राशीभविष्य रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर २०१९

Mumbai

मेष ः- या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. नोकरीत कामांची गर्दी होईल. धावपळ करावी लागेल. राग वाढेल अशी घटना घडू शकते. कामात चूक होऊ शकते. धंद्यात थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात उतावळेपणा, अहंकार ठेऊ नका. अडचण वाढू शकते. खाण्याची काळजी घ्या. घरातील समस्या सोडवण्याचा मार्ग मिळू शकेल. कोर्ट केस सोपी नाही. शोध मोहिमेत धांत्रटपणा करू नका. कला-क्रीडा, शिक्षणात मेहनत घ्या. प्रतिस्पर्धी वाढतील. वृद्ध माणसाची काळजी वाटेल. घर, जमीन संबंधी वाद होऊ शकतो. देवीची प्रार्थना करा. शुभ दि. १, ५

वृषभ ः या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. महत्त्वाची धंद्यातील कामे करून घ्या. नोकर ऐनवेळी दगा देण्याचा संभव आहे. श्री अंबामातेच्या कृपेने कार्य कामे होतील. नोकरीत जम बसवा. राजकीय-सामाजिक कार्यात नेटाने योजना पूर्ण करा. घरातील कामे वाढतील. मौल्यवान वस्तू नीट जागेवर ठेवा. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. सहनशीलता ठेवावी लागेल. गुप्त गोष्टी उघड होण्याचा संभव आहे. शोध मोहिमेत यश मिळेल. कष्ट जास्त पडतील. कला-क्रीडा-शिक्षणात यश मिळवण्यासाठी मेहनत घ्या. तुम्हाला योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेता येईल. शुभ दि. २९, २

मिथुन ः– तुला राशीत बुध, शुक्र या सप्ताहात प्रवेश करीत आहे. धंद्यात अधिक चांगली सुधारणा होईल. नवे काम मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. सप्ताहाच्या मध्यावर राग वाढेल. प्रवासात घाई नको. राजकीय-सामाजिक कार्यात दबावाखाली रहावे लागले तरी प्रतिष्ठा मिळेल. लोकांच्या सान्निध्यात रहाल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. घर दुरुस्तीचा प्रश्न निघेल. खर्च होईल. कला-क्रीडा-शिक्षणात प्रगती करता येईल. नवीन ओळख सप्ताहाच्या शेवटी होईल. शोध मोहिमेत यशस्वी व्हाल. कोर्ट केस जिंकाल. नवरात्र उत्सवात आनंदाने काम कराल. मनोभावे प्रार्थना करा. शुभ दि. १, ५

कर्क ः- या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात, घरगुती चर्चेत क्षुल्लक मतभेद होईल. नोकरमाणसांची कमतरता भासू शकते. नवे काम मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्याला गती मिळेल. योजना लवकर पूर्ण करण्याची तयारी ठेवा. घर, जमीन यासंबंधी कामे करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना खुष कराल. कला-क्रीडा-शिक्षणात नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्तीला चालना देणारी घटना घडेल. कोर्ट केस लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. शोध मोहिमेत आत्मविश्वासाने काम कराल. परदेशात जाण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करता येईल. शुभ दि. २९, २

सिंह ः- या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात चांगला जम बसेल. फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. घरातील ताण-तणाव कमी होईल. घर घेण्याचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. मान-सन्मानाची वागणूक मिळेल. वाटाघाटीत यश येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन परिचय फायदेशीर ठरेल. विशेष यश मिळेल. शिक्षणात आळस न करता अभ्यासात लक्ष द्या. प्रगती होईल. शोध मोहिमेत प्रवासाची दगदग होईल. परंतु मनाप्रमाणे यश मिळेल. श्री भगवती मातेच्या कृपेने चांगल्या घटना घडतील. प्रार्थना करा. शुभ दि. २९, ३०

कन्या ः– या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करत आहे. व्यवसायात मोठे काम मिळेल. मागिल येणे वसूल करा. योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. शेअर्समध्ये फायदा होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. घर, वाहन, जमीन घेण्याचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात मान-प्रतिष्ठा मिळेल. योग्य कार्यपद्धतीची आखणी करून कामे करा. पुढे त्याचा फायदा होईल. कोर्ट केस लवकर मिटवा. शिक्षणात दुर्लक्ष, आळस न करता अभ्यास करा. परीक्षा घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. प्रसिद्ध व्यक्तींचा सहवास मिळेल. शोध मोहीम यशस्वी कराल. श्री देवीच्या कृपेने मन स्थिर राहील. शुभ दि. ३०, १

