होईल. मोठे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. शेअर्सचा अंदाज घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन योजना पूर्ण करा. वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करता येईल. दौर्‍यात यशस्वी व्हाल. जीवनसाथी, मुले यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. घर, जमीन घेण्याचा विचार करता येईल. शोधकार्य पूर्ण करता येईल. विद्यार्थी वर्गाला चांगले मार्गदर्शन मिळू शकेल. शुभ दि. २,३
कर्क ः- सूर्य बुध युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. पुढील उन्नत भविष्यासाठी श्री गणेशाकडे प्रार्थना करा. मनोभावाने प्रार्थना करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. मोठी जबाबदारी पूर्ण केल्याने वरिष्ठ खूश होतील. अधिकार प्राप्ती होईल. जुना वाद, गैरसमज पूर्णपणे दूर करा. नव्या प्रेरणेचे कार्य करा. तरच टिकाव लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात चालना देणारी घटना घडेल. संसारात सुखद बातमी मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल. शोधकार्याला मोठ्या दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेसाठी चांगली तयारी करता येईल. शुभ दि. 1,2
सिंह ः-  सूर्य मंगळ युती, शुक्र नेपच्यून प्रतियुती होत आहे. तुमच्या प्रत्येक कार्याला श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळेल. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. थकबाकी मिळेल. नवीन मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरगुती तणाव कमी करण्यासाठी चांगले प्रयत्न करा. अहंकाराने संसार होत नाही. प्रेमानेच प्रेम जिंकावे लागते. घर, जमीन घेण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध व्हाल. नामांकन होईल. कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. शोधकार्य पूर्ण कराल. नोकरीत बढतीची आशा वाढेल. शुभ दि. २,३
कन्या ः- चंद्र गुरु लाभयोग, सूर्य मंगळ युती होत आहे. धंद्यात वाद, तणाव होऊ शकतो. संयम ठेवल्यास समस्या कमी होईल. श्रीगणेशाच्या पूजनाने मन प्रसन्न ठेवता येईल. प्रतिष्ठेचा जास्त बाऊ करून प्रश्न वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढवण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवा. इतरांचे मत ऐकून घ्या. त्यातूनच  तुम्हाला नवे डाव कसे टाकायचे याचे ज्ञान मिळेल. उतावळेपणा कुठेही करू नका. रागाला महत्त्व देऊ नका. कला-क्रीडा स्पर्धेत कौतुक होईल. घरात चिंताजनक वातावरण राहू शकते. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीत काम करताना सावध रहा. शोधकार्य भरकटणार नाही याकडे लक्ष ठेवा. शुभ दि. ३, ४
तूळ ः- सूर्य मंगळ युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. श्रीगणेशाचे आगमनाची तयारी करताना थोडा गोंधळ होऊ शकतो. लक्षपूर्वक कामे करा. धंद्यात जम बसेल. गोड बोलून रहा. थकबाकी वसूल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्याला मंगळवारपासून योग्य दिशा देता येईल. नवे धोरण ठरवता येईल. लोकांच्या सुखासाठी चांगले कार्य करा. घरातील समस्या कमी होतील. एकाचवेळी अनेक कामावर लक्ष ठेवावे लागेल. नोकरीत बद्दल फायदेशिर ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात नविन ओळखी उत्साहवर्धक ठरतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शोध कार्य पूर्ण कराल. विद्यार्थी आत्मविश्वासाने ध्येय गाठू शकतात. शुभ दि. ५, ६
वृश्चिक ः-  शुक्र, शनि, त्रिकोणयोग, सूर्य बुध युती होत आहे. श्रीगणेश पूजन मनोभावे होईल. तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा. संसारातील कमी भरून काढता येईल. संततीप्राप्तीचा प्रयत्न करा. धंद्यात नवा फंडा उपयोगी पडेल. मोठे काम मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात अधिक चांगल्या प्रकारे कार्य होईल. मान-प्रतिष्ठेत भर पडेल. नोकरीत फायदेशीर बदल करू शकाल. घर, जमीन इ. खरेदी करता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नुकसान भरून काढता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शोधकार्य पूर्ण झाल्याने वरिष्ठ खूश होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात उत्तम यश मिळेल. शुभ दि. ५, ६ 
धनु ः– साडेसाती सुरू आहे. तरीही तुमची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. बुध मंगळ, युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात प्रयत्नाने यश मिळेल. श्रीगणेशाची पूजा-अर्चा एकाग्र मनाने करता येईल. तुमच्या पुढील कार्याला चांगले आशीर्वाद मिळतील. गौरीपूजनाच्या दिवशी वाद, तणाव होऊ शकतो. संयम ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व नव्याने वाढवता येईल. वरिष्ठांचे, सहकारी वर्गाचे सहाय्य मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नवे काम मिळवण्याचे आश्वासन मिळेल. नोकरीत ताण कमी  होईल. शोधकार्याला दिशा मिळेल. विद्यार्थी वर्गाने चिकाटी ठेवावी. शैक्षणिक गुरुचे मार्गदर्शन घ्यावे. शुभ 1,2
मकर ः-  चंद्र गुरु लाभयोग, शुक्र शनि त्रिकोणयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. श्रीगणेश पूजनात मन एकाग्र होईल. धंद्यात आळस नको. वाद कुठेही वाढणार नाही. याकडे लक्ष द्या. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. नोकरीत कायद्याचे पालन करून निर्णय घ्या. वरिष्ठांचा सल्ला घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात सर्वांचे मत नीट जाणून घ्या. तुमचा अवमान होणार नाही, फसगत होणार नाही याची काळजी घ्या. कला-क्रीडा स्पर्धेत टिकणेच महत्त्वाचे आहे. घरातील प्रश्नावर मतभेद होऊ शकतो. शोधकार्यात विलंब होईल. विद्यार्थी वर्गाने योग्य संगत ठेवावी. व्यसन करू नये. शुभ दि. १,२ 
 
कुंभ ः– सूर्य मंगळ युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. श्रीगणेशाच्या कृपेने  तुमची कामे होतील. पूजनाची तयारी करताना एखादी वस्तू विसरण्याची शक्यता आहे. वाहनाचा वेग कमी ठेवा. रागावर ताबा ठेवा. धंद्यात काम वाढेल. नवी गुंतवणूक करणारे लोक मिळतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना सर्वांची साथ मिळेल. एकीने कार्य करा. लोकांच्या समस्या सोडवा. नुसता देखावा करू नका. घरातील कामे होतील. आप्तेष्ठ भेटतील. घर, जमीन इ. खरेदी-विक्रीत फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. कला-क्रीडा स्पर्धेत नाव मिळेल. लाभ होईल. शोधकार्यात तुमचे कौतुक होईल. शुभ दि. ३, ५
मीन ः- चंद्र गुरु लाभयोग, सूर्य मंगळ युति होत आहे. श्रीगणेशाचे आगमन आनंद देणारे ठरेल. सामाजिक कार्यात अरेरावी करू नका. प्रेमाने प्रश्न सोडवा. मंडळाचे काम सर्वांच्या मतानुसार करा. धंद्यात काम मिळेल. थकबाकी वसूल करा. राजकीय कार्यात वरिष्ठांचा सल्ला घ्या. अतिशयोक्तीचे वागणे त्रासदायक ठरेल. दुसर्‍यांच्या बरोबर स्पर्धा करताना सावध रहा. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला जाईल. घरात नमते धोरण ठेवा. वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. शोधकार्य नेटाने करावे लागेल. योग्य दिशा निश्चित करणे कठीण वाटेल. व्यसनाने नुकसान होईल. शुभ दि. ५, ६