तूळ ः- तुमच्याच राशीत बुध, शुक्र ग्रहांचे राश्यांतर या आठवड्यात होत आहे. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. नम्रपणे कोणतीही चर्चा करा. राग वाढेल. नवरात्रीची तयारी करताना अडचणी येऊ शकतात. सोमवारपासून तुमचा उत्साह वाढेल. सामाजिक कार्यात रागावर ताबा ठेवा. सर्वांच्या मतानुसार निर्णय घ्या. राजकीय क्षेत्रात तुमची पिछेहाट होत आहे असे वाटेल. संयम ठेवा. तात्पुरत्या अडचणींवर मात करा. घरातील. कामे वाढतील. कुणालाही नाराज करू नका. नोकरीत दुर्लक्ष नको. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. पुरस्कारासाठी वाट पहावी लागू शकते. शोध मोहीम कठीण वाटेल. शुभ दि. ४, ५

वृश्चिक ः– या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करण्यात अडथळे येतील. धंद्यात कष्ट पडतील. नोकर दगा देण्याची शक्यता आहे. नवे काम जिद्दीने मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मागे राहू नका. लोकांच्या नजरा तुमच्याकडे आहेत. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. सहकारी वर्गाला कमी समजू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. शिक्षणात पुढे जाल. चांगली संगत ठेवा. शोध मोहीम यशस्वी होईल. घरगुती कामे वाढतील. जवळच्या माणसांना नाराज करू नका. अनाठाई खर्च संभवतो. शेअर्सचा अंदाज नीट घ्या. अंबामातेची आराधना एकाग्र मनाने करा. शुभ दि. ३०, १

धनु ः– या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. घटस्थापना मनोभावे कराल. धंद्यात मोठे काम मिळेल. प्रयत्न करा. मागिल येणे वसूल करा. घरातील अर्धवट राहिलेली कामे करून घेता येईल. आप्तेष्ठांच्या भेटी होईल. वाटाघाटी संबंधी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. नोकरीत तणाव कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या मध्यावर समस्या येऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शिक्षणात जिद्दीने अभ्यास करा. यश मिळेल. शोध मोहिमेचे कौतुक होईल. प्रेमाला चालना मिळेल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. कोर्ट केस जिंकाल. शुभ दि. २९, ३०

मकर ः- या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. या आठवड्यात महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. धंद्यात चांगला जम बसेल. चर्चा सफल होईल. मोठे काम मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्याला गती देता येईल. लोकप्रियता मिळेल. दौर्‍यात यश मिळेल. श्रीजगदंबेच्या कृपेने कार्य सिद्धीस नेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळखीने नवे काम मिळेल. घरातील ताण कमी होईल. राहून गेलेली कामे करा. कोर्ट केस समस्या सोडवता येईल. शिक्षणात यशस्वी व्हाल. चांगली संगत ठेवा. शोध मोहीम फत्ते होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दि. २९, ३०

कुंभ ः– तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यातील अडचण दूर करता येईल. जिद्द ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई नको. नातलगांसाठी वेळ व पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात जपून बोला. अरेरावी चालणार नाही. प्रतिष्ठा कमी होईल असे कृत्य टाळा. सर्वांच्या मतानुसार काही कामे करावी लागतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहूनच वागा. शोध मोहीम प्रयत्नाने यशस्वी कराल. कुणालाही कमी समजू नका. फायदा पाळा. श्री कुलदेवीची आराधना करा. शुभ दि. ४, ५

मीन ः- या सप्ताहात तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. नोकर माणसांच्या समस्या समजून घ्या. चर्चा संयमाने करा. घरगुती वाद वाढवू देऊ नका. खाण्याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. लोकांची कामे प्रमाणिकपणे करा. कोणालाही कमी लेखू नका. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठांना खुष करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळखी होतील. कोर्ट केस जिंकता येईल. शोध मोहिमेत यश मिळेल. नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. शिक्षणात पुढे जाल. नवरात्रीत तुम्ही मनोभावे प्रार्थना करा. शुभ दि. २९, २